farmer success story आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल येथील प्रकाश भोयर यांची पारंपरिक धान शेती आहे. या धान शेतीला तिलांजली देत आरमोरी तालुक्यातील प्रकाश भोयर या प्रयोगशील शेतकऱ्यांने पाव एकर शेतामध्ये अद्रक या पिकाची लागवड केलेली आहे. प्रकाश भोयर यांना या पाव एकर अद्रक लागवड शेतातून सुमारे 8 लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे. यासाठी आतापर्यंत या अद्रक लागवड पिकाला दीड लाख रुपये एवढा खर्च आलेला आहे. प्रकाश भोयर यांनी अद्रकीच्या कंदाची लागवड मे महिन्यामध्ये केली होती.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने धनाचेच उत्पादन घेतले जात आहेत. पण मात्र या धनाच्या शेतीतून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फारसा नफा मिळत नाही. या पिकातून शेतकऱ्यांचा सर्व खर्च जाऊन फक्त घर खर्च चालविण्या पुरते पैसे शिल्लक राहतात. आणि खाण्यापुरते धान शिल्लक राहत होते . परत त्यात पावसाने एखाद्या वर्षी दगा दिला तर मग तर, तेवढे पण उत्पन्न होत नसत. धनाची शेती करून प्रगती साधने शक्य नाही. हे लक्षात घेता त्या जिल्ह्यातील काही तुरळक शेतकरी हे नगदी पिकाकडे वळले आहेत. त्या शेतकऱ्यांमधील एक शेतकरी म्हणजे आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल येथील प्रकाश भोयर हा शेतकरी होता .
हे वाचा: आता 100 रुपयांचा बॉन्ड बंद.
farmer success story
भोयर यांचे जावळीत वैरागडा येथील कृषी केंद्र आहे. भोयर यांना शेतीची अगोदरपासूनच बरीच काही माहिती आहे. त्यानंतर त्यांनी अद्रक या पिकाची शेती करण्याचे ठरवले . मग ही शेती कशी केली जाते, याबद्दल माहिती घेण्यासाठी प्रकाश भोयर हे संभाजीनगर जिल्ह्यातील तांबेवाडी येथे त्यांनी भेट दिली. तेथील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मे महिन्यामध्ये प्रयोग म्हणून पाव एकरात अद्रक या पिकाची लागवड केली.
farmer success story अद्रक या पिकाला चांगल्यापैकी कंद येण्यास सुरुवात झाली आहे. सहा महिन्याच्या कालावधीत म्हणजेच डिसेंबर महिन्यात अद्रक काढणीस तयार होते. पण मात्र, भाव बघून अद्रक काढण्याचा कालावधी वाढवता येतो, आपण जेवढा कालावधी वाढवतो, तेवढे जास्त उत्पन्न वाढते, अशी माहिती शेतकरी प्रकाश भोयर यांनी दिली.
धनाच्या शेती त जास्त फार नफा राहिला नाही. धानाची शेती हे फक्त जीवन जगण्याचे साधन बनलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इतर नगदी पिकांकडे वळण्याची गरज आहे. यावर्षी प्रयोग म्हणून पाव एकरात अद्रकाची लागवड केली. पण पुढच्या वर्षी तीन एकरात अद्रकाची लागवड करायची आहे.