बियाणे अनुदान योजना
नमस्कार आज आपण खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे अनुदान योजना याविषयी माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी महाराष्ट्र शासनामार्फत बियाणे अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी महाराष्ट्र शासनामार्फत बियाणे वाटप हे शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे जून मध्ये करण्यात येते आणि रब्बी बियाणे वाटप हे सप्टेंबर ऑक्टोबर च्या दरम्यान करण्यात येते. या बियाणे अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीला अर्ज हा बियाणे वाटप होणे आधीच एका महिना अगोदर करायचा असतो.
या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ व्हावी तसेच त्यांना आपल्या शेतीतून जास्तीत जास्त पीक घेऊन चांगले उत्पन्न घेता यावे आणि शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून चांगले उत्पन्न व्हावे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी असा या योजनेमागचा हेतू आहे. तसे पण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना राबवल्या जातात जेणेकरून नवीन येणाऱ्या पिढीला शेतीकडे आकर्षित व्हावे आणि कमी शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न शेतकऱ्यांनी काढावे .यासाठी हे राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.
तसेच बियाणे अनुदान योजनेअंतर्गत अर्जदाराला सोयाबीन, कापूस, वाटाणा, मसूर किंवा यादीत समाविष्ट असलेल्या इतर कोणत्याही बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. बियाणे योजना अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची प्रोसेस ही पूर्ण ऑनलाईन आहे. ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीने ऑनलाइन बियाणे अनुदान योजना 2024 चा लाभ घेऊ शकतात.
योजना | बियाणे अनुदान योजना mahadbt biyane anudan yojana |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी |
योजनेची सुरुवात | 2007 आठ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत |
कोणा द्वारे सुरू | महाराष्ट्र शासन |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
लाभ | विविध पिकांचे बियाणे 50 टक्के अनुदानावर देणे |
पिके | अन्नधान्य, कडधान्य, तृणधान्य आणि फळबाग यासाठी |
अधिकृत वेबसाईट |
बियाणे अनुदान योजना पात्रता
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असावा.
- अर्जदार व्यक्तीच्या नावाने शेती विषयी सातबारा आठ उतारा पाहिजे
- ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीकडे शेतीसाठी आवश्यक व मुबलक प्रमाणात सिंचन सुविधा असावी
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी अनुसूचित जाती, जमातीचा असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीची जमिनी संदर्भात कोणतीही न्यायालयीन केस नसावी.
- जर गहू ,तांदूळ कापूस डाळिंब ,तसेच ऊस या पिकासाठी अर्जदार व्यक्ती अर्ज करीत असेल तर अर्ज करताना तो त्या जिल्ह्यातील शेतकरी असला पाहिजे.
बियाणे अनुदान योजनेअंतर्गत या बियाण्याच्या खरेदीवर पन्नास टक्के अनुदान दिले जाते.
- उडीद
- तुर
- नाचणी
- कापूस
- बाजरी
- भुईमूग
- भात
- मका
- सोयाबीन
- मूग
वरील दिलेल्या या पिकांना 50 टक्के अनुदान दिले जाते. mahadbt biyane anudan yojana
बियाणे अनुदान योजना आवश्यक लागणारी कागदपत्रे
- अर्जदार व्यक्तीच्या नावाने असलेल्या शेत जमिनीचा 7/12 उतारा.
- जातीचे प्रमाणपत्र
- 8 अ प्रमाणपत्र
- पूर्वसंमती पत्र
- योजनेचा अर्ज
बियाणे अनुदान योजना अर्ज करण्याची पद्धत
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम अधिकृति वेबसाईटवर जावे लागेल.
- या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर अर्जदार व्यक्तीच्या समोर नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करून आपली नोंदणी करून घ्यावी.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदार व्यक्तींनी शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करावे.
- तुमच्यासमोर यामध्ये शेतकरी बांधवांशी व शेतीशी निगडित सर्व शासकीय योजना मिळतील त्यातील बियाणे अनुदान योजनेवर क्लिक करून अर्ज करावे.
- त्यानंतर अर्जदार व्यक्तीने कोणत्या पिकांसाठी तसेच किती पिकांसाठी बियाणे अनुदान पाहिजे हे एक एक भरायचे आहे.
- त्यासाठी सर्व आवश्यक असणारे कागदपत्रे जोडून अपलोड करून घ्यावी.
- तसेच या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदारास अर्जाचा ऑनलाइन शुल्क 26.60 रुपये ऑनलाईन पद्धतीने भरावे लागते.
- अर्जदार व्यक्तींनी अर्ज सबमिट बटनावर क्लिक करून ऑनलाइन अर्ज प्रोसेस पूर्ण करावी
- त्यानंतर तुमचा अर्ज ऑनलाईन कृषी विभागाकडे सादर केला जाईल.
- अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसात कृषी विभागातील कृषी सहाय्यक अधिकारी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवून देतील.
- अनुदान स्वरूपातील बियाणे पॅकिंग पिशव्या तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये काही दिवसात देण्यात येतील.
mahadbt biyane anudan yojana