ladki bahin Froud action महाराष्ट्र राज्यातील सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्ग हजारो महिला या योजनेचा लाभ घेत असताना तर दुसरीकडे याच योजनेअंतर्गत सरकारची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. महिला असल्याचे भासवून पुरुषानेच लाडक्या बहिणी योजनेचे पैसे लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. जवळपास 38 खात्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा झाले आहे. हे पैसे जमा झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा आता उघडकीस आलेला आहे.
हे वाचा : लाडकी बहिण योजना तिसरा हप्ता जमा होण्यास सुरवात
ladki bahin Froud action या अगोदरही असा प्रकार नवी मुंबईतून समोर आलेला होता. त्यानंतर असाच एक प्रकार नांदेड मधील हदगाव तालुक्यातील मनाठा या गावात असाच एक प्रकार समोर आलेला आहे. यामुळे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गैरफायदा करणाऱ्यांच्या विरोधात सरकारने आता कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे. या संदर्भातील माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
ladki bahin Froud action माझी लाडकी बहीण या योजनेचे एकाच व्यक्तीने 37- 38 अर्ज भरलेले आहेत. हे अर्ज आधार कार्ड चा गैरवापर करून भरण्यात आलेले आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे असे म्हणाल्या, स्थानिक प्रशासनाच्या हा गैरप्रकार लक्षात आलेला आहे. यासंबंधी चौकशीसाठी सर्व अधिकारी तिथे गेले आहेत. तसेच संबंधित 37-38 खात्यातील बँकांमध्ये संपर्क साधून ही खाती बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसंच, या बँक खात्यात इथून पुढे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ किंवा कोणत्याही शासकीय व्यवहार होऊ नये असे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या .
ladki bahin Froud action साधारणपणे कोणतीही प्रक्रिया करत असताना 15 ते 20 दिवसांचा कालावधी वेरिफिकेशन साठी देत असतो. 1 ते 30 जुलै दरम्यान अर्ज स्वीकारण्यात आलेल्या पात्र महिलांना 17 ऑगस्ट रोजी हप्ता देण्यात आलेला आहे. 1 ते 24 ऑगस्ट मध्ये स्वीकारलेल्या अर्जदार 52 लाख महिलांना 31 ऑगस्ट रोजी लाभ देण्यात आलेला आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यात काही तांत्रिक अडचणीमुळे ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्या सर्व महिलांना 25 तारखेपासून लाभ देण्यास सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 2 कोटी 45 लाखापेक्षा जास्त अधिक अर्ज आले आहेत. आता सध्या 2 कोटी 10 लाख महिलांना लाभ देत आहोत असे, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
ladki bahin Froud action तिसऱ्या हप्त्याविषयी आदिती तटकरे काय म्हणाल्या?
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे असे म्हटलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झालेली असून दिनांक एक 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 महिलांना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित महिलांना लाभ हस्तांतरणची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असं सर्व पात्र महिलांना महिना अखेर पर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या महिलांना आधी लाभ मिळालेला होता त्यांना तिसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्या महिलांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
1 thought on “लाडकी बहीण योजनेचा गैर फायदा घेणाऱ्याच्या विरोधात कठोर पावल: ladki bahin Froud action”