msp center ahilyanagar आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी पण महासंघाने मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी 18 केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यावर्षी साठी (2024-25) मुग, उडीद आणि सोयाबीन हमीभावाने खरेदीच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील बारा खरेदी केंद्रावर नोंदणी सुरू असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले .
msp center मूग, उडीद आणि सोयाबीनचे हमीदर
msp center यावर्षी सोयाबीन, उडीद, मुगाची आम्ही दराने खरेदी करावी यासाठी शासनाकडून हमी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. तर यावर्षी मुगाची 8 हजार 682 प्रतिक्विंटल हमीदराने खरेदी करण्यात येणार आहे, उडीदासाठी 7 हजार 400 रुपये प्रतिक्विंटल हमीदराने खरेदी करण्यात येणार आहे. तर सोयाबीन साठी 4 हजार 892 रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे.
मुग ,उडीद आणि सोयाबीनची हमीभावाने खरेदी कधीपर्यंत करण्यात येणार आहे
- मूग व उडीद या पिकाची 10 ऑक्टोंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 पर्यंत केंद्रावरून खरेदी करण्यात येणार आहे.
- सोयाबीन या पिकाची 15 ऑक्टोंबर 2024 ते 12 जानेवारी 2025 या कालावधीत केंद्रावरून खरेदी करण्यात येणार आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या 18 केंद्र पैकी खालील 12 केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.
ही वाचा : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार
12 केंद्रावर शेतकऱ्यांच्या नोंदणीस सुरुवात
शेवगाव : तालुक्यामध्ये बोधेगाव व हातगाव
पाथर्डी: तालुक्यात बाजार समिती पाथर्डी
जामखेड: तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड
कर्जत: तालुक्यात बर्गेवाडी ,कर्जत
श्रीगोंदा: तालुक्यात घारगाव, घुटेवाडी , मांडवगण
राहुरी: तालुक्यात राहुरी तालुका सरकारी खरेदी विक्री संघ.
पारनेर: तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर.
राहातातालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती
कोपरगाव: तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव
अहिल्यानगर जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या 18 केंद्रापैकी वरील दिलेल्या बारा केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे .
msp center खरेदी प्रक्रिया
सर्व खरेदी प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांना या नोंदणी साठी आधार कार्ड ची झेरॉक्स, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असलेल्या पासबुकची झेरॉक्स, चालू वर्षाचा 8 – अ व 7/12 उतारा आणि मूग, उडीद व सोयाबीन पिकाची नोंद असलेल्या ऑनलाइन पिक पेरा आणि चालू मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी काहीही कचरा नसलेला चाळणी करून सुकवून माल केंद्रावर आणावा. नोंदणी करण्यासाठी आपणास ई समृद्धी या पोर्टल वर नोंदणी करावी लागेल.