Kapus Soyabean Anudan 2024 राज्य सरकारने कापसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5000 रुपयांचे अनुदान 30 सप्टेंबर रोजी वाटप केले आहे राज्यांमधील एकूण 96 लाख खातेदारांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये या अनुदानाचे वाटप केले जाणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील 49 लाख 51 हजार खातेदारांना या अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी पात्र असलेल्या राज्यांमधील एकूण खातेदारांची संख्या ही 96 लाख एवढी आहे यामधील 80 लाख वैयक्तिक तर 16 लाख संयुक्त खाते आहेत 80 लाख वैयक्तिक खतांपैकी 64 लाख खातेदारांचे आधार संमतीपत्र कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत तर संयुक्त खातेदार आणि 13 लाख वैयक्तिक खातेदारांचे संमती पत्र अजूनही आले नाहीत.
Kapus Soyabean Anudan 2024 पहिल्या टप्प्यात एकूण 2398 कोटी रुपयांचे वाटप 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना करण्यात आले होते तर त्यानंतरच्या 10 दिवसांमध्ये म्हणजेच 10 ऑक्टोंबर पर्यंत राज्यांमधील एकूण 2564 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे.
सोयाबीन उत्पादन करणारे 45 लाख 25 हजार खातेदार म्हणजेच 33 लाख 39 हजार शेतकरी आणि कापूस उत्पादित करणारी 22 लाख 37 हजार खातेदार म्हणजेच 19 लाख 26 हजार शेतकऱ्यांना असे एकूण 67 लाख 61 हजार खातेदार आणि 57 लाख 65 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत 2564 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
हे वाचा: राहिलेल्या शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार अनुदान
Kapus Soyabean Anudan 2024 काय आहे अडचणी ?
Kapus Soyabean Anudan 2024 अनेक शेतकऱ्यांना अजूनही अनुदान खात्यामध्ये जमा झाले नाही तर अनेक संयुक्त खातेदारांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत वैयक्तिक आणि संयुक्त खातेदारांनी आपल्या आधार संमतीपत्र कृषी सहाय्यकांना दिल्यानंतरच अनुदानाचा लाभ घेता येणार आहे तर संयुक्त खातेदारांसाठी सामायिक क्षेत्रांमध्ये नावे असणाऱ्या सर्वांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक आहे तर एकाच व्यक्तीच्या नावे पैसे जमा केले जाणार आहेत परंतु कोणाच्या नावावर किती क्षेत्र आहे यानुसार संयुक्त खातेदारांनी एकमेकांमध्ये ठरवून वाटप करायचे आहे.
अनेक सामायिक खातेदार नोकरी धंदा निमित्त बाहेरगावी असल्यामुळे संमती पत्र देण्यास अडचणी येत आहेत परंतु ज्या संयुक्त खातेदारांनी स्वाक्षरी करून संमतीपत्र दिले आहे त्यांच्यामधील नॉमिनेट केलेल्या खात्यावर अनुदानाचे पैसे वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे संयुक्त खातेदारांनी लवकरात लवकर आपले संमतीपत्र देण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. Kapus Soyabean Anudan 2024
बऱ्याच शेतकऱ्यांनी सहमति पत्र भरून दिले आहेत परंतु त्यांनि केवायसी न केल्यामुळे देखील रक्कम जमा करण्यात आली नाही. ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही अश्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घेणे अवश्यक आहे. https://scagridbt.mahait.org/ या पोर्टल वर जाऊन आपण आपली केवायसी पूर्ण करू शकता.
आतापर्यंत करण्यात आलेले वाटप :
खातेदार :- 67 लाख 61 हजार
शेतकरी :- 57 लाख 65 हजार
रुपये वाटप :- 2564 कोटी
1 thought on “राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळाले कापूस सोयाबीन अनुदान ? काय आहेत अडचणी ? Kapus Soyabean Anudan 2024”