farmer anudan : कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5000 रुपये हेक्टरी अनुदान

farmer anudan : कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5000 रुपये हेक्टरी अनुदान

   अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य सरकार कडून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली होती. त्या बाबतचा शासन निर्णय दिनांक 29 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शासन निर्णयांच्या माध्यमातून कोणते शेतकरी पात्र असणार व किती प्रमाणात लाभ वितरित केला जाणार हे स्पष्ट केले. कोणते शेतकरी पात्र याची सविस्तर माहिती आपण पाहुयात.  farmer anudan

ई पीक पाहणी 2024 – कशी नोंदवावी

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
farmer anudan
  1. राज्यातील 2023 खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या सर्व  शेतकऱ्यांना 1000 रुपये देण्यात येतील. 
  2. 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5000 रुपये प्रमाणे अनुदान वितरित करण्यात येईल. 
  3. या मध्ये जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. 
  4. ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये ई पिक पाहणी अंतर्गत आपल्या सोयाबीन व कापूस पिकाची नोंद केलेली आहे अश्याच शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. 
  5. या योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना डीबीटी च्या सहाय्याने देण्यात येणार आहे. 
  6. हे अनुदान फक्त खरीप 2023 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. 

farmer anudan 

हे शेतकरी असणार पात्र

  • ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023  मध्ये सोयाबीन किंवा कापूसाचे पिक घेतले होते. 
  • खरीप हंगाम 2023 मध्ये ई पिक पाहणी मध्ये सोयाबीन किंवा कापूस पिकाची नोंद केलेली आहे. 
  • पात्र शेतकऱ्यांनी जेवढ्या क्षेत्राची नोंद ई पिक पाहणी अंतर्गत केली आहे तेवढ्या क्षेत्राला अनुदान वितरित केले जाणार आहे. 

हे शेतकरी असणार अपात्र

  • ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केली नाही असे शेतकरी 
  • ज्या शेतकाऱ्यांकडे खरीप 2023 मध्ये कापूस किंवा सोयाबीन पिक नाही असे शेतकरी या पासून वंचित राहणार आहेत.
  • खरीप 2023 मध्ये सोयाबीन कापूस पिक होते परंतु ई पिक पाहणी अंतर्गत नोंद केली नाही. 
  • फळबाग व अन्य पिक लागवड केलेले शेतकरी. 
  • ई पिक पाहणी अंतर्गत सोयाबीन व कापूस पिक सोडता अन्य पिकाची नोंद असणारे शेतकरी देखील या पासून वंचित राहणार आहेत. 

3 thoughts on “farmer anudan : कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5000 रुपये हेक्टरी अनुदान”

Leave a comment

Close Visit Batmya360