मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना mukhymantri sahayata nidhi

cmrf maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना

   नमस्कार आज आपण आजच्या लेखांमध्ये cmrf maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना विषयी माहिती पाहणार आहोत. ही योजना संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत राज्यांमध्ये पूर, अतिवृष्टी, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तसेच नैसर्गिक संकटामुळे, आपत्तीमुळे मरण पावलेल्या  किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींना किंवा  त्यांच्या वारसदारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत मदत केली जाते.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

    या योजनेअंतर्गत जातीय दंगल, दहशतवादी हल्ला, किंवा अनैसर्गिक संकटामुळे, आपत्तीमुळे मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींना, त्यांच्या वारसदारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत सहाय्यता पुरवली जाते.

     चला तर आज आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधी व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत या योजनेचा अर्ज कसा करायचा कुठे करायचा, आवश्यक  लागणारी कागदपत्रे, पात्रता, अटी व नियम या सर्वांची माहिती पाहणार आहे.  

योजनेचे नाव

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना

लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील आपत्तीग्रस्त, आर्थिक दृष्ट्या गरीब असणारे नागरिक

उद्देश

महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना लवकरात लवकर सहाय्यता पुरविणे तसेच दुखापत झालेल्या व्यक्तींना आजारावर उपचार करण्यासाठी अर्थसहाय्यता पुरविणे.

राज्य

 महाराष्ट्र

विभाग

 आरोग्य विभाग

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना उद्दिष्टे

  •  या योजनेअंतर्गत देशातील तसेच राज्यातील आपत्तीमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे
  •  या योजनेअंतर्गत जातीय दंगलीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसदारास तसेच दुखापत झालेल्या किंवा ज्याच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक मदत करणे.
  •  दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना आर्थिक मदत केली जाते.
  •  या योजनेअंतर्गत (मोटार, रेल्वे, विमान, जहाज अपघात वगळता) अपघाती मरण पावलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक मदत केली जाते.
  •  शैक्षणिक किंवा वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्यासाठी अशांत: आर्थिक मदत करणे

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना आजारांची यादी समाविष्ट

  •  हृदय प्रत्यारोपण
  •  यकृत प्रत्यारोपण
  •  किडनी प्रत्यारोपण
  •  कॉकलियर इम्पलांट
  •  फुफ्फुस प्रत्यारोपण
  •  हाताचे प्रत्यारोपण
  •  बोना मॅरो प्रत्यारोपण
  •  गुडघ्याचे प्रत्यारोपण
  •  हिप रिंप्लेसमेंट
  •  कर्करोग शास्त्रक्रिया
  •  अपघात शास्त्रक्रिया
  •  लहान बालकांचे शास्त्रक्रिया
  •  हृदयरोग
  •  मेंदूचे आजार
  • डायलिसिस
  • कर्करोग (केमोथेरपी/रेडिएशन)
  •  अपघात
  •  नवजात शिशूंचे आजार
  •  गुडघ्यांचे प्रत्यारोपण
  •  बर्न रुग्ण
  •  विदयुत अपघात रुग्ण

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना अंतर्गत अर्थसहाय्य

  •  25 हजार रुपये, 50 हजार रुपये,1 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये आर्थिक मदत करण्यात येईल ही मदत मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारसीनुसार करण्यात येते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना अंतर्गत लाभ दिला जाणार नाही

  •  या योजनेअंतर्गत मोटार, रेल्वे, विमान, जहाज अपघातात मृत्यू झालेल्या अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारचा लाभ दिला जाणार नाही.

cmrf maharashtra पात्रता

  •  मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे मिळवण्यासाठी पात्रता नैसर्गिक आपत्ती म्हणजे जसे पूर, चक्रीवादळ, भूकंप इत्यादी.
  • तसेच या योजनेअंतर्गत अपघात आणि दंगली यावेळी बाधित झालेल्या कुटुंबीयांना मदत. याव्यतिरिक्त योजनेअंतर्गत मुख्य रोग उपचारासाठी अत्यंत आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील रुग्णांना आर्थिक मदत करणे.

आर्थिक दृष्ट्या गरीब असणारे रुग्णालय वैद्यकीय शास्त्रक्रिया/उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिली जाणारी आर्थिक मदत

अंदाजीत खर्च

अर्थसहाय्य

20 हजार रुपये पर्यंत

10 हजार रुपये

20,001/-रुपये ते 49,999/-रुपये पर्यंत

15 हजार रुपये

50 हजार रुपये ते 99,999/- रुपये पर्यंत

20 हजार रुपये

1 लाख रुपये ते 2,99,999/- रुपये पर्यंत

30 हजार रुपये

3 लाख रुपये ते रू.4,99,999/-रुपये पर्यंत

40 हजार रुपये

5 लाख रुपये व त्यापेक्षा जास्त

50 हजार रुपये

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना फायदा

  •  या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना वेगवेगळ्या आजाराच्या उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते.
  •  या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना त्यांच्या आजारासाठी तसेच शास्त्रक्रियेसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची पण गरज पडणार नाही.
  •  जातीय दंगलीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना, जखमी झालेल्या व्यक्तींना तसेच मालमत्तेचे नुकसान झालेल्या व्यक्तींना निकषाचे आधी राहून आर्थिक व अन्य स्वरूपातील मदत दिली जाते.
  •  वेगवेगळे आजार तसेच मेंदू कर्करोग इत्यादी गंभीर रुग्णांच्या विकाराग्रस्त रुग्णांना शस्त्रक्रिया उपचाराकरिता अंशत: अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

cmrf maharashtra आवश्यक लागणारे कागदपत्रे

  •  रुग्णाचे आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  •  विहित नमुन्यातील अर्ज
  •  लहान बाळांसाठी (बाल रुग्णासाठी) आईच्या आधार कार्ड
  •  रुग्णाचे रेशन कार्ड
  •  उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र
  •  उत्पन्नाचा दाखला
  •  तसेच कुटुंबाचे मागील आर्थिक वर्षाची उत्पन्न 1.60 लाखापेक्षा कमी असले पाहिजे
  •  संबंधित आजाराचे रिपोर्ट
  • अपघात झालेला असल्यास, FIR किंवा MLC असणे आवश्यक आहे
  •  ई-मेल आयडी
  •  मोबाईल नंबर
  • मा. आमदार /खासदाराच्या शिफारस पत्र
  •  पासपोर्ट आकाराचे फोटो
  •  वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक
  •  डॉक्टरांची सही शिक्का खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.

अर्ज भरणे अगोदर महत्त्वाच्या सूचना

  •  रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना/आयुष्यमान भारत/राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम/धर्मदाय रुग्णालय इत्यादी कोणत्याही एका योजनेपैकी जर लाभार्थी असल्यास या योजनेचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती संबंधित कागदपत्रे/प्रमाणपत्रे अर्जदाराने स्व साक्षंकित करून सोबत जोडणे अनिवार्य आहे.
  •  या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी जर या अर्जामध्ये खोटी माहिती दिलेली असल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकेल.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाइन

  •  लाभार्थी व्यक्तीने सर्वप्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेच्या अधिकृती संकेतस्थळ वर जावे लागेल.
  •  या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला CMRF वेबसाईटवर तुम्हाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा फॉर्म अर्ज मिळतो तो डाउनलोड करावा लागेल.
  • अर्ज डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडून तू अर्ज व सर्व कागदपत्रे पीडीएफ फाईल फॉरमॅट मध्ये स्कॅन करा.
  •   PDF फाईल स्वतःच्या मेलवरून aao.cmrf-mh@gov.in या mail id वर पाठवा.
  • अशाप्रकारे तुम्ही या योजनेचा ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Leave a comment