Fd bank intrest rate : रेपो रेट हा बँकिंग क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. रेपो रेट च माध्यमातून कर्जावरील व्याज आणि ठेवीवरील व्याज हे ठरवले जाते. रेपो रेट कमी झाल्यानंतर आपोआपच कर्जावरील व्याज कमी केले जाते. हा फायदा कर्जदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु रेपो रेट कमी केल्यानंतर ठेवेदारांचे यामध्ये नुकसान होते. कारण रेपो रेट कमी झाल्यामुळे ठेवेदारांना मिळणारा व्याजदर देखील कमी केला जातो.Fd bank intrest rate

Rbi बँक रेपो रेट कमी करणार
नुकताच आरबीआय बँकेने 25 बेसिक पॉईंट ने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या माध्यमातून कर्जदारांना फायदा होणार तर ठेवीदारांचे या निर्णयाने नुकसान होणार आहे. आरबीआयने रेपो रेट ठरवल्यानंतर बँकेकडून व्याजदरामध्ये कपात किंवा वाढ केली जाते. रेपो रेट वाढला असेल तर व्याजदर वाढवला जातो आणि जर रेपो रेट कमी केला तर व्याजदर कमी केला जातो. मग आता आरबीआय बँकेने 25 बेसिक पॉईंट ने रेपोरेट मध्ये कपात केली आहे. याचा कोणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा होणार हे आपल्या लक्षात आलेच असेल. कोणत्या बँकेने कोणत्या व्याजदरामध्ये किती प्रमाणात कपात केली याची माहिती देखील जाणून घेऊ.Fd bank intrest rate
हे वाचा : आरबीआय बँकेची मोठी कारवाई! या बँकेचा परवानाच रद्द!!!
sbi बँकेचे ठेवेदारांना मिळणारे व्याज
- देशातील सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेने ठेवीदरांना ठेवीदारांना 15 एप्रिल पासून तीन कोटी रुपये पेक्षा कमी आणि एक ते तीन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवीवरील व्याजदर दहा बेसिस पॉईंटने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- दोन वर्षापेक्षा कमी कमी कालावधीतील ठेवीवर आता बँकेकडून 6.7% एवढा व्याजदर मिळेल. जो यापूर्वी 6.8% एवढा होता.
- या आधि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय कडून एक ते दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या ठेवीवर 7.3% एवढा व्याजदर दिला जात होता. यामध्ये आता कमी करून ज्येष्ठ नागरिकांना 7.2% एवढा व्याजदर दिला जाईल.Fd bank intrest rate
bank of india ठेवीदारांना मिळणारे व्याज
- बँक ऑफ इंडिया ने देखील 15 एप्रिल 2025 पासून विविध ठेवीवरील व्याजदर कमी केले आहे.
- बँक ऑफ इंडियाने तीन कोटी रुपये पेक्षा कमी असणाऱ्या रकमेवरील मुदत ठेवीचा व्याजदर कमी केला आहे.
- बँक ऑफ इंडिया आता 91 ते 179 दिवसाच्या कालावधीमध्ये ठेवलेल्या ठेवीवर 4.25% एवढा व्याजदर वितरित करणार आहे. या आधी हा दर 4.50% एवढा होता.
- 180 दिवसापासून पुढे ते एक वर्षापर्यंतच्या ठेवीवर आता बँक ऑफ इंडिया कडून 5.75% एवढा व्याजदर दिला जाणार आहे. याआधी हा व्याजदर 6% एवढा होता.
- बँक ऑफ इंडियाची ठेवेदारांसाठी सर्वात महत्त्वाचे असणारी विशेष एफडी योजना बँक ऑफ इंडियाने आता मागे घेतली आहे. योजना 400 दिवसांसाठी होती. आणि यामध्ये ठेवेदारांना 7.3% एवढे व्याजदर दिले जात होते. Fd bank intrest rate
कोणाचा फायदा कोणाचे नुकसान
रेपो रेट नुसार कर्जदारांना फायदा झाला तर ठेविदारांना नुकसान सहन करावे लागले. कारण ठेवेदारांना मिळणाऱ्या व्याजदरामध्ये बँकेकडून कपात करण्यात आली आहे. बँक वितरित केल्या कर्जावर देखील कमी प्रमाणात व्याज आकारणार आहे. ज्यामुळे बँकेकडून कर्ज घेतलेला कर्जदारांना यामध्ये फायदा होणार आहे. या रेपोरेटच्या माध्यमातून ठेवेदारांचे नुकसान तर कर्जदारांचा फायदा होणार आहे. Fd bank intrest rate