palanaghar अंगणवाडी मध्ये पाळणाघर ; पाळणा सेविका आणि मदतनीसांना मानधन मिळणार

palanaghar मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यात अंगणवाडीमध्ये पाळणाघर ही योजना राबविण्यात येणार आहे. त्याबाबतचे सरकारने परिपत्रक जारी केलेले आहे.

पाळणाघर या योजनेअंतर्गत प्रत्येक पाळण्याकरिता पाळणा सेविका व पाळणा मदतीस याची प्रत्येक 1 पद निर्माण करण्यात येणार आहे. त्यानुसार, संबंधित अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना भत्ता तसेच पाळणा सेविका व पाळणा मदतीने यांना मानधन दिले जाणार आहे. यासाठी शासनाकडून वार्षिक खर्च 3 लाख 35 हजार एवढा आहे. राज्यात अंगणवाडीमध्ये सुरुवातीला 345 पाळणा घरे सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 60 टक्के केंद्र सरकार खर्च करणारे असून उर्वरित 40 टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे.

हे वाचा : पोस्ट ऑफीस ची दामदुप्पट योजना
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार पाळणाघरासाठी आवश्यक साहित्य, पूर्वशालेय शिक्षण घटक संच, अतिरिक्त पूरक पोषण आहार, पाळणा भाडे, औषधी संच, खेळणी साहित्य, संबंधित अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना भत्ता दिला जाणार आहे आणि तसेच पाळणा सेविका व पाळणा मदतनीस यांचे मानधन करिता मानसिक तसेच वार्षिक खर्च अनुज्ञेय करण्यात आला आहे . पाळणा उभारण्यासाठी खर्च फक्त 50 हजार रुपये एवढा राहील.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

palanaghar पाळणा स्तरावर समिती

अंगणवाडी सेविका-अध्यक्ष , अंगणवाडी मदतनीस,6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थ्याची माता, तसेच 3 वर्ष ते सहा वर्ष वयोगटातील लाभार्थीची माता, पाळणा मदतनीस हे सदस्य असतील तर पाळणा सेविका सदस्य सचिव राहतील.

Leave a comment

Close Visit Batmya360