kanyadan yojana : कन्यादान योजना लाभार्थी यांच्या अनुदानात वाढ
kanyadan yojana कन्यादान योजना
- सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन सहभागी होणाऱ्या नव विवाहित दाम्पत्याला मिळणारे अनुदान वाढवण्यात आले आहे.
kanyadan yojana कन्यादान योजना
सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेणाऱ्या इतर मागास वर्ग , विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती भटक्या जमाती मधील नवविवाहित दाम्पत्याला मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे.
सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेणाऱ्या इतर मागास वर्ग , विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती भटक्या जमाती मधील लाभार्थी यांना जुन्या अनुदान पद्धती नुसार 20000 रुपये अनुदान वितरीत करण्यात येत होते.
कन्यादान योजनेतील लाभार्थी यांच्या अनुदानात वाढ
दिनांक 18 जुलै 2024 रोजी शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णया मार्फत शासनाकडून सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेणाऱ्या विशेष घटकतील नव विवाहित दाम्पत्याला 20000 एवजी आता 25000 लाभ देण्यास सरकार ने मान्यता दिली आहे.
kanyadan yojana कन्यादान योजना लाभ वितरण प्रणाली मध्ये बदल
दिनांक 18 जुलै 2024 रोजी शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णया मध्ये शासनाने वस्तु स्वरूपात दिली जाणारी रक्कम आता रोख स्वरूपात वितरित करण्यात येणार असल्याचे सांगितले. जुन्या प्रणाली नुसार अनुदानाची रक्कम ही लाभार्थी यांच्या नावाने धनादेश ((चेक) वितरित केला जात होता. आता नवीन प्रणाली नुसार लाभार्थी यांना लाभाची रक्कम थेट (DBT) त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.