Cotton Rate: ओल्या कापसाला बाजारात काय आहे दर, याबद्दल पहा सविस्तर माहिती

पावसामुळे कापसाची गुणवत्ता कमी

Cotton Rate : यवतमाळ जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे कापसाच्या उत्पादनावर मोठा फटका बसला आहे. पावसामुळे कापसाच्या बोंडात ओलावा वाढला आहे, ज्यामुळे कापसाची गुणवत्ता घटली आहे. भिजलेला कापूस साठवला आणि त्या कापसावर दुसऱ्या वेचणीचा आणि तिसऱ्या योजनेचा कापूस टाकला तर भिजलेल्या कापसाबरोबरच पहिला वेचणीचा आणि दुसरा वेचणीचा कापूस खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिला योजनेचा कापूस विक्री करायचे ठरवलेले आहे त्यामुळे बाजारामध्ये ओला कापूस आणण्यावर भर दिला जात आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Cotton Rate: कापसाच्या बाजारात ६८०० रुपयांचा दर

कापसाची विक्री केली जात असताना, पहिल्या वेचणीतील कापसाला पांढरकवडा बाजारात ६८०० रुपयांचा दर मिळाला. हे दर कापसाच्या ओलाव्याच्या प्रमाणानुसार कमी आहेत, तरीही शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा झाला आहे. मॉन्सूनोत्तर पावसामुळे कापसात सुमारे २० टक्के ओलावा आहे, जो कापसाच्या गु णवत्तेला कमी करतो.आणि त्या मुळे कापसाच्या दरात खूप मोठा फटका बसत आहे.

हे वाचा : IDBI बँकेत 1000 जागा भरती.

शेतकऱ्यांचा उत्पादनाचा अंदाज

खैरगाव देशमुख येथील शेतकरी विलास कोटनाके यांनी सांगितले की, त्यांच्या २५ एकरांत कापसाची लागवड आहे. पहिल्या वेचणीमध्ये १५ क्विंटल कापूस मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यांचा अंदाज आहे की, पुढील दोन वेचण्यांमध्ये एकरी सरासरी १० ते ११ क्विंटल कापसाची उत्पादकता मिळेल .कापसाच्या पिकावर पावसाचा परिणाम झाल्यामुळे शेतकऱ्यांना कापसाला कमी भावामध्ये विक्री करावा लागत आहे.Cotton Rate

निष्कर्ष

कापूस या पिकावर पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे.ओलाझालेला कापूस लवकरात लवकर विक्री करावा आणि बाजारातील दरावर योग्य नियोजन करणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. मॉन्सूनोत्तर पावसामुळे कापसाची गुणवत्ता कमी झाल्याने शेतकऱ्यांना कष्टानंतरही अपेक्षित नफा मिळवणे कठीण झाले आहे.

Leave a comment