crop insurance: रब्बी हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा अर्ज सादर केले होते. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान झाले आहे. पिकाची नुकसान झाल्यामुळे शेतकरी पीक नुकसान तक्रार सादर करत असताना त्यांना एक नवीनच अडचण समोर आली आहे. पिक विमा कंपन्याकडून राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. हे अर्ज रद्द करण्यामागचे विविध कारणे असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
नैसर्गिक आपत्तीने पिकाची नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्या पिकाची भरपाई मिळते. यासाठी शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडे नुकसान झाल्याची तक्रार सादर करणे आवश्यक असते. अनेक शेतकरी पिक नुकसानीची तक्रार सादर करत असताना त्यांच्यासमोर एक खळबळ जनक बाब उघड आली आहे. राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्ज पिक विमा कंपनीने रद्द केल्याचे समोर आले आहे.

रब्बी हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांनी वेळेवर अर्ज भरून आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडून आणि सामाजिक क्षेत्राचे डिक्लेरेशन फॉर्म देऊन देखील शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. याआधी कंपनीकडून अर्ज दोस्ती साठी परत पाठवले जात होते. परंतु यावेळी कंपनीने थेट अर्ज रद्दच केले आहे. अनेक शेतकऱ्यांना दुरुस्तीसाठीचे एसएमएस देखील आलेले आहेत. अशा शेतकऱ्यांनी दुरुस्ती अर्ज भरून आवश्यक असणारे कागदपत्र देखील अपलोड केली होती. तरी देखील या शेतकऱ्यांचे अर्ज पिक विमा कंपन्याकडून रद्द करण्यात आलेले आहे.
अर्ज रद्द करण्याची काय आहेत कारणे
कंपनीने अनेक शेतकऱ्यांचे पिक विमा अर्ज रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचे मनात चिंता निर्माण झाली आहे. हे अर्ज नेमके कंपनीने कशामुळे रद्द केले हे देखील कंपनीकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. परंतु पिकविमा कंपनीकडे याबद्दल विचारणा केली असता कंपनीने काही मुद्दे सांगितले आहेत. या मुद्द्याच्या आधारेच शेतकऱ्यांचे पिक विमा अर्ज रद्द केले असल्याची माहिती देखील पिक विमा कंपनीकडून देण्यात आलेली आहे. पिकविमा कंपनीने खालील मुद्द्याच्या आधारे शेतकऱ्यांचे अर्ज रद्द केले आहेत.
- आधार कार्ड वरील नाव आणि सातबारे वरील नाव सारखे नसणे
- आधार वरील नाव आणि बँक पासबुक वरील नाव सारखे नसणे.
- आधार कार्ड एका व्यक्तीची आणि सातबारा एका व्यक्तीचा.
- भाडे करार पत्र नोंदणीकृत नसणे.
- सामायिक क्षेत्र सहमती पत्र सादर न करणे.
- नावामध्ये थोडीफार तफावत असल्यामुळे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे. (उदा. ज्ञानोबा – ज्ञानदेव, सखु- सखुबाई, गंगा – गंगाबाई, पांडू – पांडुरंग)
- सामायिक क्षेत्र सहमती पत्रावर सर्व खातेदारांच्या नसणे
- सातबारावर फळबाग पिकाची नोंद असताना रब्बी हंगामातील पिकाचा पिकविमा उतरवणे.
या अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांचे पिकविमा अर्ज पिकविमा कंपनीकडून रद्द करण्यात आलेले आहेत. हे अर्ज रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची कवच मिळणार नाही. मग शेतकऱ्यांना पिकविमा योजनेचा फायदा होणार नसेल तर योजना काय कामाची असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच मनात निर्माण झाला आहे.

crop insurance त्रुटी दुरुस्त होणार का?
याआधी देखील पिकविमा कंपनीकडून प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांचे अर्ज तपासले जात होते. परंतु या रब्बी हंगामामध्ये कंपनीने अर्ज दुरुस्ती साठी न पाठवता थेट अर्ज रद्द केले आहेत. रद्द केलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येत नाही.
जर अर्ज दुरुस्ती साठी पाठवला असेल तरच अर्जामध्ये असलेली त्रुटी आपल्याला भरून काढता येते. पिकविमा कंपनीकडून रद्द केलेल्या अर्जावर कोणतीही पुढील प्रक्रिया राबवता येत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अर्ज पिकविमा कंपनीकडून रद्द करण्यात आले आहे; त्यांना पिकविमा योजनेतून कोणताही लाभ मिळू शकत नाही.
अनेक शेतकऱ्यांचे पिक विमा अर्ज कंपनीकडून रद्द करण्यात आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज कंपनीने रद्द केले आहेत अशा शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतून कोणताही लाभ आता मिळू शकत नाही.
पिकविमा कंपनीने घेतलेला हा निर्णय राज्यातील हजारो शेतकऱ्यांना अडचणीचा ठरला आहे. काही शेतकऱ्यांच्या थोड्या थोड्या चुकीमुळे देखील शेतकऱ्यांचे अर्ज कंपनीने रद्द केले आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अर्जामध्ये त्रुटी आल्यानंतर कंपनीने शेतकऱ्यांना अर्जाची त्रूटी भरून काढण्यासाठी वेळ आणि संधी देणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे अर्ज कायमस्वरूपी रद्द झाले नसते. कंपनीने अशा कोणत्याही प्रकारची कारवाई न करता थेट शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यावरच भर दिला आहे.
कंपनीने राबवलेली ही प्रक्रिया शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे. दरवर्षी याच शेतकऱ्यांना याच कागदपत्रावर नियमित पिकविमा लाभ मिळत होता. परंतु याच हंगामामध्ये त्याच शेतकऱ्यांना त्याच कागदपत्राच्या आधारे रद्द करण्याचं कार्य पीकविमा कंपन्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
पिकविमा कंपनीने राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्ज रद्द केले आहेत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज रद्द झाले आहेत त्या शेतकऱ्यांना आता पिक विमा योजने मधून कोणताही लाभ मिळणार नाही. अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून देखील त्या शेतकऱ्यांना त्यांचा अर्ज रद्द झाल्यामुळे आता पिकविमा कंपनीकडून कोणतीही भरपाई दिली जाणार नाही.
मागील एक आठवड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी पिक विमा कंपन्या नुकसानीची तक्रार सादर करताना या शेतकऱ्यांचा अर्ज रद्द झाली असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि अशाच वेळी जर शेतकऱ्यांना पिकविमा योजनेचा आधार मिळत नसेल तर ही योजना शेतकऱ्यांच्या खरंच कामाचे आहे का असा प्रश्न देखील शेतकऱ्याचे मनात निर्माण होत आहे.