Aaple sarkar portal : राज्यातील नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देणारे आपले सरकार पोर्टल सध्या बंद करण्यात आले आहे. आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल का बंद करण्यात आली आणि किती दिवसापर्यंत बंद राहणार आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांचे मनात निर्माण झालेला आहे.
सरकारच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल सुरू केले. या पोर्टलच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सेवा उपलब्ध केल्या जातात. या फोटोच्या माध्यमातून नागरिकांना जलद गतीने सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रत्येक कागदपत्रासाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता लागू नये. ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना या सुविधा उपलब्ध व्हाव्यात; म्हणून सरकारने आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल लॉन्च केले होते. यामध्ये प्रामुख्याने नागरिकांना आधार कार्ड, पॅन कार्ड, जॉब कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट, मतदान कार्ड , उत्पन्न प्रमाणपत्र यासारखे आणि इतरही कागदपत्रे या पोर्टलच्या माध्यमातून वितरित केले जातात.aaple sarkar portal

पोर्टल का बंद झाले
आपले (aaple sarkar portal) सरकार सेवा केंद्र पोर्टल पुढील पाच दिवसासाठी बंद करण्यात आलेले आहे. म्हणजे 10 एप्रिल 2025 पासून ते 14 एप्रिल 2025 पर्यंत आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल हे बंद राहणार आहे. हे पोर्टल राज्यातील सुविधा उपलब्ध करण्यासाठी अतिशय लोकप्रिय झाले आहे. या पोर्टलचा वापर देखील खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक करत आहेत. या पोर्टलला अपडेट करण्याची आवश्यकता असल्याने हे पोर्टल अपडेट करण्यासाठी पुढील पाच दिवस पोर्टल बंद ठेवण्यात येणार आहे. पोर्टलमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व सुधारणा करून आणि पोर्टल अपडेट करून. परत नागरिकांच्या सुविधेमध्ये उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती पोर्टलच्या संचालक महाआयटी या विभागांनी दिलेली आहे. aaple sarkar portal
हे वाचा : शेतकरी ओळखपत्र काढले का ? तरच मिळेल शासकीय योजनांचा लाभ.
पोर्टल अधिक कार्यक्षम बनवणे
आपले सरकार सेवा केंद्र पोर्टलवर अनेक नागरिक अर्ज सादर करतात. या पोर्टलमध्ये नागरिकांची संख्या वाढल्यामुळे पोर्टलला अधिक कार्यक्षम पद्धतीने बनवणे आवश्यक होते. पोर्टलवर वारंवार निर्माण होणाऱ्या अडचणीमुळे पोर्टल व्यवस्थित चालत नव्हते. ज्यामुळे नागरिकांना सुविधा मिळवण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. या सर्व समस्यांचा विचार करता महायुती विभागाने पोर्टल अद्यावत करण्याबाबत निर्णय घेतला.
पोर्टल अद्यावत करताना पोर्टलवर इतर कोणत्याही सुविधा मिळवण्यासाठी अर्ज सादर करता येणार नाही. पोर्टलमध्ये आवश्यक असणारे सर्व बदल पूर्ण झाल्यानंतरच पोर्टल नागरिकांसाठी सुरू केले जाईल. पाच दिवसाचा कालावधी महायुती कंपनीने यासाठी घेतलेला आहे. नागरिकांसाठी 15 एप्रिल 2025 पासून आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल हे सुरळीतपणे सुरू केले जाईल. aaple sarkar portal
आपले सरकार सेवा केंद्र कोणत्या सुविधा मिळतात
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना विविध आवश्यक असणाऱ्या सेवा पुरवल्या जातात. ज्यामध्ये कृषी विभागाशी निगडित असणाऱ्या सर्व सेवा. पशुसंवर्धन ,सहकार विभाग, वित्त विभाग ,वन विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, गृह विभाग ,उद्योग आणि कामगार अशा महत्त्वाच्या असणाऱ्या सुविधा आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना पुरवले जातात. या सर्व विभागाशी संबंधित असणाऱ्या सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना या पोर्टलच्या माध्यमातून पुरवल्या जातात. ज्यामध्ये नागरिकांना महत्त्वाच्या असणाऱ्या सेवांची यादी खालील प्रमाणे:-
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- भूमिहीन प्रमाणपत्र
- अल्पभूधारक प्रमाणपत्र
- रेशन कार्ड नाव नोंदणी
- श्रावण बाळ योजना नाव नोंदणी
- संजय गांधी निराधार योजना नाव नोंदणी
- शेतकऱ्यांची अनुदान केवायसी प्रक्रिया
- मतदान कार्ड
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जात पडताळणी प्रमाणपत्र
- शॉप ॲक्ट लायसन
याव अशा प्रकारच्या विविध प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र पोर्टलच्या माध्यमातून अर्ज सादर करता येतात. आता आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल पुढील पाच दिवसासाठी बंद असणार आहे. पोर्टल अपडेट करून नागरिकांच्या सुविधेसाठी दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी रात्री दहा वाजल्यापासून सुरळीतपणे सुरू केले जाणार आहे. यामधील पाच दिवसांमध्ये नागरिकांना या कोणत्याही सुविधा या पोर्टल च्या माध्यमातून उपलब्ध केल्या जाणार नाहीत. aaple sarkar portal
1 thought on “aaple sarkar portal: आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल बंद? कधी होणार सुरु..”