बांधकाम कामगार नवीन नोंदणी बंद: काय आहे कारण पहा. BANDHKAM KAMGAR RAGISTATION

BANDHKAM KAMGAR RAGISTATION : महाराष्ट्र सरकारने राज्यातील इमारत व बांधकाम कामगारांसाठी विविध लाभ देण्यासाठी एक महामंडळ स्थापन केले. या महामंडळाला इमारत बांधकाम व बांधकाम कामगार महामंडळ असे नाव देण्यात आले. या महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील विविध क्षेत्रात बांधकाम कामगार करणाऱ्या कामगारांना विविध योजनेचा लाभ दिला जातो.

बांधकाम कामगार योजनेतून विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येते परंतु सध्या ही नोंदणी बंद करण्यात आलेली आहे. आता नवीन बांधकाम कामगारांची नोंदणी कधी सुरू होईल की बऱ्याच कामगारांच्या मनातील शंका आहे यावरच आज आपण सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करूयात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नवीन बांधकाम कामगार नोंदणी का झाली बंद. BANDHKAM KAMGAR RAGISTATION

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले यामध्ये राज्यात 15 ऑक्टोंबर पासून 23 नोव्हेंबर पर्यंत निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लावण्यात आली आहे या आचारसंहिता काळात शासनाच्या कोणत्याही योजनेचा आर्थिक लाभ किंवा इतर काही लाभ नागरिकांना देणे हे आचारसंहितेच्या घटनाबाह्य असल्यामुळे सध्या बांधकाम कामगार च्या नवीन नोंदणी बंद करण्यात आलेला आहे.

आचारसंहिता नियमावलीनुसार ज्या भागात आचार संहिता लावलेली आहे. त्या भागात शासनाच्या कोणत्याही योजनांची प्रचार प्रसिद्धी व लाभ वितरित केला जाऊ नये या प्रकारचे निर्बंध निवडणूक आयोगा कडून लावण्यात आलेले असतात. या नियमांचे पालन करण्यासाठीच इमारत बांधकाम व बांधकाम कामगार योजनेमध्ये नवीन नोंदी असतील किंवा एखाद्या घटकासाठी क्लेम करणे असेल किंवा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करणे असेल, या प्रकारच्या सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार थांबवण्यात आलेल्या आहेत.

नवीन नोंदणी व इतर लाभासाठी कधी अर्ज सुरू होणार.

BANDHKAM KAMGAR RAGISTATION बांधकाम कामगार अंतर्गत आचारसंहितेमुळे नवीन नोंदी थांबवण्यात आले आहेत तर या नवीन नोंदी तसेच इतर लाभासाठी अर्ज करणे किंवा शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी क्लेम करणे याबाबतच्या सर्व घटकांचा लाभ मिळवण्यासाठी आचारसंहिता कालावधी संपल्यानंतरच नवीन नोंदणी किंवा क्लेम सुरू होतील. सध्या तरी या प्रकारचे कोणतेही कार्य बांधकाम कामगार विभागाकडून पूर्ण केले जात नाही. त्यामुळे राज्यातील निवडणुका कार्यक्रम संपल्यानंतरच म्हणजेच नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच या योजनेसाठी नवीन नोंदी व क्लेम करण्यासाठी नवीन अर्ज सुरळीतपणे सुरू होतील.

हे वाचा: बांधकाम कामगार योजनेतून मिळणारे लाभ.

15 ऑक्टोंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत राज्यात आचारसंहिता आहे म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाईल. हा निकाल जाहीर केल्यानंतर एक ते दोन दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल सरकार स्थापन झाल्यानंतर ह्या सर्व नोंदी आणि सर्व अर्ज पूर्ववत पद्धतीने सुरळीत सुरू केले जातील याकरिता ज्या नागरिकांना नोंदणी करायचे आहे त्यांना येत्या 25 नोव्हेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे 25 नोव्हेंबर नंतर या घटकासाठी नवीन अर्ज किंवा क्लेम सादर करू शकता.

Leave a comment