25 ऑक्टोबर पासून होणार 21 वी पशुगणनेला सुरुवात, पहा सविस्तर माहिती. pashu janganana 2024 maharashtra

pashu janganana 2024 maharashtra ज्याप्रमाणे नागरिकांचे जनगणना असते, त्याचप्रमाणे पशुची देखील होत असते. यावर्षीची गणनाही स्मार्टफोनवर केले जाणार आहे. त्यामुळे गोठ्यातल्या गायी, खुराड्यातील कोंबड्या आणि तबेल्यातील घोडे यांची माहिती स्मार्टफोनवर केली जाणार आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मागीलवर्षीची पशुगणना

पाच वर्षा अगोदरची 20 वी पशु गणना झाली त्यावेळेस प्रगणकांना टॅब देण्यात आले होते. त्यावर माहिती भरून घेतलेली होती. अशी पशुगणनाची माहिती मागच्या पशु गणनेच्या वेळेस देण्यात आलेली होती .

pashu janganana 2024 maharashtra यावर्षीची पशु गणना

21 वी पशु गणना 25 ऑक्टोंबर 2024 पासून सुरू होणार आहे. यावर्षीच्या पशुगणनेत पशुधन मोबाईल द्वारे गणले जाईल. यावर्षी मोबाईलवर माहिती भरावी लागणार आहे. प्रगणकांना मोबाईल वापरायचा वेगळाच मोबदला दिला जाणार आहे. यावर्षीची पशुगणना करण्यासाठी 3 हजार घरामागे एक प्रगणक नेमण्यात आले आहेत. शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना या सर्वेक्षणात प्राधान्य दिले गेले आहेत. तसेच यावर्षीच्या पशु गणनासाठी प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी, पदवीधारक विद्यार्थी प्रगणक म्हणून या कार्यक्रमात सहभागी होत आहे.

हे वाचा: निधी मंजूर असून देखील का होतोय कापूस सोयाबीन अनुदान वाटपास विलंब


या पशु गणना मोहिमेत गाय वर्ग म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, कुक्कुट, वराहा ,पाळीव कुत्री, भटकी जनावरे, पशुपालन यासाठी वापरले जाणारे यंत्र सामग्री याची पशु गणना केली जाते . गणना केल्या नंतर या आधारावरच सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात.तसेच निधीची उपलब्धता आहे केली जाते.

पाळीव पशु गणनेस सुरुवात

pashu janganana 2024 maharashtra वर्ष 1919 मध्ये पाळीव पशु मोजनीला ला सुरुवात झाली. त्यावर्षीपासून दर पाच वर्षाला ही पशु गणना केली जात आहे. पशुपालनाच्या क्षेत्रात विविध योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महत्वाची ठरत आलेली आहे. पशुगणनेच्या माध्यमातून दर पाच वर्षाला दारोदारी जाऊन केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणामार्फत देशातील पाळीव पशु-पक्ष्यांबाबत संपूर्ण माहिती गोळा केली जाते.

संपूर्ण माहिती ,खरी माहिती द्याआणि सहकार्य करा

ज्यावेळेस पशु गणनाची माहिती घेण्यासाठी प्रगनक येतात ,ते आल्यानंतर त्यांना नागरिकांनी संपूर्ण माहिती खरी माहिती द्यावी.जेणेकरून त्या माहितीच्या आधारे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहेत,त्यानुसार लसीकरण औषधाचा पुरवठा केला जातो.त्यामुळे नागरिकांनी चुकीची माहिती देऊ नये याची दक्षता घ्यावी.आणि सर्व नागरिकांनी पशुगणनेसाठी सहकार्य करावे,असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलेली आहे.

Leave a comment