Bandhkam Kamgar Diwali Bonus Yojana 2024 महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची घोषणा समोर येत आहे राज्य सरकारने बांधकाम कामगारांना दिवाळी कोणास देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाखो बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना दिवाळीच्या सणात आर्थिक मदत मिळणार आहे ही बातमी बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वाची योजना ठरणार आहे.
बांधकाम क्षेत्रातील कामगार हे समाजामधील एक महत्त्वाचा घटक आहे त्यांच्या कठोर परिश्रमामुळे सुंदर इमारत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध होतात मात्र या कामगारांना बऱ्याचदा कमी वेतन आणि अनियमित रोजगार यांचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे कठीण होते विशेषतः सणासुदीच्या काळात त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी घेतला आहे.
बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळी बोनस :
Bandhkam Kamgar Diwali Bonus Yojana 2024 या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना 5000 रुपये इतका बोनस दिला जाणार आहे हा फोनच थेट कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्यामुळे कामगारांना त्यांच्या कुटुंबासाठी दिवाळीच्या सणात नवीन कपडे फटाके आणि इतर गरजेच्या वस्तू खरेदी करणे शक्य होणार आहे.
बांधकाम क्षेत्रामधील नोंदणीकृत कामगारांसाठी ही योजना असून त्यांच्या वयोमर्यादा 18 ते 60 वर्षे आहे या योजनेचे अंमलबजावणी महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडून केली जाणार आहे या योजनेचा लाभदाचे दहा लाख बांधकाम कामगारांना मिळणार आहे.
कोण असणार दिवाळी बोनस साठी पात्र
महाराष्ट्र राज्यातील इमारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणी कृत जिवंत असलेले सर्व लाभार्थी या दिवाळी बोनस साठी पात्र आहेत. परंतु ज्या लाभार्थ्यांनी आपला अर्ज नूतनीकरण (renew) केला नाही अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ज्यांचे अर्ज नूतनीकरण झालेले आहेत अशा सर्व बांधकाम कामगार लाभार्थी यांना दिवाळी बोनस 5000 हजार रुपये त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर dbt च्या माध्यमातून जमा केले जाणार आहे.
Bandhkam Kamgar Diwali Bonus Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- नोंदणी प्रमाणपत्र
- वय प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- 90 दिवस काम केल्याचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
Bandhkam Kamgar Diwali Bonus Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आपणास बांधकाम कामगार च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्या ठिकाणी नवीन नोंदणी या पर्यायचा अवलंब करावा लागेल. तिथे विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून अवश्यक असणारे सर्व कागदपत्रे अपलोड करून आपला अर्ज सादर करू शकता. अर्ज करण्यासंबंधी आधीक माहिती साठी येथे क्लिक करा.