नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेअंतर्गत मिळणार दहा लाख पर्यंतचे कर्ज ; योजनेसाठी इथून करा अर्ज : NABARD Animal Husbandry Loan Scheme 2024

NABARD Animal Husbandry Loan Scheme 2024 शेतीबरोबरच पशुपालन हे देखील शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे त्यामुळे बहुतांश शेतकरी आता पशुपालन ही करतात यासाठी सरकार आर्थिक मदत उपलब्ध करून देते नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फोर अग्रिकल्चर अंड रुरल डेव्हलपमेंट यासाठी मोठी योजना राबवत आहे जनावरे खरेदी करण्यासाठी आणि डेअरी युनिट सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते परंतु आता नवीन योजनेच्या माध्यमातून ही रक्कम आता 12 लाख रुपये करण्यात आली आहे नेमकी काय आहे ही योजना याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

NABARD Animal Husbandry Loan Scheme 2024

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेअंतर्गत डेअरी युनिट उभारण्यासाठी मिळणारे अनुदान आता 25% वरून 50% करण्यात आले आहे जेणेकरून अधिकाधिक नागरिक पशुसंवर्धना मध्ये सहभागी होतील आता पशुपालनासाठी 12 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे ज्यामध्ये 50% सबसिडी देखील मिळणार आहे पशुपालना ला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे.

NABARD Animal Husbandry Loan Scheme 2024 व्याजाची किंमत किती ?

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्जाचा व्याजदर वार्षिक 6.5 टक्के ते 9% इतका आहे कर्ज परतफेड कालावधी 10 वर्षापर्यंत आहे नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अर्जदारांना 33.33 टक्क्यापर्यंत सबसिडी दिली जाते इतर अर्जदारांना 25% पर्यंत सबसिडी दिली जाते.

काय आहे योजनेचा उद्देश ?

  • NABARD Animal Husbandry Loan Scheme 2024 नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्माण करणे, दुग्ध उद्योगाला चालना देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे आहे
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये पैसे मिळतात कर्ज परतफेड कालावधी 10 वर्षे इतका आहे
  • त्यासाठी ग्रामीण भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी जमीन असावी

हे वाचा : नाबार्ड पशुधन लोन योजना

NABARD Animal Husbandry Loan Scheme 2024 कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पत्ता पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पशुपालन नियोजन
  • बँक खाते पासबुक
  • अर्ज

NABARD Animal Husbandry Loan Scheme 2024 अर्ज कुठे करावा ?

  • NABARD Animal Husbandry Loan Scheme 2024 सर्वप्रथम तुम्हाला कोणता डेअरी फार्म उघडायचा आहे हे ठरवावे लागेल
  • नाबार्ड या योजनेच्या माध्यमातून डेअरी फार्म सुरू करायचा असेल तर त्यासाठी जिल्ह्यामधील नाबार्ड कार्यालयांमध्ये जावे लागेल
  • जर तुम्हाला छोटे डेअरी फार्म उघडायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन माहिती घेऊ शकता
  • सबसिडी फॉर्म भरून बँकेमध्ये अर्ज करावा लागेल कर्जाची रक्कम मोठी असल्यास प्रकल्प अहवाल सादर करावा लागेल.
  • बँकेतून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या जोडायचे आहेत
  • सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला बँकेत हा अर्ज जमा करावा लागेल
  • अशा पद्धतीने तुम्ही या योजनेअंतर्गत यशस्वी करिता आपले अर्ज सादर करू शकता.

अधिक माहितीसाठी नाबार्ड योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :

https://www.nabard.org/hindi/circulars.aspx?cid=504&id=24

Leave a comment