Ladki bahin yojana update: लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपये महिना.

Ladki bahin yojana update: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. अर्ज करण्यासाठी महिलांना कागदपत्रांमध्ये शिथीलता दिल्यामुळे राज्यातील अडीच कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेत अर्ज सादर केले. निवडणुका पार पडल्यानंतर शासनाने या योजनेच्या नियमवर बोट ठेवण्याचे काम सुरू केले. यातूनच आता महिलांना महिन्याला 500 रुपये वितरित केले जाणार असल्याची माहिती समोर आली.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या पी एम किसान योजनेअंतर्गत 6000 हजार रुपये आणि राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 6000 हजार रुपये असे एकूण 12000 हजार रुपये प्रत्येक वर्षी शेतकरी लाभार्थ्यांना वितरित केले जातात. पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर. आता राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना आता प्रत्येक महिन्याला 1500 हजार रुपया ऐवजी फक्त 500 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे.

20250329 160621

नियमाची कडक अंमलबजावणी Ladki bahin yojana update

Ladki bahin yojana update राज्य शासनाने योजनेची घोषणा केली अडीच कोटी महिलांनी आपले अर्ज सादर केले. सादर केलेल्या सर्व महिलांना पाच हप्त्याचे यशस्वीरित्या वितरण करण्यात आले. त्यानंतर निवडणुका पार पडल्या आणि राज्य शासनाने योजनेच्या नियमावर बोट ठेवून योजनेमधून महिलांना वगळण्याचे काम सुरू केले. कृषी विभागाकडून नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांचे नावांची यादी मिळवली. यादीत नाव असणाऱ्या त्या महिलांना या योजनेचा लाभ कमी करण्याचे काम सुरू केले. त्यासोबतच परिवहन विभागाकडून याद्या मिळून ज्या महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहन आहे अशा महिलांना देखील या योजनेतून पूर्णतः वगळण्याचे काम राज्य शासनाने सुरू केले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कोणत्या महीलांना मिळणार 500 रुपये महिना

आता राज्य शासनाकडून लाडक्या बहिणीच्या पैशात कपात केले जाणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणत्या महिलांना हे 500 रुपये वितरित केले जाणार? हा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. शासनाने लाडकी बहीण योजनेची नियमावली ठरवताना त्यामध्ये इतर शासकीय योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी नसावा अशी अट ठेवण्यात आली होती. त्यानुसारच आता इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असणाऱ्या लाभार्थ्यांना ही रक्कम वितरित केली जाणार नाही. जर लाभार्थ्याला इतर शासकीय योजनेतून 1500 रुपये पेक्षा कमी लाभ मिळत असेल तर लाडकी बहीण योजने अंतर्गत उर्वरित लाभ त्याला लाभार्थ्याला वितरित केला जाईल.

लाडकी बहीण योजनेच्या या नियमाला अनुसरून राज्य शासनाने राज्यातील शेतकरी महिलांना 500 रुपये वितरित करण्याचे धोरण आखले आहे. कारण ज्या शेतकरी महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत 500 रुपये प्रती महिना लाभ वितरित केला जातो. यासोबतच पीएम किसान सन्मान योजना अंतर्गत महिलांना 500 रुपये लाभ वितरित केला जातो. शेतकरी महिलांना 1000 हजार रुपये प्रति महिना असा लाभ वीतरित करण्यात येत आहे. मग या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये लाभ न वितरित करता उर्वरित फक्त 500 रुपये प्रति महिना लाभ वितरित केला जाणार आहे.

पुढील कार्यवाही वार्षिक उत्पन्नावर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अडीच लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असावे अशी देखील ठेवण्यात आली होती. या अटीची अंमलबजावणी करत राज्य शासन आता अडीच लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना देखील या योजनेतून वगळण्याचे काम करणार आहे. लवकरच महिला व बाल विकास विभाग प्राप्तीकर विभागाकडून कुटुंबाचे उत्पन्न किती आहे याची यादी मागवणार आहे. यादीनुसार राज्यातील अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्याचे काम राज्य शासन करणार आहे.

Leave a comment