ladki bahin 2100 महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना देणार असल्याची घोषणा आपल्या जाहीरनाम्यात केली होती. जाहीरनाम्यातील घोषणाची अंमलबजावणी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात करेल अशी अपेक्षा राज्यातील सर्वच पात्र लाडक्या बहिणींना होती. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान विभागाच्या मंत्री माननीय अदिती तटकरे यांनी 2100 रुपये कधी देणार याबाबतची स्पष्टताच केली आहे.

सरकारने जाहीर केलेल्या जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो; त्यामुळे जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली 2100 रुपयाची अंमलबजावणी योग्य वेळी केली जाईल अशी माहिती देखील अदिती तटकरे यांनी दिली आहे.
लाडकी बहीण सावत्र झाली का? ladki bahin 2100
लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान देण्याबाबतच्या घोषणेवर आणि महिला अपात्र करण्याच्या प्रक्रियेवर विरोधकांनी अधिवेशनात चांगला जोर धरला. राज्यातील लाडक्या बहिणीचे मते घेऊन सतेत आलेले महायुती सरकार लाडक्या बहिणींना अपात्रतेचे निकष आता का लावत आहे? असा प्रश्न देखील विरोधकांनी यावेळी मांडला. त्यासोबतच अर्जाची छाननी करून लाभ देणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आहात का? अशी माहिती देखील यावेळी विचारली? निवडणुकीपूर्वी लाडकी असलेली बहीण आता सावत्र का असा प्रश्न देखील शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि कॉँग्रेस चे आमदार सतेज पाटील यांनी सभागृहात मांडला.
काय म्हणाल्या अदिती तटकरे
अधिवेशनीय सभागृहात विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देताना मंत्री अदिती तटकरे यांनी पुढील माहिती दिली. ladki bahin 2100 जाहीरनाम्यात 2100 रुपये देण्याची घोषणा केली परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनताच देऊ अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो अशी माहिती दिली आहे. महिलांना अपात्र करण्याची प्रक्रिया जशी इतर विभागाकडून माहिती प्राप्त होते त्या नुसार त्यावर कार्यवाही केली जात आहे. सुरवातीला शासनाने निर्गमित केलेल्या नियम व अटी नुसारच या महिलांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महिलांना एक सोबत दोन महिन्याची रक्कम
फेब्रुवारी महिन्याची रक्कम वितरित करण्यास विलंब झाला. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्याच्या प्रक्रियेत मार्च महिना उजाडला असून महिलांना आता एक सोबत दोन्ही महिन्याचे पैसे वितरित केले जाणार आहेत. राज्यातील लाडकी बहीण योजनेत पात्र असणाऱ्या महिलांना एक सोबत 3000 रुपये वितरित केले जाणार आहे.