कापूस सोयाबीन अनुदान सहमति अर्ज
कापूस सोयाबीन अनुदान सहमति अर्ज
महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5000 रुपये अनुदान देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती.
या मध्ये शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5000 रुपये जास्तीत जास्त 2 हेक्टर च्या मर्यादेत देण्यात येणार आहेत.
कापूस व सोयाबीन पिकाचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यासाठी शेतकऱ्यांना आता आपले सहमति पत्र भरून देण्याच्या सूचना राज्य सरकार कडून देण्यात आल्या आहेत.
राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन व कापूस पिक घेतले होते व त्या पिकाची नोंद ई पिक पाहणी अंतर्गत आपल्या सातबारेवर नोंदवली होती अश्या शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. कापूस सोयाबीन अनुदान सहमति अर्ज: kapus soyabean anudan form pdf
शेतकऱ्यांना सहमति पत्र भरून देणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आता सहमति पत्र भरून आपल्या भागातील कृषि सहायक यांच्याकडे जमा करावे लागणार आहे.
ज्या शेतकऱ्यांचे सामायिक खाते आहे अश्या शेतकऱ्यांना सामायिक खाते ना हरकत प्रमाणपत्र भरून द्यावे लागणार आहे.
प्रमाणपत्र डाउनलोड करा
आधार सहमति पत्र डाउनलोड करा
सामायिक क्षेत्र ना हरकत प्रमाणपत्र
फॉर्म कसा भरावा.
कापूस सोयाबीन अनुदान सहमति अर्ज: kapus soyabean anudan form pdf
आधार सहमति पत्र फॉर्म
- आपला जिल्हा भरा त्या नंतर आपला तालुका भरा व आपले गाव भरा.
- पहिले नाव मधले नाव आडनाव (मराठी मध्ये जसे आधार कार्ड वर आहे तसेच)
- पहिले नाव मधले नाव आणि आडनाव (इंग्लिश मध्ये जसे आधार कार्ड वर आहे तसेच)
- आधार क्रमांक (व्यवस्थित भरा चूकवु नका)
- शेतकऱ्याचा मोबाइल क्रमांक
- दिनांक भरा ज्या दिवशी अर्ज अर्ज जमा करणार आहात तो दिनांक नमूद करा.
- अर्जदाराचे नाव व सही करा.
सामायिक खाते सहमति पत्र
- जिल्हा तालुका व गाव भरा
- अर्जदाराचे नाव मराठी व इंग्लिश मध्ये भरा. (जसे आधार वर आहे तसेच )
- आधार क्रमांक भरा
- मोबाइल क्रमांक भरा
- त्या नंतर खाली दिलेल्या राखण्यात आपले सामायिक असणारे खातेदार यांची माहिती भरा. आणि त्या समोरील बॉक्स मध्ये त्या खतेदारची सही घ्या.
फॉर्म भरून कोठे जमा करावा.
हा अर्ज भरल्यानंतर आपल्याला हा अर्ज आपल्या कृषि सहायक यांच्याकडे जमा करावा लागेल.
टीप : हा अर्ज जर भरला तरच आपल्याला आपले अनुदान जमा होणार आहे. त्या मुळे सर्व शेतकऱ्यानी हा अर्ज लवकरात लवकर भरावा.
ज्यांचे यादीत नाव नाही त्यांनी काय करावे
सोयाबीन व कापूस पिकाच्या अनुदान याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याधी मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे नाव नाही अश्या शेतकऱ्यांनी आपला तक्रात अर्ज आपल्या कृषि सहाय्यक किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे जमा करणे करावे.
तक्रार अर्ज फक्त ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये आपल्या शेतात सोयाबीन किंवा कापूस पीक घेतले होते आणि त्या पिकाची ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे. जर ई पीक पाहणी केली असेल तरच आपला अर्ज स्वीकारला जाईल.
4 thoughts on “कापूस सोयाबीन अनुदान सहमति अर्ज: kapus soyabean anudan form pdf”