पेन्शन धारकांसाठी महत्वाची माहिती या तारखेच्या आत सादर करावे लागेल जीवन प्रमाणपत्र. Jeevan Praman Patra

पेन्शन धारकांनी आपले जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे? Jeevan Praman Patra

सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील पेंशनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करणे अत्यंत महत्वाचे असते. जीवन प्रमाणपत्र सादर केले तरच पेंशनधारकांची पेंशन चालू राहते. आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अनेक ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय उपलब्ध झाले आहेत, ज्यामुळे ही प्रमाणपत्र सादर करणे प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

जीवन प्रमाणपत्र म्हणजे नेमक काय?

जीवन प्रमाणपत्र म्हणजे पेंशनधारक हे जिवंत आहेत हे प्रमाणित करणारा कागदपत्र. पेंशनधारकांनी प्रत्येक वर्षी हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते, जेणेकरून त्यांच्या बँक खात्यावर पेंशन जमा होत राहते. यामुळे पेंशन व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण होते.

हे पण वाचा:
Mofat pithachi Girani Yojana
Mofat pithachi Girani Yojana :या महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी ! असा करा अर्ज…!

जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख

देशातील पेंशनधारकांना जीवन प्रमाणपत्र दरवर्षी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान सादर करणे आवश्यक आहे. जर पेंशनधारकांनी या तारखेपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही, तर त्यांच्या पेंशन वितरणात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे, पेंशन नियमित सुरू ठेवण्यासाठी पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र वेळेत सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.

जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे? Jeevan Praman Patra

जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रमुख 2 पद्धती आहेत – ऑनलाइन आणि ऑफलाइन.

1. प्रमाणपत्र सादर करण्याची ऑफलाइन पद्धत

Jeevan Praman Patra ऑफलाइन पद्धतीत पेंशनधारकांना आपले जीवन प्रमाणपत्र प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन सादर करावे लागते. त्यासाठी जवळच्या पेंशन वितरण कार्यालयात, पोस्ट ऑफिसमध्ये, बँकेमध्ये किंवा सरकारी सेवकांसाठी असलेल्या प्रमाणपत्र केंद्रावर जाऊन सादर करावे लागते. येथे त्यांचे प्रमाणीकरण केले जाते आणि ते संबंधित खात्यात अपलोड केले जाते.या पद्धतीने पेन्शन जीवन प्रमाणपत्र सादर केले जाते.

हे पण वाचा:
PM kisan new update PM kisan new update किसान सन्मान निधी योजना – नवीन अपडेट मे 2025

2. प्रमाणपत्र सादर करण्याची ऑनलाइन पद्धत (Jeevan Pramaan पोर्टलद्वारे)

ऑनलाइन पद्धतीत, केंद्र सरकारच्या जीवन प्रमाण (Jeevan Pramaan) अँन्ड्रॉईड अॅप चा वापर करून देखील डिजिटल प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करता येते.

अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

  • स्टेप 1: प्रथम, पेंशनधारकांनी जीवन प्रमाण ऍप्लिकेशन (Jeevan Pramaan Application) डाऊनलोड करावे.
  • स्टेप 2: आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर OTP येईल, ज्याने पेंशनधारक लॉगिन करू शकतील.
  • स्टेप 3: त्यानंतर, फिंगरप्रिंट (बायोमॅट्रिक) स्कॅनरच्या सहायाने प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • स्टेप 4: प्रक्रिया पूर्ण झाल्यावर डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार होईल आणि संबंधित पेंशन वितरण कार्यालयात ते ऑनलाइन पद्धतीने आपोआप सादर केले जाईल.

आधार कार्डद्वारे डिजिटल प्रमाणपत्र

जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आधार कार्डची महत्वचे असते. आधार कार्डचा वापर केल्याने पेंशनधारकांना आपले प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने सादर करता येते. यामुळे पेंशनधारकांना कार्यालयात जाण्याची गरज लागत नाही आणि प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाते.

हे पण वाचा:
ladki bahin yojana ladki bahin yojana :लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आज पासून एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात…

हे वाचा: लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता नोव्हेंबर मध्येच

जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे

  • प्रमाणपत्र वेळेवर सादर करा: जीवन प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यास पेंशन मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
  • नेहमी नवीन अपडेट्स तपासा: जीवन प्रमाणपत्र संबंधित नवीन नियम आणि सुविधा नेहमी बदलत राहतात. त्यामुळे दरवर्षी नव्या अपडेट्स बद्दल माहिती ठेवा. जीवन प्रमाणपत्र सादर करताना नवीन नियमनुसारच सादर करा.
  • ऑनलाइन प्रक्रिया वापरा: ऑनलाइन प्रक्रिया वापरल्यास व्यक्तीचा वेळ आणि कष्ट देखील वाचतात.

याप्रमाणे, पेंशनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आता अधिक सोपे आणि सुलभ झाले आहे. पेंशन चालू ठेवण्यासाठी हे प्रमाणपत्र दरवर्षी 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान सादर करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे पेंशनधारकांनी योग्य पद्धतीचा वापर करून हे प्रमाणपत्र वेळेत सादर करणे अवश्यक आहे.

हे पण वाचा:
panjabrao dakh panjabrao dakh :राज्यात अवकाळी पावसाचा इशारा..! पंजाबराव डखयांच्याकडून शेतकऱ्यांसाठी सावधगिरीची सूचना…

3 thoughts on “solar update: तुम्हाला सोलर पंप योजनेत मोबाईल नंबर अपडेट चा मेसेज आला आहे का? मंग लवकरच करा हे काम…!”

Leave a comment

Close VISIT MN CORNERS