Kharipf Pik Vima 2024: शेतकऱ्यांना दिलासा अखेर पिक विमा वाटप सुरु..!

Kharipf Pik Vima 2024 : शेतकऱ्यांना दिलासा अखेर पिक विमा वाटप सुरु..!मागील बऱ्याच दिवसापासून पिक विम्याचा विषय चर्चेचा आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 31 मार्च 2025 पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा जमा केले जाईल असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 31 मार्च 2025 पूर्वी पिक विमा जमा होईल अशी अपेक्षा लागली होती. परंतु या दिल्या आश्वासनानुसार पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा रक्कम जमा केली नाही. त्यानुसार शेतकऱ्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. शेतकऱ्यांना पिक विमा कधी मिळणार? कंपनी कोणत्या शेतकऱ्यांना पिक विम्याचा वाटप करणार? शासनाने रक्कम मंजूर करून देखील कंपनी का पिक विमा वाटप करत नाही? शेतकऱ्यांना किती पिक विमा मिळणार? असे विविध प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाले होते.

Kharipf Pik Vima 2024

अखेर पिक विमा वाटप सुरु…

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पिक विमा (Kharipf Pik Vima 2024) रक्कम वाटप करण्याबाबत शासनाने शासन निर्णय निर्गमित केला होता. या पीक विम्याचे वाटप आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर करण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मागील आठ दिवसापासून डीबीटीच्या अंतर्गत पीक विमा रक्कम जमा केली जात आहे. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विम्याची मिळाली रक्कम देखील अत्यंत कमी मिळाल्या असल्यामुळे शेतकऱ्यांचे मनात नाराजी निर्माण झाली आहे.

खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते. पीक नुकसान झालं जी तक्रार शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीने देखील दिली होती. या तक्रारीच्या कंपनीकडून पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची प्रक्रिया राबवली गेली. शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना भरपाई मात्र खूपच कमी मिळाली आहे. अशा अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. Kharipf Pik Vima 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
pik vima arj 2025 pik vima arj 2025 पीक विमा योजनेकडे राज्यभरातील शेतकऱ्यांची पाठ: कारणे आणि परिणाम

हे वाचा : लाडक्या बहिणींना कधी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता..! या महिलांना मिळणार 3000 ?

महसूल मंडळानुसार रक्कम वेगवेगळी

राज्यातील शेतकऱ्यांना पिक (Kharipf Pik Vima 2024) विमा वाटप सुरू झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम देखील जमा झाली आहे. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम कमी मिळाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. याबद्दल पिक विमा कंपनी यांच्याकडे चौकशी केली असता पिक विमा कंपनीने प्रत्येक महसूल मंडळानुसार मिळणारे रक्कम ही वेगवेगळी असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या महसूल मंडळातील नुकसान जास्त आहे त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भरपाई देखील जास्त दिली जात आहे. ज्या महसूल मंडळातील नुकसान कमी झाले आहे त्या महसूल मंडळाला नुकसान भरपाई देखील कमीच वितरित केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही महसूल मंडळानुसार वेगवेगळी असल्याचे पिक विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक यांनी सांगितले. Kharipf Pik Vima 2024

तुम्हाला पिक विमा मिळाला का?

पिक वाटप सुरू झाले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही किंवा आपल्याला मिळणार आहे की नाही याची कल्पना नाही. ज्या शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पिक विमा आपल्या बँक खात्यावर जमा झाला नाही त्यांनी खालील पद्धतीने आपले स्टेटस (Kharipf Pik Vima 2024) चेक करावे.

हे पण वाचा:
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: फक्त 20 रुपयात मिळणार 2 लाखाचे विमा संरक्षण, संकटात बनेल मोठा आधार!अर्ज कसा करायचा?
  • सर्वप्रथम आपल्याला प्रधानमंत्री फसल बीमा योजना च्या अधिकृत https://pmfby.gov.in/ संकेतस्थळावर जावे लागेल.
  • या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्यासमोर फार्मर कॉर्नर असा टॅब दिसत.
  • फार्मर कॉर्नर या टॅब वर क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉगिन विथ फार्मर हा पर्याय निवडावा लागेल.
  • हा पर्याय निवडून नंतर आपल्याला अर्ज सादर करताना दिलेला मोबाईल नंबर भरावा लागेल.
  • मोबाईल नंबर भरल्यानंतर त्या मोबाईल क्रमांक वर एक ओटीपी येईल तो ओटीपी भरावा लागेल.
  • ओटीपी भरल्यानंतर आपल्यासमोर आपण केलेल्या पिक विमा अर्जाची माहिती दाखवली जाईल.
  • यामध्ये आपल्याला खरीप 2024 या पर्यावर क्लिक करून आपल्याला पिक विमा कंपनीकडून किती रक्कम मिळणार आहे किंवा मिळाली आहे याची सविस्तर माहिती दिसेल. Kharipf Pik Vima 2024

Leave a comment