(Arvind Kejriwal)मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नाही मिळाला न्यायालयाकडून दिलासा.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना जमीनावरील स्थिगीति हटवण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे.
जो पर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल येणार नाही तो पर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या जामिनावर बुधवार दिनांक 26 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. परंतु सध्या तरी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून कसलाही दिलासा देण्यात आलेला नाही
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मागील 21 मार्च पासून कोठडीत आहेत. त्यांना जामीन मिळवा म्हणून त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने स्थिगीति दिल्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
परंतु सर्वोच्च न्यायालयाने देखील दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर स्थिगीति देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 26 जून 2024 रोजी घेण्यात येईल असेही सांगितले आहे. या मुद्द्याला अनुसरून आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जेल मधील मुक्काम वाढणार यात मात्र शंकाच नाही.
अरविंद केजरीवाल यांना का अटक करण्यात आली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च 2024 रोजी (ED) ने अटक केली. केजरीवाल यांना ईडीने अटक करण्यामागे त्यांनी दिल्ली सरकारच्या 2021 रद्द केलेल्या उत्पादन शुल्काची रचना आणि अमलबजावणी मध्ये भ्रष्टाचार केल्या प्रकरणी आणि अवैद्य गुंतवणूक केल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
अरविंद केजरीवाल सध्या कोणत्या कारागृहात आहेत
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 20 जून 2024 रोजी दिल्लीच्या ट्रायल कोर्टाने जामीन मंजूर केला होता. परंतु दिल्लीच्या उच्च न्यायालयाने 21 जून रोजी याला स्थिगीति दिल्या नंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात ईडीने काय म्हणणे मांडले
20 जून रोजी ट्रायल कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने ट्रायल कोर्टाने दिलेल्या निर्णयावर उच्च न्यायालयात प्रकरण सादर केले. त्यात ईडीने सांगितले की आम्हाला आमचे म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही.
उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू माडल्यानंतर ट्रायल कोर्टाने मंजूर केलेला जमीन रद्द केला.
उच्च न्यायालयाने जामीन याचिका रद्द केल्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत पुढील सुनावणी 26 जून 2024 वार बुधवार रोजी करण्यात येईल अशी सूचना दिलेली आहे.
पुढील सूननवणी मध्ये काय होऊ शकत
सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामीन सुनावणीत पुढील तारीख 26 जून २०२४ दिलेली आहे. या सुनावणी मध्ये देखील अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला जाऊ शकतो. परंतु जर अजून ईडीने आपले मत व्यक्त करत आपली बाजू लाऊन धरली तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जमीन याचिकेवर पुढील सुनावणी तारीख दिली जाऊ शकते.