mhada lottery: म्हाडा अंतर्गत सर्वसामान्य प्रवर्गातील नागरिकांना घराचे वितरत केले जाणार आहे. गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळामार्फत 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना व 20 टक्के सर्वसमावेशक योजनेच्या सोडतीनंतर काही घरे शिल्लक राहिले आहेत. याच घरांची सोडत करण्याबाबत अनेक संघटनाकडून मागणी करण्यात आली होती. याच मागणीला प्राधान्य देत आता घरांची वितरण करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या अर्जाच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या प्रमाणावर घर वितरित केले जाणार आहेत.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी करतो आणि पात्र असणाऱ्या अर्जदारांनी दिनांक 10 एप्रिल 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. पुणे म्हाडाच्या संकेतस्थळावर नवीन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. गरजू व पात्र असणाऱ्या बाबत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे अशी मागणी म्हाडाच्या पुणे विभागाकडून करण्यात आली आहे.
कसे होणार वितरण mhada lottery
पुणे म्हाडा विभागाकडून गरजू व पात्र असणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गांमध्ये नागरिकांकडून अर्ज मागण्यात येत आहेत. या अर्जांच्याबाबत शिल्लक असणाऱ्या घरांचे वाटप केले जाणार आहे. यासाठी जशी अर्ज प्राप्त होतील तसे घरांचे वाटप केले जाणार आहे. या माध्यमातून प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या प्रमाणात घरांचे वाटप केले जाणार आहे. ज्या अर्जदारांचे अर्ज सुरुवातीला येतील त्या अर्जदारांना शिल्लक असणाऱ्या सदनिकांमधून वाटप केले जाईल.
बांधकाम कामगारांना दिले जाणार पेन्शन
अर्ज कोठे करावा
mhada lottery पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्थ सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पुणे विभागाच्या अधिकृत म्हाडा संकेतस्थळावर अर्ज सादर करावा लागेल. https://bookmyhome.mhada.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.