महिला बचत गट कर्ज व्याज सवलत योजना

महिला बचत गट कर्ज व्याज सवलत योजना

महिला बचत गट कर्ज व्याज सवलत योजना

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   आपण आज महिला बचत कर्ज व्याज सवलत योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत महिला बचत गट कर्ज योजना महाराष्ट्र शासनाचे एक महत्त्वाची योजना आहे जी राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अतिशय फायद्याची आहे. या बचत गटा योजनेमार्फत महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. ज्या महिलांना नवीन व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना कोणाकडून पैसे घेण्याची गरज पडणार नाही. त्या महिलांकरिता राज्य शासनाने बचत गटामार्फत खूप साऱ्या सवलती महिलांसाठी दिलेले आहेत ज्या महिलांचे बचत गट आहेत त्या महिलांना याचा खूप सारा फायदा होणार आहे.

महिला बचत गट कर्ज व्याज सवलत योजना

महिला बचत गट कर्ज व्याज सवलत योजना काय आहे

  • ज्या महिला बचत गटामध्ये सामील आहेत त्या महिलांकरिता या बचत गटामार्फत कमी व्याज दरात कर्ज दिले जाते जेणेकरून त्या महिला एक नवीन व्यवसाय सुरू करण्यास मदत होईल. या बचत गट योजनेअंतर्गत महिलांना लघु उद्योगासाठी आर्थिक सहाय्यता पुरवण्यास मदत होईल
  • या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना 5 लाख ते 20 लाख का पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते  . या कर्जाचा व्याजदर हा चार टक्के प्रति वर्ष आहे आणि परतफेड कालावधी तीन वर्ष आहे.

बचत गट अंतर्गत कोणते व्यवसाय करता येतात आणि त्याला कमी व्याजदरात वाढ सवलत दिली जाते

  •  लोणचं बनवणे
  • पापड बनवणे
  •  सॅनिटरी नॅपकिन बनवणे
  • हॉटेल
  • किराणा दुकान
  •  CSC केंद्र.
  • विमा सेवा केंद्र
  • रसवंती ग्रह
  • लॉन्ड्री व्यवसाय
  • मोबाईल दुरुस्ती
  • पाळणा घर.
  • सोन्याचे  दागिने बनवणे
  • कपडे शिवणे
  • शेती व्यवसाय वस्तू तयार करणे
  • शेतकरी व मेंढी पालन
  • रेशमी उद्योग
  • मशरूम शेती
  • कृषी प्रदर्शन उद्योग
  • पशुखाद्य निर्मिती
  • गांडूळ खत प्रकल्प
  • रोपटे वाटिका
  • दुगंध व्यवसाय.
  • फळ प्रक्रिया उद्योग
  • दुधापासून बनवणारे पदार्थ बनवणे
  •  बेकरी उद्योग
  •  शेवया मशीन
  •  दाल मिल
  • मसाले बनवणे
  •  चटणी काढणी यंत्र
  •  कुक्कुटपालन
  •  मत्स्य पालन
  •  मेणबत्ती तयार करणे
  •  पेपर प्लेट बनवणे
  •  अगरबत्ती बनवणे
  • लाकडी खेळणी बनवणे
  •  झाडू बनवणे
  •  मातीची भांडी बनवणे.
  •    चिनीमाती पासून वस्तू बनवणे.

    अशा प्रकारच्या छोट्या-मोठे व्यवसायासाठी महिलांना बचत गटामार्फत खूप साऱ्या सवलती दिल्या जातात . आणि त्याला अत्यंत कमी प्रमाणात व्याजदर हे उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते.

बचत गट लोन योजनेची उद्दिष्टे

  •  महिलांना स्वयंरोजगार आणि लघु उद्योगासाठी आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे.
  • महिलांना स्वावलंबी बनवून गरीबी कमी करणे
  •  महिलांसाठी स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
  •  ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना बचत गटांना कर्ज पुरवून आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे.
  •  महिलांना पुरुषांच्या बरोबरीने आर्थिक आणि सामाजिक संधीमध्ये सन्मान प्रवेश प्रदान करणे.
  •  महिलांना विविध उद्योगांमध्ये आवश्यक कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण आणि शिक्षण प्रधान करणे.
  •  महिलांना नवीन नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे.

महिला बचत गट कर्ज व्याज सवलत योजना फायदे

  • कर्ज परतफेड करण्यासाठी पुरेशी मुदत दिली जाते.
  •  कर्जावर सवलत व्याजदर आकारला जातो.
  •  या कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेशी मुदत दिली जाते.
  •  महिला बचत गट योजनेअंतर्गत गरिबी कमी करण्यास मदत होईल.
  •  महिलांच्या या योजनेअंतर्गत जीवनमान सुधारेल.
  •  महिलांच्या सक्षमीकरणाद्वारे समाजाचा विकास होतो
  • महिलांमध्ये उद्योगकीय भावना निर्माण करणे आणि त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे.

कर्जाची रक्कम

  •  महिलांना या बचत गट कर्ज सवलत योजनेअंतर्गत बचत गटाला किमान 1 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 20 लाख रुपये कर्ज मिळू शकते.

व्याज दर सवलत

  • महिलांना बचत गटासाठी कर्जाचा व्याजदर सवलत 4% आहे.

कर्जाची परतफेड

  •  महिला बचत गट कर्जाची परतफेड  3 वर्षाच्या कालावधीत करावी लागते.

या कर्जाचा उपयोग

  • या कर्जाचा उपयोग स्वयम रोजगारासाठी आणि लघु उद्योगासाठी केला जाऊ शकतो.
  •  मशिनरी आणि उपकरणे खरेदी
  •  कच्चामाल खरेदी
  •  व्यवसायासाठी जागा भाड्याने घेणे
  •  कर्मचाऱ्या नियुक्ती
  •  प्रशिक्षण आणि शिक्षण.
  •  मार्केटिंग आणि जाहिरात

महिला कर्ज योजनेची अंमलबजावणी

राज्य स्तरावर

 महिला आणि बालविकास विभाग : योजनेच्या अंमलबजावणी आणि देखभाल करण्याची जबाबदारी.

महिला विकास महामंडळ: कर्जपुरवठा करणे आणि वसुलीसाठी बँकांशी समन्वय साधणे

 राज्यस्तरीय समिती: योजनेच्या अंमलबजावणीचे मूल्यांकन करणे आणि आवश्यक ती शिफारस करणे.

जिल्हा स्तरावर

 जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी: योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करणे.

जिल्हास्तरीय समिती: जिल्ह्यातील योजनेच्या अंमलबजावणीचे  मूल्यांकन करणे आणि आवश्यक ती शिफारस

महिला बचत गट कर्ज व्याज सवलत योजना पात्रता

  •  महिला बचत गटातील सदस्य असणे गरजेचे  आहे.
  •  बचत गटातील किमान 50 टक्के सदस्यांनी कर्ज घेणे आवश्यक आहे.
  •  बचत गटातील महिलांचे वय 18 ते 65 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  •  सदस्याच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98,000/-आणि शहरी भागासाठी 1.2 लाखापेक्षा जास्त नसावे.
  •  अर्जदार व्यक्तीचे कोणतेही बँकेची किंवा वित्तीय संस्थेची थकबाकी नसावी
  •  कर्जाचे उद्देश स्पष्ट आणि व्यवहार्य असणे आवश्यक आहे.
  •  गटातील सर्व सदस्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

महिला बचत गट कर्ज व्याज सवलत योजना कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  •  पॅन कार्ड
  •  राशन कार्ड
  •  रहिवासी प्रमाणपत्र
  •   उत्पन्नाचा दाखला
  •   जन्म प्रमाणपत्र
  •  मोबाईल नंबर
  •  ईमेल आयडी
  •  बँक खाते
  •  पासपोर्ट आकाराचे फोटो
  •   व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक
  •  शपथपत्र

बचत गट कर्ज योजना अर्ज करण्याची पद्धत

  •  या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम लाभार्थ्यांनी कर्ज आणि इतर सर्व कागदपत्रासह कर्ज प्रस्ताव मंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज करून सादर करणे आवश्यक आहे.
  • महिला बचत गटाचे लोन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, महिलेने प्रथम तिच्या जवळच्या जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाला भेट दिली पाहिजे.
  •  अर्जावरील सर्व फील्ड पूर्ण करा , आवश्यक कागदपत्रे आणि फॉर्म सबमिट करा.
  •  अर्ज सादर केल्याची पोच पावती देणे आवश्यक आहे.

विचारले जाणारे प्रश्न

  1. महिला बचत गट कर्ज व्याज सवलत योजना अंतर्गत किती कर्ज दिले जाते?
  •  महिला बचत गट योजनेअंतर्गत  किमान 1 लाख आणि जास्तीत जास्त 20 लाख कर्ज मिळू शकते.
  1. महिला बचत गट कर्ज व्याज सवलत योजना  व्याजदर सवलत किती आहे?
  •  महिला बचत गटासाठी कर्जाचा व्याजदर सवलत 4% आहे.
  1. महिला बचत गट कर्जाची परतफेड कालावधी किती आहे?
  •  महिला बचत गट कर्जाची परतफेड कालावधी तीन वर्षाचा आहे.
  1. महिला बचत गट कर्ज योजना अर्ज कसा करावा लागेल?
  • महिला बचत गट कर्ज योजनेसाठी अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज करून सादर करणे आवश्यक आहे..
  •       आणि महिला बचत गट लोन योजनेसाठी महिलेने सर्वप्रथम तिच्या जवळच्या जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाला भेट दिली पाहिजे.

महिला बचत गट कर्ज व्याज सवलत योजना

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Leave a comment