यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना Yashwantrao Chavan gharkul Yojana
आपण आज या लेखांमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना याविषयी माहिती पाहणार आहोत .देशाच्या स्वातंत्र्यानंतर 64 वर्ष लुटूनही भटकत्या विमुक्त समाज अधापही समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकलेला नाही. या समाजास विकासाच्या मूळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे. भटक्या विमुक्त समाजाचे राहणीमान उंचावावे, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवे, त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी म्हणून त्यांना जमीन उपलब्ध करून तेथे वसाहत उभी करणे व त्या ठिकाणी त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे आवश्यक आहे.
20 टक्के लाभार्थ्याच्या सहभाग 30 टक्के शासनामार्फत बांधकाम अनुदान व 50 टक्के वित्तीय संस्थाकडून विजभजच्या मागासवर्गीय सरकारी गृहनिर्माण योजनेअंतर्गत सध्या अस्तित्वात केली जाते.
या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न 50,000 हजार रुपये असलेल्या लाभार्थ्यांना 60,000 हजार रुपये ते 1 लाख रुपये मर्यादित बांधकाम अनुदानाची रक्कम मंजूर करण्यात येते. या योजनेअंतर्गत पात्र संस्थांना शासकीय जीवनात व खाजगीत घेण्यासाठी. जमीन अनुदान मंजूर करण्यात येते.
तसेच या योजनेसाठी उत्पन्न मर्यादा कमी असल्यामुळे दिवसेंदिवस बांधकाम साहित्याच्या खर्चात होत असलेली वाढ विचारात घेता योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास दिसून आले. त्यामुळे विमुक्त जाती भटकत्या जमाती या घटकांसाठी यशवंत राव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेच्या माध्यमातून विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढून त्यांना स्थिराता प्राप्त वावी यासाठी ग्रामीण भागातील विमुक्त जमाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील घटकांसाठी राज्यात ही योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबवण्या मागचा उद्देश असा आहे की या अंतर्गत राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, प्रवर्गातील कुटुंबाचे जीवनमान सुधारणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवून त्यांना स्थिरात प्राप्त व्हावी यामुळे ग्रामीण भागातील विमुक्त जमाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील घटकांसाठी राज्य सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे. यासाठी राज्यातील ग्रामीण भागात एकूण 33 जिल्ह्यांमधील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाची जास्ती जास्त लोकसंख्या असलेले प्रत्येकी जिल्ह्यातील तीन गावे निवडण्यात येऊन त्यांना गावातील एकूण 20 कुटुंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ देण्यात येईल .
योजनेचे नाव | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (Yashwantrao Chavan gharkul Yojana) |
राज्य | महाराष्ट्र |
उद्देश | राज्यातील विजाभज प्रवर्गातील कुटुंबाचा विकास करणे. |
विभाग | |
लाभ. | या योजनेअंतर्गत मोफत घर उपलब्ध करून देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन/ ऑफलाइन |
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना उद्देश
- या योजनेमाचे उद्देश विमुक्त जाती व भटक्या जमाती विकासाच्या मूळ प्रवाहात आणणे . त्यांचे जीवनमान उंचावणे त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे.
- या योजनेचा असा उद्देश आहे की नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
- या योजनेअंतर्गत शासन जमीन उपलब्ध करून देऊन तिथे निवाऱ्याची सोय करणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम स्वावलंबी बनवणे
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे लाभार्थी
- या योजनेअंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- दारिद्र रेषेखालील कुटुंब
- पालात राहणारे.
- ज्या घरामध्ये कोणीही कमावत नाही अशा विधवा महिला, परित्यक्त्या किंवा अपंग महिला
- पूरग्रस्त क्षेत्र.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे पात्रता
- अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा भटक्या जमाती किंवा मी मुक्त जातीतील कुटुंबाचा सदस्य असणे आवश्यक आहे तोच व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकतो.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीने या अगोदर कोणत्याही योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा.
- या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी व्यक्ती हा वर्षभरात किमान सहा महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.
- या योजनेचा लाभ हा कुटुंबातील एकाच व्यक्तीला देण्यात येईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या निवासाची जागा तपासली जाईल व त्याचे घर कच्चे आहे की पक्के हे तपासल्यानंतर तो या योजनेसाठी पात्र आहे की नाही ठरवण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम संपूर्ण घर बांधून पूर्ण झाल्यानंतर ते अधिकाऱ्याकडून तपासून मंग लाभाची रक्कम लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये देण्यात येईल.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या अटी व शर्ती
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य बाहेरील व्यक्तींना देण्यात येणार नाही.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे स्वतःच्या मालकीचे कोणत्याही प्रकारचे घर नसावे.
- अर्जदार व्यक्तीने या अगोदर शासकीय घरकुल अनुदानाचा या अगोदर लाभ घेतलेला नसावा.
- राज्यामध्ये प्रत्येक कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे
- या योजनेचा जास्तीत जास्त लाभ हा महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील भटकांती करणाऱ्या व या शहरातून त्या शहरात उदरनिर्वासाठी स्थलांतर करणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठीच आहे.
- ही योजना महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यांसाठी लागू आहे
हे वाचा : बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ
- या योजनेअंतर्गत विमुक्त जाती आणि भटक्या जमाती मधील नागरिकांची निवड करण्यात आलेली आहे, अशा कुटुंबांना प्रत्येकी 05 गुंठे जमीन देऊन त्यांना त्या जागेवर 269 चौ. फु. घराचे बांधकाम करून देणे व उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबांना विविध शासकीय योजनेद्वारे स्वयंरोजगाराची संधी निर्माण करून देण्यात येते.
- यशवंतराव चव्हाण घरकुल योजना 2024 योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या जागा आणि घर कोणत्याही प्रकारे भाड्याने घर किंवा विकता येणार नाही.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- दारिद्र रेषेखालील कार्ड
- घर नसल्याचा पुरावा
- जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खाते
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- कुठल्याही प्रकारच्या आर्थिक कमाईचे साधन नसल्याचा पुरावा.
अर्ज करण्याची पद्धत
- यशवंतराव चव्हाण घरकुल वसाहत योजनेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
- अर्जदार व्यक्तीने आपल्या जिल्ह्याच्या सहाय्य आयुक्त समाज कल्याण कार्यालयाची भेट घ्यावी.
- आणि सर्व आवश्यक लागणारी कागदपत्रे जमा करून समाज कल्याण विभागांमध्ये अर्ज दाखल करावा.
- अशाप्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल
- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना जीआर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
निष्कर्ष
आम्ही तुम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना याविषयी अत्यंत सोप्या पद्धतीने या योजनेमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर कोणाला काही अडचणी असतील किंवा कोणाचे काही प्रश्न असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आम्हाला त्या माध्यमातून प्रश्न विचारा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
धन्यवाद!
1 thought on “यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना : Yashwantrao Chavan gharkul Yojana”