केंद्र सरकारची सुपरहिट योजना येथे नोंदणी करा आणि मिळवा 5000 रुपये महिना. pm internship.

pm internship.केंद्र सरकारने अर्थसंकल्प 2024,25 सादर करताना देशातील बेरोजगार तरुणांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. या घोषणेच्या माध्यमातून देशांमध्ये पीएम इंटरशिप योजना राबवली जाणार आणि या योजनेच्या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या तरुणांना 5000 हजार रुपये प्रति महिना दिला जाणार . या बद्दलची घोषणा केली आता यासाठी नोंदणी प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. आपण ऑनलाईन पद्धतीने त्यामध्ये नोंदणी करून केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा घेऊन प्रति महिना 5000 हजार रुपये मिळवु शकतात. पीएम इंटरशिप योजना याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

pm internship कोणाला मिळणार लाभ.

देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुण/तरुणी यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या मध्ये लाभ घेण्यासाठी अर्जदार कोठेही काम करत नसावा. ज्यामध्ये शासकीय क्षेत्र असेल निमशासकीय असेल किंवा खाजगी क्षेत्रातील यामध्ये कोठेही अर्धवेळ किंवा पूर्णवेळ कामकाज करत नसावा. तरच तो तरुण हा अर्जदार योजनेसाठी पात्र असेल. यामध्ये नोंदणी करण्यासाठी अर्जदाराचे वय 21 ते 24 या दरम्यान असणे आवश्यक आहे.

कसा मिळणार लाभ.

pm internship. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर शासनाने ठरवलेले मोठ्या 5000 कंपन्यापैकी कोणत्याही एका कंपनी आपल्याला काम दिले जाईल, (काम हे इंटरशिप स्वरूपात असेल) लक्षात घ्या हे काम आपल्याला आपल्या भागातील कंपनीत दिले जाईल. ज्यामध्ये आपल्याला इंटरशिप या घटकासाठी काम दिले जाईल ज्याच्या माध्यमातून आपण कंपनीत चालणाऱ्या सर्व कामकाजाची माहिती घेऊ शकाल. त्यासोबतच आपल्याला त्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्याची देखील संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

किती मिळणार लाभ

pm internship योजना अंतर्गत आपण अर्ज केल्यानंतर आपल्याला आपल्या जवळील नामांकित कंपनीमध्ये काम दिले जाईल. त्या ठिकाणी आपल्याला सरकारकडून 4500 रुपये व ज्या कंपनीत आपण काम करत आहात त्या कंपनीकडून 500 रुपये प्रति महिना इंटरशिप या प्रमाणात रक्कम आपल्या बँक खात्यावर जमा केली जाईल. ही रक्कम डीबीटी च्या सहायाने जमा केली जाईल.

योजनेचा कालावधी

पीएम इंटरशिप (pm internship) योजनेसाठी एकूण 12 महिने कालावधी देण्यात आलेला आहे. अर्जदारांना या ठिकाणी बारा महिन्याकरिता मानधन वितरित केलं जाईल. बारा महिन्यानंतर या तरुणांची कालावधी व इंटरशिप नोंदणी समाप्त होईल. व तिथून पुढे नोंदणीकृत बेरोजगार तरुणांना कसल्याही प्रकारचं शासनाकडून मानधन वितरित केलं जाणार नाही.

pm internship

याचा मुख्य फायदा काय

बऱ्याच तरुणांच्या मनात हा प्रश्न निर्माण आला आहे की यामध्ये नोंदणी करून 5000 महिना मिळेल, परंतु 5000 हजार रुपये महिन्यांमध्ये त्या तरुणांचं घर खर्च असेल किंवा वैयक्तिक खर्च असेल हा कसा भागेल.

पीएम इंटरशिप यामध्ये मुख्य फायदा हा तुमचं पाच हजार रुपये मानधन नसून तुम्हाला इंटरशिप योजनेअंतर्गत कंपनीकडून प्रशिक्षण सर्टिफिकेट मिळेल. त्यासोबतच प्रशिक्षण देखील मिळेल या प्रमाणपत्र आणि अनुभवाच्या जोरावर . आपण अन्य कंपनीमध्ये किंवा आपण ज्या कंपनीमध्ये इंटरशिप केली आहे त्याच कंपनीमध्ये आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल. आपल्या गुणवत्तेनुसार व आपल्या कौशल्यानुसार आपण ज्या कंपनीत इंटरशिप केली आहे तीच कंपनी आपल्याला रोजगाराची संधी देखील भविष्यात उपलब्ध करून देऊ शकते.

हे वाचा: पीएम इंटरशिप योजना अशी करा नोंदणी.

नोंदणी साठी अधिकृत संकेतस्थळ. येथे क्लिक करा.

1 thought on “केंद्र सरकारची सुपरहिट योजना येथे नोंदणी करा आणि मिळवा 5000 रुपये महिना. pm internship.”

Leave a comment