कापूस साठवणूक बॅग अनुदान : cotton storage bag subsidy

कापूस साठवणूक बॅग अनुदान : cotton storage bag subsidy

  कापूस साठवणूक बॅग अनुदान : cotton storage bag subsidy

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

  भारतातील कापूस उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. देशात गुजरात पाठोपाठ महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी हे कापूस या पिकाचे उत्पादन घेतात.

  याच शेतकऱ्यांना मूलभूत व आधारभूत साहित्य देण्यासाठी सरकार विविध योजना राबवते. सध्या सरकार कडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस साठवणूक बॅग साठी अनुदान वितरीत्त केले जात आहे.

   या मध्ये लागणारे कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया या बद्दल सविस्तर माहीत आज आपण पाहणार आहोत. 

    महाराष्ट्र राज्यात जे शेतकरी कापूस उत्पादक आहेत त्यांना ही आनंदाची बातमी आहे. सरकार कडून आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 8 बॅग वितरित करण्यात येणार आहेत. 

कापूस साठवणूक बॅग अनुदान असा घेता येईल लाभ

  या योजनेमद्धे पात्र असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना एक एकर साठी 3 बॅग 2 एकर साठी 6 बॅग व एक हेक्टर साठी एकूण 8 बॅग अश्या प्रमाणात लाभ देण्यात येणार आहे.

  या मध्ये सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 ही अंतिम तारीख आहे. या मध्ये लाभ घेण्यासाठी आपणास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. 

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड 
  2. सातबारा 
  3. आठ अ उतारा 
  4. बँक पासबूक 
  5. मोबाइल क्रमांक
  6. ईमेल आयडी 

टीप : अर्ज करण्यासाठी आपल्या आधार कार्ड ला आपला मोबाइल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे

कापूस साठवणूक बॅग अनुदान

येथे करावा लागेल अर्ज

   या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास महाडीबीटी या पोर्टल वर अर्ज करावा लागेल. 

   अर्ज करण्यासाठी खालील चरणाचा अवलंब करा. 

सर्व प्रथम आपणास    महाडीबीटी या संकेतस्थळवर जाऊन आपला युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा. 

   आपल्या समोर भरपूर पर्याय दिसतील आपणस त्या ठिकाणी  बियाणे ,औषधे व खते हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा. 

   त्या नंतर तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल त्या फॉर्म मध्ये आपला जिल्हा तालुका गट क्रमांक निवडा. 

   बाब निवडा मध्ये साठवणूक हा पर्याय निवडा. 

   एकूण आपले क्षेत्र निवडा तेथे आपणास हेक्टर आणि आर (गुंठे) या मध्ये क्षेत्र निवडावे लागेल. 

   ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्या समोर जतन करा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा. 

   तुमचा तालुका यात पात्र असेल तर तुमचा अर्ज सादर होईल अन्यथा आपणास त्रुटि दाखवणात येईल. 

   अर्ज यशस्वी रित्या सादर केला आहे असा आपणास पॉप अप दिसल्यास आपणास मुख्य पृष्ठवर परत जावे लागेल. 

   त्या ठिकाणीअर्ज सादर  करा हा पर्याय दिसेल त्या ठिकाणी क्लिक करा. 

   अर्ज सादर करा मध्ये आपणास प्राधान्य क्रम निवडा हा पर्याय दिसेल त्या मध्ये आपण सादर केलेला घटक (कापूस साठवणूक बॅग अनुदान)  निवडा त्या ठिकाणी प्राधान्य क्रम द्या व सबमीट पर्यायावर क्लिक करा. 

अर्ज सादर केल्यानंतर पेमेंट करा.

   वरील सर्व माहिती भरल्यानंतर आपणास पेमेंट करावे लागेल आपणास पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्ड / यूपीआय / नेटबँकिंग / क्युआर कोड असे विविध पर्याय दिसतील त्या पैकी आपल्या सोयीनुसार निवडून आपले 23.60 रुपये शुल्क भरून आपला अर्ज सादर करा. 

Leave a comment