shetkari karj mafi शेतकरी कर्ज माफी कधी कृषि मंत्र्याने दिली सर्व माहिती.

shetkari karj mafi कर्जमाफीबाबत निर्णयासाठी वाट पाहणार, लाडकी बहीण योजनेचा तिजोरीवर ताण – माणिकराव कोकाटे

shetkari karj mafi राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज माफी करा या साठी अनेक शेतकरी संघटना तसेच शेतकरी यांची मागणी आहे. निसर्गातील बदलामुळे तसेच नैसर्गिक आपत्ति मुळे राज्यातील शेतकऱ्यांना नेहमीच फटका बसत आहे. तसेच शेतमालाला स्थिर दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिति खालावली आहे. या व आशा विविध कारणामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. शेतकऱ्याची कर्ज बाजारीपन दूर करण्यासाठी सरकार कडून शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी अशी मागणी वारंवार केली जात आहे.

महायुती सरकार ने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राज्यातील शेतकाऱ्यांची कर्ज माफी करणार अशी घोषणा केली होती. त्या वर महायुतीला खूप मोठ्या प्रमाणावर निवडणुकीती जागा जिंकता आल्या आहेत. बहुमताने स्थापन झालेले सरकार शेतकऱ्यांचा कधी विचार करते आणि दिलेला शब्द कधी पूर्ण करते याची शेतकऱ्यांमधी आस लागलेली आहे. यातच राज्याचे नव निर्वाचित कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक खुलासा केला आहे. त्यातून राज्यातील शेतकऱ्यांना कधी कर्ज माफी मिळेल या बद्दल त्यांनी माहिती दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
farmer crop loan farmer crop loan शेतकरी ओळखपत्र धारकांना मिळणार कर्ज!

shetkari karj mafi राज्याच्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी साखर संकुल येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि महिला योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला असून आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

shetkari karj mafi कर्जमाफीचा निर्णय पुढे ढकलण्याचे कारण

राज्याच्या तिजोरीवर सध्या मोठा आर्थिक ताण आहे. लाडकी बहीण योजना लागू केल्यामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडला आहे. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती चांगलीही नाही आणि वाईटही नाही, असे मंत्री कोकाटे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी आर्थिक परिस्थिती स्थिर होताच चार ते सहा महिन्यांत कर्जमाफीसाठी योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

shetkari karj mafi लाडकी बहीण योजणेमुळे राज्याची आर्थिक स्थिति स्थिर नसल्यामुळे शेतकरी कर्ज माफी लांबवण्यात येणार आहे. ज्या वेळी राज्याच्या तिजोरीवर चांगले दिवस येतील त्या वेळी दिलेला शब्द पाळला जाईल. राज्याची तिजोरी भरभक्कम होईल त्या वेळी राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याबाबत योग्य निर्णय घेऊन कर्ज माफी करू. अशी माहिती कृषि मंत्री यांनी दिली आहे.

हे पण वाचा:
women loan scheme women loan scheme: व्यवसायासाठी महिलांना 3 लाख रुपयापर्यंत मिळणार कर्ज…

शेतकऱ्यांसाठी आश्वासन

मंत्री कोकाटे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय सहकार विभागाशी संबंधित आहे, मात्र कृषी खात्याने याबाबतची माहिती मागवण्याचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने या प्रश्नावर गांभीर्याने विचार सुरू केला आहे. यावर सविस्तर माहिती घेऊन आढावा घेऊन शेतकरी कर्ज माफी या बद्दल योग्य निर्णय घेतला जाईल.

लाडकी बहीण योजनेचा आर्थिक परिणाम

shetkari karj mafi लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी मोठा लाभदायक उपक्रम ठरला असला तरी त्याचा सरकारी तिजोरीवर ताण पडला आहे. त्यामुळेच राज्य सरकारला इतर योजनांवर खर्च करताना सावधगिरी बाळगावी लागत आहे.

महिलांसाठी दोन योजनांमध्ये निवड करणे बंधनकारक

महिला लाभार्थ्यांना एकाच वेळी दोन योजनांचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच महिलांनी लाडकी बहीण योजना किंवा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना यांपैकी एक योजना निवडावी लागेल.
मंत्री कोकाटे यांनी सांगितले की, महिलांनी स्वतःचा निर्णय घेऊन त्यांना योग्य वाटणाऱ्या योजनेचा लाभ घ्यावा.

हे पण वाचा:
cmegp loan cmegp loan: तरुणांना मिळणार 50 लाख रुपयापर्यंत कर्ज: असा मिळवा लाभ.

हे वाचा: नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना फटका

महिला मजुरांचा प्रश्न

shetkari karj mafi राज्यं सरकार ने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना सरू करून महिलांना प्रती महिना 1500 रुपये महिना वाटप करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यामुळे बहुतांश महिलांनी शेतीच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शेती कामगारांची कमतरता भासत असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. मात्र, महिलांवर प्रत्येक कामासाठी अवलंबून राहणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महिला आरक्षण विधेयकाची घोषणा

राज्यातील महिलांसाठी आणखी एक मोठी घोषणा करताना कोकाटे यांनी सांगितले की, 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी महिला आरक्षण विधेयक मंजूर होईल. यामुळे महिलांना राजकारणात आणि निर्णय प्रक्रियेत अधिक संधी मिळेल.

हे पण वाचा:
Home Loan EMI Calculator Home Loan EMI Calculator घर घेण्यासाठी 50 लाखाचं गृह कर्ज घेतल्यास किती EMI द्यावा लागेल, पहा सविस्तर

शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध आहे. मात्र, सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कर्जमाफीचा निर्णय काही महिने पुढे ढकलण्यात आला आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे तिजोरीची स्थिती सुधारल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे आश्वासन कृषिमंत्री कोकाटे यांनी दिले.

कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या या महितीमुळे, कर्ज माफी निर्णयाची वाट पाहत असलेला शेतकरी आता चिता करायला लागला आहे. सरकार स्थापन झाल्यावर सरकार नक्कीच शेतकऱ्यांना मदत करेल व शेतकऱ्यांना कर्ज माफी देईल अशी अपेक्षा होती. कृषि मंत्री यांनी दिलेल्या या माहितीवरून शेतकऱ्यांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे.

सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या हिताचा आहे, मात्र सध्याच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी थोडी उशिराने होणार आहे.

हे पण वाचा:
Asmita Loan Asmita Loan :आता महिलांना मिळणार कमी दरात विना गॅरंटीचं लोन; SBI ने आणलं नारी शक्ति कार्ड

Leave a comment