Ladki Bahin Yojana January :संक्रांत झाली पण सरकार लाडक्या बहिणीची आठवण नाही आली, कधी येणार जानेवारीचा हप्ता?

Ladki Bahin Yojana January : महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे . या योजनेमुळे राज्यातील 2 कोटी 52 लाख महिलांना लाभ मिळाल आहे. डिसेंबर 2024 मध्ये सरकारने महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले होते . मात्र, जानेवारी महिना संपत आला तरी महिलांना हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे महिलांमध्ये चिंता वाढली आहे. आतापर्यंत महिलांना एकूण या योजने आतर्गत 9 हजार रुपये मिळाले आहेत, मात्र जानेवारीचा हप्ता कधी मिळणार, याबाबत सरकारकडून कोणताही स्पष्ट कळवण्यात आलेले नाही .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladki Bahin Yojana January

Ladki Bahin Yojana January डिसेंबरच्या हप्त्यानंतर महिलांच्या अपेक्षा

डिसेंबर महिन्यात महिलांना हप्ता मिळाल्यानंतर महिलांना आशी अपेक्षा होती की संक्रातीच्या सना निमित्ताने जानेवारीचा हप्ता मिळेल, पण यावर सरकारकडून अद्याप कोणतीही स्पष्टता दिली गेलेली नाही. महिलांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे, “जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार?”

हे वाचा : जर तुम्ही ही एक चूक केली तर , पीएम किसान योजनेच्या लाभापासून राहू शकतात वंचित , पहा सविस्तर.

Ladki Bahin Yojana January बजेटमध्ये बदलाची शक्यता

महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान महिलांना दीड हजार रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बजेटमध्ये विचार केला जाईल असे सांगितले होते. त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात या योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळ यांचे वक्तव्य

Ladki Bahin Yojana January दरम्यान, ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत,आशा महिलानी स्वतःहून अर्ज वापस घ्यावे , असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे .छगन भुजबळ याचे म्हणणे आहे की, सरकारने आतापर्यंत या योजने अंतर्गत दिलेली रक्कम परत मागितली जाणार नाही असे स्पष्ट केले. पण मात्र, ज्या ज्या महिला निकषांमध्ये बसत नाही अशा महिला बाबत तक्रार आल्यास कारवाई केली जाईल असा इशारा सरकारने केला आहे.

महिला मतदारांमध्ये महायुतीचा प्रभाव

लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी निवडणूक रणनीतीत महत्त्वाची ठरली आहे. महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून सरकारला पाठिंबा दिला. आता महिलांचे लक्ष योजनेच्या पुढील हप्त्यावर आहे.

सरकारची भूमिका

महिला मतदारांना खुश ठेवणे हे सरकारचे प्रामुख्याने उद्दिष्ट आहे, त्यामुळे महिलांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी लवकरात लवकर जानेवारीचा हप्ता जमा होईल, अशी महिला आशा करीत आहेत. यासोबतच, योजनेच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेवर देखील अधिक भर दिला जाईल, असे संकेत सरकारने दिले आहेत.

महिला मतदाराच्या विश्वासाचे भविष्य

महिला मतदारांनी लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद दिला असला तरी, सरकारने वेळेवर हप्ता न दिल्यास त्यांचा विश्वास कमी होऊ शकतो. महिलांचा विश्वास राखण्यासाठी सरकारने तत्काळ योग्य निर्णय घेतले पाहिजेत. Ladki Bahin Yojana January

जानेवारी महिन्याचा हप्त्या बाबत संभ्रम

राज्यं सरकार ने लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयात नमूद केल्या प्रमाणे प्रत्येक महिन्याला 15 तारखेच्या आत हप्ता जमा केला जाईल अशी माहिती दिली होती. निवडणुकी पूर्वी पुढील महिन्याचा हप्ता देखील आधीच वितरित केला होता. आता सरकार स्थापन झाले मंत्री मंडळ स्थापन झाले तरी देखील सरकार हप्ता वितरित का करत नाही? अशी शंका निर्माण होताना दिसत आहे.

प्रशासकीय अधिकारी तसेच विभागाचे मंत्री यांना विचारणा केली असतं त्याच्या कडून अपात्र महिला याच्या अर्जाची तपासणी सुरू असून लवकरच ही तपासनि पूर्ण केली जाईल अशी माहिती देण्यात येत आहे. अपात्र महिलांची तपासणी पूर्ण झाली की उर्वरित पात्र असणाऱ्या महिलांना हप्ता वितरित केला जाईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे. या बाबत अजून कोणतीही निश्चित तारीख देण्यात आली नाही किंवा ठरवण्यात आली नाही. लवकरच तपासणी पूर्ण होईल व पात्र महिलांना हप्ता वितरित केला जाईल अशी अपेक्षा.

Leave a comment

Close Visit Batmya360