Election member राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे यातच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. बऱ्याच मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर होऊन उमेदवारांनी अर्ज देखील सादर केले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी 29 ऑक्टोबर ही अंतिम तारीख असणार आहे. त्यातच आपल्या मतदारसंघात कोण कोणते उमेदवार आहेत व कोणी कोणी अर्ज भरले आहे याची माहिती कोठे पाहायची व कशी पहायची. त्यासोबतच आपल्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरलेला उमेदवार यांचे सर्व माहिती आपल्याला कोठे पाहता येईल. जेणेकरून आपल्याला योग्य उमेदवार निवड करण्यास मदत मिळेल. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघात कोणते उमेदवार आहेत व उमेदवारांची पूर्ण माहिती कशी पाहायची याची पूर्ण माहिती घेणार आहोत.
असे पहा उमेदवार आणि उमेदवारांची माहिती Election member
सर्वप्रथम https://www.eci.gov.in/election-details/2024/S13/3 या संकेतस्थळावर जा.
या लिंक वर आल्यानंतर आपल्यासमोर candidate affidavits हा पर्याय दिसेल यावर क्लिक करा.
हे वाचा: आचार संहिता म्हणजे नेमके काय
- त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आपला मतदारसंघ निवड करायचा आहे.
- मतदारसंघ निवड केल्यानंतर समोरील फिल्टर या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर आपल्यासमोर आपल्या मतदारसंघात सादर केलेले सर्व अर्ज प्रदर्शित केले जातील. (ज्या मध्ये पक्षाने नेमवलेले उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार यादी समोर दिसेल)
- उमेदवाराची आपल्याला संपूर्ण माहिती पाहायची आहे त्या उमेदवाराच्या नावासमोर आपल्याला दिसेल त्यावर क्लिक करून सर्व माहिती पाहू शकता.
- त्यानंतर आपल्यासमोर डाउनलोड करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल.
- पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड या पर्यायावर क्लिक करा.
- affidavits पीडीएफ डाउनलोड झाल्यानंतर उमेदवाराची सर्व माहिती या पीडीएफ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
- या affidavits फॉर्म मध्ये उमेदवारची सर्व माहिती दिसून येईल. ज्या मध्ये उमेदवाराचे नाव,पत्ता, क्रिमिनल रेकॉर्ड, या आधी लडवलेली निवडणूक माहिती, संपत्ति या सर्व घटकांची माहिती आपण पाहू शकता.
2 thoughts on “असे पहा आपले विधान सभा उमेदवार. Election member”