krushi drone application : कृषी यांत्रिकरण अभियान:ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य अर्ज करण्याची संधी

krushi drone application केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकरण अभियानांतर्गत 2024-25 साठी शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 100 ड्रोनचा राज्याचा वार्षिक कृती कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शासकीय संस्था तसेच कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थींना अर्ज करता येईल, अशी माहिती बीड जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

ड्रोनच्या वापराचे फायदे

कृषी क्षेत्रात ड्रोनचा (मानवविरहित वायूयान) वापर मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकतो. विविध पिकांच्या वाढीच्या अवस्थांमध्ये ड्रोनचा वापर खालील गोष्टींसाठी करता येतो:

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
  1. कीटकनाशक फवारणी: ड्रोनद्वारे पिकांवर अचूक आणि वेगवान पद्धतीने कीटकनाशके फवारता येतात, ज्यामुळे वेळ आणि मजुरीची बचत होते.
  2. विद्राव्य खते आणि सूक्ष्म मूल्य द्रव्य फवारणी: पिकांच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात विद्राव्य खते आणि सूक्ष्म मूल्य द्रव्य फवारणी करता येते.
  3. इतर कृषी कामे: ड्रोनचा वापर मृदा नकाशे तयार करणे, पिकांची आरोग्य तपासणी, बियाण्यांची पेरणी इत्यादी कामांसाठी देखील होतो.
  4. खर्च आणि वेळेची बचत: पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत ड्रोनमुळे खर्च कमी होतो, काम लवकर पूर्ण होते, आणि उत्पादनात वाढ होते.
  5. रोजगार निर्मिती: ड्रोन ऑपरेटर्स आणि देखभाल तंत्रज्ञांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.

हे वाचा: कृषि ड्रोन अनुदान असा करा अर्ज

अर्थसहाय्याची रक्कम आणि लाभार्थी गट

ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य पुढीलप्रमाणे आहे:

  1. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी आणि शासकीय संस्था: – 40% अनुदान, जास्तीत जास्त 4 लाख रुपये.
  2. कृषी व तत्सम पदवीधर: – 50% अनुदान, जास्तीत जास्त 5 लाख रुपये.
  3. अनुसूचित जाती-जमाती, लहान आणि सीमांत शेतकरी, महिला शेतकरी: – 50% अनुदान, जास्तीत जास्त 5 लाख रुपये.
  4. सर्वसाधारण शेतकरी: – 40% अनुदान, जास्तीत जास्त 4 लाख रुपये.

krushi drone application शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संधी

ड्रोनच्या मदतीने शेतकरी कृषी उत्पादन वाढवू शकतात आणि अधिक नफ्यासाठी मार्ग मोकळा करू शकतात. केंद्र शासनाच्या या योजनेमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी ही संधी नक्की साधावी.

Leave a comment

Close Visit Batmya360