मका पिकातील खास उत्पादन देणारे बियाणे. maize seeds variety

maize seeds variety राज्यातील बहुतांश शेतकरी रब्बी हंगामामध्ये मका या पिकाची निवड करतात, परंतु बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना बियाण्याची योग्य ओळख न पटवल्यामुळे किंवा योग्य बियाण्याची निवड न केल्यामुळे उत्पादन क्षमतेत घट पाहायला मिळतील. त्यामुळे राज्यातील चांगले असणाऱ्या मका maize seeds variety बियाण्या बद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत.

पेरणी कालावधी कृषी तज्ञांच्या मते मका पिकाची उत्पादन वाढीसाठी 15 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पेरणी करणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पेरणी योग्य अंतर

कृषी क्षेत्राशी निगडित असणाऱ्या तज्ञांच्या मते मका या पिकासाठी बियाणे सोबतच मका या पिकातील पेरणी अंतर देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. यानुसार मध्यम कालावधीत परिपक्व होणाऱ्या बियाण्याची निवड केल्यास 75 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर या प्रमाणात बियाण्याची पेरणी करणे आवश्यक आहे. परंतु जर लवकर परिपक्व होणाऱ्या जातीची लागवड करणार असतील तर त्यांनी 60 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी.

हे वाचा: रब्बी पिक विमा अर्ज भरणे सुरू लवकर करा अर्ज

एकरी किती बियाणे वापरावे.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे पेरणी करताना किती प्रमाणात किती बियाणे वापरावे. तर सरासरी 16 ते 17 किलो बियाणे प्रती हेक्टर या प्रमाणात वापरणे गरजेचे आहे.

सुधारित बियाण्यांच्या जाती maize seeds variety

मांजरी रब्बी हंगामात अत्यंत महत्त्वाचा असणारी जात म्हणजे मांजरी या जातीला परिपक व कालावधी 90 ते 110 दिवस आहेत म्हणजेच या जातीत शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देखील मिळते या जातीपासून सरासरी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 40 ते 50 क्विंटल एवढे उत्पन्न मिळत असल्याची माहिती दिलेली आहे

करवीर करूया जातीची देखील राज्यामध्ये बहुतांश शेतकरी लागवड करतात या बियाण्याची राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पेरणी केली जाते याचा कालावधी 100 ते 110 दिवस आहे उत्पन्नाच्या बाबतीत या जातीपासून प्रति हेक्टर 40 ते 50 क्विंटल एवढे उत्पन्न निघत असल्याची माहिती दिलेली आहे.

राजर्षी राजश्री या जातीची परिपक व कालावधी 100 ते 110 दिवस एवढा आहे ही एक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे सुधारित बियाणे आहे हे एक संकरित बियाणे असल्यामुळे शेतकऱ्यांना याचे उत्पन्न देखील खूप चांगले मिळते या जातीपासून शेतकऱ्यांना सरासरी 55 ते 60 क्विंटल प्रत्येक हेक्टर या प्रमाणात उत्पन्न मिळते अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे.

डेक्कन एक संकरित सुधारित मक्याची जात म्हणजे डेक्कन राज्यात बहुतांश शेतकरी या बियाण्याची निवड करतात याचा कालावधी 105 ते 110 दिवस एवढा आहे या बियाण्यांमधून शेतकऱ्यांना सरासरी प्रती हेक्टर 55 ते 60 क्विंटल पर्यंत ची उत्पन्न झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आलेली आहे.

Leave a comment