Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना विधानसभा निवडणुकीसा गेम चार्जर ठरली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत मार्च महिन्यापर्यंत हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
दरम्यान आता महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. लडकी बहिण योजनेचा अर्ज करणाऱ्या अनेक महिलांना मागील दोन ते तीन महिन्यापासून पैसे आले नाहीत . याचा अर्थ असा की या महिलांचे अर्ज वगळण्यात आले आहे . Ladki Bahin Yojana

या महिलांना मिळणार नाही लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी (Ladki Bahin Yojana) बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी निकषा बाहेर जाऊन अर्ज केले आहेत अशा महिलांचे अर्ज बाद करण्यात आली आहे .त्यामुळे अशा महिलांना इथून पुढे या योजनेचा हप्ता कधीच मिळणार नाहीत. मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी अर्ज करणारा सर्व महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जात होता .याचे कारण म्हणजे, निवडणुकीच्या तोंडावर आल्यामुळे अर्जाची पडताळणी करायची राहून गेली होती .परंतु आता सरकारने मागील दोन ते तीन महिन्यापासून अर्जाची पडताळणी करण्यास सुरुवात केली असून आणखीन चालूच आहे .त्यामुळे पडताळणी दरम्यान निकषा बाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे . Ladki Bahin Yojana
हे वाचा : आता फक्त 550 रुपयात मिळणार गॅस सिलेंडर ;असा करा उज्वला योजनेसाठी अर्ज..!
काय आहेत लाडकी बहीण योजनेचे निकष
- लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणारी महिलाही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे
- अर्ज करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाही सरकारी कर्मचारी नसावी.
- अर्ज करणाऱ्या महिलांकडे चार चाकी वाहन नसावे.
- या सर्व नियमांमध्ये बसत नसणाऱ्याच महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहे. ज्या महिला या नियमामध्ये बसणार नाही अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
तुम्हाला पैसे येणार नाही हे कसं ओळखावं ?
लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेतून पडताळणी करत असताना आतापर्यंत 9 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत . तर काही महिलांनी स्वतःहून आपली नावे मागे घेतले आहेत . महिलांना मागील दोन ते तीन महिन्यापासून पैसे येणे बंद झाले आहे .जर तुम्हालापण पैसे येत नसतील तर तुमचा पण अर्ज बाद झाला आहे .त्यामुळे तुम्हालाही यापुढे लाडकी बहीण योजनेतून पैसे येणार नाहीत . Ladki Bahin Yojana
1 thought on “Ladki Bahin Yojana या लाडक्या बहिणींना कधीच मिळणार नाही 1500 रुपये; यामध्ये तुमचे नाव आहे का ?असे पहा….”