Kanda market update : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळण्यासाठी कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने 1 एप्रिल 2025 पासून कांद्यावर आकारला जाणारा 20% निर्यात शुल्क हटवला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मनात या निर्यात शुल्क हटवल्यानंतर कांद्याला दर चांगला मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. परंतु या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे दिसून येत नाही. कारण कांद्याच्या दरा मध्ये अशी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले नाही.
अनेक शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कांदा पिकावरील निर्यात शुल्क हटवण्याबाबत मागणी करण्यात आली होती. कांद्यावरील (kanda market update) निर्यात शुल्क हटवल्यानंतर कांद्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली होती. या मागणीला वाव देत केंद्र सरकारने निर्यात शुल्क पाठवण्याचा निर्णय घेतला. एक एप्रिल 2025 पासून कांद्यावर 11 जाणारा 20% निर्यात शुल्क रद्द करण्यात आला. या निर्णयाने बाजारात कांद्याच्या दरामध्ये मोठी तेजी येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना निर्माण झाली होती. परंतु या निर्णयाने शेतकऱ्यांना कोणताही फायदा झाल्याचे पाहायला मिळाले नाही. कांद्याचा निर्यात शुल्क हटवला असला तरी देखील कांद्याच्या दरामध्ये जास्त सुधारणा दिसून आले नाही. kanda market update

किती मिळतो दर
सोलापूर कांदा मार्केट मध्ये कांद्याच्या दरामध्ये 400 ते 500 रुपयांची घसरल पाहायला मिळाली. यानुसार कांद्याला 1000 ते 1200 रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या सोलापूर कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक आहे. सोलापूर मार्केटमध्ये 100 पेक्षा अधिक कांदा गाड्यांची आवक झाली आहे. शासनाने निर्यात शुल्क हटवला असला तरी देखील कांद्याच्या दरामध्ये उतरणार झाली नाही. अजून देखील कांद्याचे दर घसरतच असल्याचे पाहायला मिळत आहे.
या निर्णयामुळे शेतकरी आणि कांदा व्यापारी देखील चक्रावून गेले आहेत. महाराष्ट्र राज्यातच नाही तर देशातील इतर राज्यांमध्ये देखील कांद्याची मागणी कमी झाली आहे. मागणी कमी झाल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये देखील वाढ होत नाही. सरासरी कांद्याला दहा ते बारा रुपयापर्यंत दर मिळतो. ज्यावेळी कांदाला (kanda market update) बाजारामध्ये चांगली मागणी होती त्यावेळी शासनाकडून या मालावर निर्यात करण्यासाठी 20% शुल्क आकारला जात होता. आता शासनाने हा निर्यात शुल्क कमी केला असला तरी बाजारातील कांदा मागणीच कमी झाली असल्यामुळे कांद्याला दर चांगला मिळत नाही. या प्रकारामुळे देशातील शेतकरी आणि व्यापारी देखील संकटात सापडले आहेत. kanda market update
हे वाचा : गव्हाला मिळतोय चांगला दर… पहा आजचे गव्हाचे बाजार भाव!!
शेतकरी चिंतेत वाढ
कांद्याला चांगला दर मिळेल या अपेक्षेने कांदा पिकाला शेतकऱ्यांनी अधिक खर्च करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी कांदा पिकाला अधिक खर्च जरी केला असेल तरी देखील शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारात कवडीमोल किंमत मिळत आहे. शेतकऱ्यांच्या या मालाला किंमत मिळत नसल्यामुळे शेतकरी देखील आर्थिक संकटात सापडणार आहेत. कांद्याचे भाव नेहमीच स्थिर राहत नाहीत. परंतु शेतकऱ्यांचा कांदा बाजारात उपलब्ध झाला की लगेच कांद्याचे दर हे नेहमीच कमी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. या दरामध्ये झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कारण शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे देखील या ठिकाणी कठीण होणार आहे. कांदा उत्पादनावरील शुल्क हटवून देखील शेतकऱ्यांना चांगला दर मिळत नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. kanda market update