Crop Insurance :बोगस पीक विम्याला जबाबदार कोण? कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा गौप्यस्फोट, राज्यात 4 लाख अर्ज बाद …

Crop Insurance : राज्यात बोगस पिक विम्याचा बीड पॅटर्न सध्या खूप चर्चेचा विषय बनलेला आहे .उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालाने खळबळ उडालेली असतानाच नुसतेच कृषीमंत्र्यांनी हा घोटाळा कोणी आणि का केला याविषयी मोठं भाषण केले आहे .

राज्याचं नाही तर बीड हे देशाच्या केंद्रस्थानी आले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्याच नाही, तर अनेक घोटाळ्याच्या अग्रस्थानी बीड पॅटर्न असल्याचे समोर आले आहे. पिक विमा घोटाळा,अक्षय ऊर्जा कंपनीकडून खंडणी, हार्वेस्टर घोटाळा ,बिंदू नामावली धाब्यावर बसवणे असे अनेक पॅटर्न बीड जिल्ह्याला बदनाम करत आहे . त्यात म्हणजे,1 रुपया पिक विम्यातील घोटाळा सध्या बीड जिल्हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे, आणि त्यातही पीक विमा घोटाळ्याच्या मुद्द्याने खळबळ उडवली आहे.

Crop Insurance

उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाने खळबळ उडाली असतानाच नुकतेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी हा घोटाळा कुणी आणि का केलाय याविषयी मोठे भाष्य केले आहे .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला नवं बळ! महिलांना मिळणार ₹40,000 चे बिनव्याजी कर्ज.

Crop Insurance बोगस पीक विम्याचा घोटाळा

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विम्यातील बोगस घोटाळा सर्वांसमोर आणला. या घोटाळ्या मध्ये, खूपच शेतकऱ्यांचे नाव घेऊन आणि काही गैरव्यवहार करून विमा प्राप्त केला जात होता. माणिकराव कोकाटे यांनी पीक विम्याचा हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कठोर आदेश दिले आहेत. राज्याच्या बाहेरून आलेले अर्ज आणि शेतजमिनीजाठी दाखल केलेले मशिद, मंदीर, मोकळ्या जागा आणि शेतजमीन दाखवली गेली आहे हा प्रकार समोर आल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली .

हे वाचा : शेतकऱ्यांना आता सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन पोर्टल उपलब्ध

हे पण वाचा:
Crop Insurance List Crop Insurance List: पीक विमा योजनेअंतर्गत 921 कोटी रुपयांची मदत; शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात

Crop Insurance 4 लाखांहून अधिक अर्ज बाद

माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, राज्यभरात 4 लाखांहून अधिक पीक विम्याचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. योजनेतील काही महत्त्वाचे बदल लवकरच करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना युनिक आयडी कार्ड दिले जातील, जे आधार कार्डशी लिंक केले जातील असे माणिकराव कोकाटे म्हणाले . आता शेतकऱ्यांचा अपडेट डेटा जमा करण्यात येत आहे .यामुळे बोगस अर्ज करणाऱ्यांना प्रतिबंध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Crop Insurance बोगस पीक विम्याला जबाबदार कोण?

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सीएससी सेंटर चालकावर या बोगस पिक विम्याचे खापर फोडले आहे. कारण की, सीएससी केंद्रांना पिक विम्याच्या एका अर्जामागे 40 रुपये मानधन दिले जाते, आणि या आर्थिक लाभासाठी अनेक सीएससी केंद्रांनी बोगस अर्ज भरणे सुरू केले. हा उद्योग मानधनासाठी करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला यावर त्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले असून, 96 सीएससी केंद्रांवर कारवाई केली जाईल .

Crop Insurance शेतकऱ्यांना दोषी धरता येणार नाही

तथापि, माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले की या गैरव्यवहारात शेतकऱ्यांना पूर्णपणे दोषी ठरवता येणार नाही. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना गोंधळात टाकून गैरव्यवहार घडवले गेले असे ते म्हणाले.  गैरव्यवहार झाला म्हणून ही योजनाच बंद करायची आशा विचाराचा मी नाही, असे ते म्हणाले. तर या योजनेतील त्रुटी दूर करण्यात येईल असे माणिकराव कोकाटे म्हणाले.

हे पण वाचा:
Crop Insurance List Maharashtra : Crop Insurance List Maharashtra: पीक विमा परतावा यादी जाहीर; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १०१ कोटी जमा..!

निष्कर्ष

राज्यातील पीक विम्याच्या बोगस घोटाळ्याने अनेक मुद्दे समोर आणले आहेत. यामध्ये सीएससी केंद्रांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ठाम निर्णयांमुळे आता या घोटाळ्याला चाप बसविण्यासाठी सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांचे हक्क सुनिश्चित करणे, त्यांचे अर्ज सत्य तपासणी करूनच मंजूर करणे, आणि बोगस अर्ज रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करणं हे सरकारच्या आगामी धोरणाचा भाग असणार आहे.Crop Insurance

हे पण वाचा:
Pik Vima Pik Vima: पीक विमा मंजूर, पण खात्यात पैसे आले नाहीत; शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत.

Leave a comment