Ajit Portal : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. इथून पुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनेसाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे. यासाठी अजित पोर्टल (Ajit Portal) नावाच एक संकेत स्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीत सुरू असलेल्या शिबिरात त्यांनी या निर्णयाची घोषणा केली.
माणिकराव कोकाटे यांचा मोठा निर्णय
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. इथून पुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनांसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात येणार आहे. यासाठी अजित पोर्टल (Ajit Portal) नावाचं एक संकेतस्थळ लवकरच कृषी विभागामार्फत उपलब्ध होणार आहे आणि इथून पुढे कृषी विभागाच्या सर्व योजना या संकेतस्थळा (Ajit Portal) च्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.
हे वाचा : विमा अग्रिम मिळणार लवकरच
या अगोदरचे महाडीबीटी शेतकरी पोर्टल बंद होणार का?
तर, माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या या घोषणेनंतर सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असा प्रश्न पडला आहे की या अगोदरचे महाडीबीटी शेतकरी योजन पोर्टल बंद होणार का? तर याबाबत अजून कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही पण, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घोषणेनुसार सर्व महाडीबीटी पोर्टल वरील योजना आता अजित पोर्टल (Ajit Portal) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येण्याची शक्यता आहे.