गटई स्टॉल योजना : Gatai Stall Yojana in Maharashtra

गटई स्टॉल योजना : Gatai Stall Yojana in Maharashtra

गटई स्टॉल योजना : Gatai Stall Yojana in Maharashtra

नमस्कार आज आपण गटई स्टॉल योजना याविषयी माहिती पाहणार आहोत. ही योजना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची, इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच या समाजामध्ये त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी  राज्य सरकारने अशा उद्देशाने गटाई स्टॉल योजना ची सुरुवात करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती कार्यरत असून त्यांचे जगण्याचे साधन म्हणजे चमड्या पासून बनणाऱ्या वस्तू व पादत्राने दुरुस्तीच्या क्षेत्रावर अवलंबून आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील पादत्राणे दुरुस्ती करणारे व्यवसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हात बसून आपली सेवा जनतेला देत असतात. अशा लोकांना हा व्यवसाय करण्यासाठी ऊन वारा व पाऊस अशा आर्थिक संकटांमध्ये त्यांना आपले जीवन जगण्यासाठी काम करावे लागते. अशा व्यावसायिक लोकांना ऊन वारा व पाऊसापासून संरक्षण मिळावेत म्हणून ग्रामपंचायत ,नगरपालिका क्षेत्रात 100 टक्के सहायक अनुदानावर गटई कामगारांना गटई स्टॉल देण्याची योजना अमलात आणलेली आहे.

ही योजना दिनांक 31 डिसेंबर 1997 च्या शासन निर्णयान्वये सुरू करण्यात आली असून दिनांक 14 मार्च 2013 च्या शासन निर्णयानुसार गट इन्स्टॉल पुरवठ्याबाबतीची कारवाई कार्यवाही संत रोहिदास  चर्मीद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येते.

गटई कामगार या योजनेचा असा उद्देश आहे की गटई कामगारांना त्यांच्या पारंपारिक पादत्राणे हा शिवण्याचा व्यवसाय करण्यासाठी पत्राचे छोटेसे स्टॉल बांधून देणे जेणेकरून अशा व्यवसायिकांना ऊन वारा पाऊस यापासून त्यांचे संरक्षण होईल.

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

मोफत शिलाई मशीन योजना

गटई स्टॉल योजना : Gatai Stall Yojana in Maharashtra

 योजनेचे नावगटई स्टॉल योजना : Gatai Stall Yojana in Maharashtra
योजनेची सुरुवात2013 पासून
राज्यमहाराष्ट्र
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य सरकारने
लाभार्थीमहाराष्ट्रातील चर्मकार समाज
लाभमहाराष्ट्र शासनाकडून मोफत पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात येतील
उद्देशचर्मकार समाजाची सामाजिक तसेच आर्थिक उन्नत्ती करणे.
 अर्ज करण्याची पद्धत,ऑफलाइन

गटई स्टॉल योजनेचे उद्दिष्टे

  •  या योजनेअंतर्गत चर्मकार समाजातील ढोर, होलार, मोची हे सर्व रस्त्याच्या कडेला व्यवसाय करत असतात त्यांना ऊन, वारा, पाऊस  याचा सामना करावा लागतो. या उद्देशाने ऊन, वारा आणि  पाऊस यापासून संरक्षण मिळावेत म्हणून चर्मकार समाजातील व्यावसायिक व्यक्तीसाठी कामगार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  •  या योजनेची सुरुवात अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील व्यक्तींना या समाजामध्ये त्यांना त्यांच्या मनाचे स्थान मिळवून देणे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे
  •  या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की पादत्राणे दुरुस्त करणाऱ्या गटाई कामगारांना  त्यांचे आर्थिक व सामाजिक उत्रती साधण्यासाठी शंभर टक्के अनुदान त्यावर पत्नीचे स्वरूप मधून देण्यात येत आहे

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना

हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

गटई स्टॉल योजना वैशिष्ट्ये

  •  गटई स्टॉल ही योजना महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त समाज कल्याण पुणे या महामंडळामार्फत संयुक्तपणे राबविण्यात येत आहे.
  •  या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये DBT च्या साह्याने जमा करण्यात येणार आहे.
  •  या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल.

गटई स्टॉल योजनेचे लाभार्थी

  • गटई स्टॉल योजनेची लाभार्थी अनुसूचित जाती जमाती चर्मकार समाजातील (चर्मकार, डोर, होलार ,मोची, इत्यादी) व्यक्ती या योजनेसाठी लाभार्थी आहेत.

गटई स्टॉल योजनेचा फायदा

  •  गटई स्टॉल योजना अंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीतील रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या गटाई कामगारांना या योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदान तत्त्वावर पत्र्याचे लोखंडी स्टॉल वाटप करण्यात येत आहे. जेणेकरून चर्मकार बांधव स्वतःचा उद्योग सुरू करू शकतील व त्यांचे ऊन वारा आणि पावसापासून संरक्षण होईल. तसेच त्यांना 500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
  •  गटई स्टॉल योजनेअंतर्गत चर्मकार व्यक्तींना अधिकृत परवाना दिला जातो जेणेकरून या व्यक्तींना भविष्यामध्ये कुठल्याही समस्याचा सामना करायची वेळ येऊ नये.
  •  या योजनेअंतर्गत चर्मकार व्यक्तींना ऊन वारा आणि पावसापासून संरक्षण होण्यास मदत होईल तसेच या चर्मकार व्यक्तींना स्टॉलमध्ये बसून स्वतःचा पण व्यवसाय करता येईल.

गटई स्टॉल योजना पात्रता

  •  या महाराष्ट्र राज्यातील रहिवासी या योजनेसाठी पात्रता असेलयोजनेसाठी अर्जदार हा अनुसूचित जातीतील असणे आवश्यक आहे.

गटई स्टॉल योजनेचे अटी व नियम

  •  अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असायला हवाआहे.
  •  महाराष्ट्र राज्याचा मूळ  मूळ रहिवासी अर्जदार व्यक्ती असायला हवा.
  •  या योजनेसाठी अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न  ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपये व शहरी भागासाठी 1.20 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. आणि तो जातीचा दाखला तहसीलदार किंवा तत्सम सक्षम प्रधिकार्‍याने दिलेला असावा.
  •  या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तींकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  •  या योजनेसाठी एका कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला स्टॉल मंजूर केला जाणार आहे.
  •  एकदाच कॉल चे वाटत झाल्यानंतर सदर स्टॉलची विक्री करण्यात येणार नाही.
  •  अर्जदार व्यक्तीला सदर स्टॉल भाडे तत्त्वावर देता येणार नाही.
  •  महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती लाभार्थी व्यक्तींवर बंधनकारक राहतील.
  •  अर्जदारस स्टॉलचे वाटप झाल्यानंतर त्या स्टॉलची   सर्व जबाबदारी (देखभाल, दुरुस्ती, इ.) लाभार्थी व्यक्तीची स्वतःचीच राहील.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 ते 50 दरम्यान असावेत 18 पेक्षा कमी आणि 50 पेक्षा जास्त असल्यास तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहणार नाही.

गटई स्टॉल योजनेचे आवश्यक लागणारी कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  •  रेशन कार्ड
  •   मोबाईल नंबर
  •   ई-मेल आयडी
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  रहिवासी प्रमाणपत्र
  •  जातीचे प्रमाणपत्र
  •  अर्जदार व्यक्ती अपंग असल्यास अपंगाचा दाखला
  •   उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  •   शपथ पत्र
  •   बँक खात्याचा तपशील.

गटई स्टॉल योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  •  या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकेल.
  •  या योजनेसाठी अर्जदार हा अनुसूचित जातीतील नसल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
  •  या योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवून दिलेले पेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकेल.
  •  अर्जदार व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा कमी व पन्नास वर्षापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकेल.
  •  या योजनेसाठी अर्जदार सरकारी नोकरी कार्यरत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार व्यक्ती हा गरीब कुटुंबामध्ये नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.

गटई स्टॉल योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार व्यक्तीला सर्वात प्रथम आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभाग कार्यालयात जावे लागेल.
  •  कार्यालयात गेल्यानंतर कार्यालयातून गटई स्टॉल योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील व भरलेला अर्ज सादर करायला जमा करावा लागेल.
  •  अशा पद्धतीने तुम्ही या योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकाल

विचारले जाणारे प्रश्न

1. गट आई स्टॉल योजनेची उद्दिष्टे काय आहेत?

  •  घटाई स्टॉल योजनेचे उद्दिष्टे असे आहेत की या योजनेअंतर्गत चर्मकार समाजातील ढोर ,होलार, मोची हे सर्व रस्त्याच्या कडेला व्यवसाय करत असतात त्यांना ऊन वारा पाऊस याचा सामना करावा लागतो. या उद्देशाने ऊन, वारा आणि पाऊस यापासून संरक्षण मिळावे म्हणून चर्मकार समाजातील व्यवसायिक व्यक्तीसाठी कामगार योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

2. गटई स्टॉल योजनेचे लाभार्थी?

  •  गटई स्टॉल योजनेची लाभार्थी अनुसूचित जाती जमाती चर्मकार समाजातील (चर्मकार, डोर, होलार ,मोची, इत्यादी) व्यक्ती या योजनेसाठी लाभार्थी आहेत.

3. गटई स्टॉल योजना लाभ?

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria
  •  गटई स्टॉल योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीतील रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या गटई कामगारांना या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान तत्त्वावर पत्राचे लोखंडी स्टॉल वाटप करण्यात येत आहेत. जेणेकरून चर्मकार बांधवांना स्वतःचा उद्योग सुरू करू शकतील व त्यांचे ऊन ,वारा आणि पावसापासून संरक्षण होईल.

निष्कर्ष

आम्ही तुम्हाला या योजनेमध्ये गटई स्टॉल योजनेबद्दल माहिती दिलेली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त फायदा हा अनुसूचित जाती जमाती चर्मकार समाजातील (चर्मकार ,ढोर ,होलार ,मोची, इत्यादी) या व्यक्तींना या योजनेचा लाभ होणार आहे. तसेच जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अशी कोणी व्यक्ती असतील तर किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये असतील तर त्या व्यक्तींपर्यंत या योजनेची माहिती नक्कीच कळवा जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा होईल.

Leave a comment