farmer ladki bahin नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना फटका

farmer ladki bahin महाराष्ट्रातील शेतकरी महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून काही शेतकरी महिलांच्या लाभाला कात्री लावण्यात येत आहे. या निर्णयामुळे तब्बल २० लाख महिला शेतकरी योजनेच्या लाभातून प्रभावित होणार आहेत.

20250105 135415

farmer ladki bahin 18 हजारांच्या जागी फक्त 6 हजार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी 18,000 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ज्या महिलांना नमो शेतकरी महासन्मान योजना आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनांचा लाभ मिळतो, त्या महिलांना 18,000 रुपये देण्याऐवजी फक्त 6,000 रुपये दिले जातील. यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेतून दिले जाणारे 6,000 रुपये आणि पीम किसान योजनेतून दिले जाणारे 6,000 रुपये अशे मिळून 12 हजार रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत वजा करण्यात येणार आहेत. म्हणजेच पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत लाभ घेत असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रती महिना 500 रुपये देण्यात येणार आहेत .

लाडकी बहीण योजनेचा राजकीय परिणाम

मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना राबवून महिलांच्या खात्यावर थेट पैसे जमा केल्यामुळे भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले होते. हा अनुभव पाहता, महाराष्ट्रातही महायुती सरकारने ही योजना सुरू केली. यामुळे विधानसभा निवडणुकीत महिलांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळवला गेला.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ही योजना आली. अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक तरतूद केली, तर भाजपने “लाडका देवभाऊ” अशी प्रचाराची रणनीती आखली. निवडणुकीआधी तब्बल २ कोटी ४६ लाख महिलांच्या खात्यांत 7,500 रुपये जमा करण्यात आले होते.

निकषांमुळे लाभार्थींची संख्या कमी

farmer ladki bahin राज्य सरकारच्या आर्थिक ताणाला सामोरे जाण्यासाठी लाडकी बहीण योजना राबवताना कठोर निकष लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून अर्जाची पडताळणी सुरू केलेली आहे . यामध्ये खालील महिलांना लाभ दिला जाणार नाही

  1. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक असलेल्या महिलाना लाभ दिला जाणार नाही
  2. ज्या महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहन आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
  3. इतर योजनांचा लाभ घेत असलेल्या महिला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही

या निर्णयामुळे महिलांच्या पात्रतेसाठीची मर्यादा वाढली असून लाभार्थींची संख्या कमी होणार आहे.

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

महिलांसाठीची योजनांची आकडेवारी

farmer ladki bahin योजना लागू करण्यापूर्वी राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनाDBT योजनेतील महिला लाभार्थ्यांची आकडेवारी गोळा केली होती. 6 जुलैच्या आकडेवारीनुसार:

  • DBT लाभार्थी महिलांची संख्या: 10.9 लाख
  • नमो शेतकरी महासन्मान योजनेतील महिलांची संख्या: 19.2 लाख

या महिलांना नमो शेतकरी महासन्मान आणि पीम किसान योजनेतून वार्षिक 12,000 रुपये मिळतात. त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 6,000 रुपये मिळतील.

महिलांवर होणारा परिणाम

farmer ladki bahin लाडकी बहीण योजनेच्या नव्या धोरणामुळे 20 लाख शेतकरी महिलांच्या लाभांवर मोठा परिणाम होणार आहे. एकीकडे, महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी योजना आखली गेली; मात्र कठोर निकष लावल्यामुळे अनेक महिलांना पूर्ण लाभ मिळणे कठीण होणार आहे.

हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

Leave a comment