Pik vima rule: आता या शेतकऱ्यांचा मिळणार नाही पिक विमा; पिक विमा योजनेत नवीन बदल

Pik vima rule : दिवसेंदिवस निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. या बदलामुळे भर उन्हाळ्यात पाऊस पडल्याचे आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे आपण पाहिले आहे. बऱ्याच वेळा खरीप हंगामामध्ये देखील अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अवकाळी पाऊस, पूर , गारपीट, अतिवृष्टी, ढगफुटी या व अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना म्हणजे पिक विमा योजना. या योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत वितरित केली जात आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणारी योजना म्हणजे पिक विमा योजना. या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2016 मध्ये केली होती. पंतप्रधान पिक विमा योजना या नावाने योजनेची अंमलबजावणी देशभर करण्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या योजनेमध्ये अनेक बाबींची कमतरता दिसून येत होती. त्यानुसार राज्य शासनाने विविध धोरण अवलंब करत योजनेमध्ये अनेक बदल करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या बदलाच्या अनुषंगाने योजनांमध्ये अनेक शेतकऱ्यांकडून गैरप्रकार केल्याचे शासनाचे निदर्शनास आले. याच धरतीवर सरकारकडून या नियमावलीमध्ये बदल करण्याचे जाहीर केले.

शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यास पिक विमा वितरित करण्याबाबत आदेश दिले होते. परंतु आता शासनाने या नियमामध्ये बदल करण्याचे धोरण आखले आहे. आता शेतकऱ्यांना फक्त पीक कापणी प्रयोग आधारित पिक विमा वाटप केले जाणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला नवं बळ! महिलांना मिळणार ₹40,000 चे बिनव्याजी कर्ज.

कोणते नियम रद्द Pik vima rule

  • शेतकऱ्यांच्या पिकाची पेरती न झाल्यास देखील शेतकऱ्यांना पिकविमा वाटप केला जात होता. आता या नवीन नियमावलीनुसार शेतकऱ्यांच्या पिकाची पेरणी न झाल्यास शेतकऱ्यांना पिकविमा वाटप केला जाणार नाही.
  • शेतकऱ्यांची पीक वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाची नैसर्गिक आपत्ती नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई दिली जात होती. आता या नवीन नियमानुसार शेतकऱ्यांच्या पीक वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाचे नुकसान झाल्यास देखिल शेतकऱ्यांना पिकविमा वाटप केला जाणार नाही.
  • काढणीपतच्यात शेतकऱ्यांच्या पिकाचे किंवा शेतीमालाचे नुकसान झाल्यास देखील आता शेतकऱ्यांना पिकविमा वाटप केला जाणार नाही.

फक्त याचं निकषावर मिळणार पिक विमा

सरकारकडून नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. या नवीन नियमाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना आता पेरणी न झाल्यास देखील पिक विमा वाटप केला जाणार नाही. तसेच वाढीव अवस्थेमध्ये शेती पिकाचे नुकसान झाल्यास देखील शेतकऱ्यांना पिकविमा वाटप केला जाणार नाही. पिकाची काढणी दरम्यान किंवा काढणी पश्चात देखील शेती पिकाचे नुकसान झाले तरी देखील शेतकऱ्यांना आता पिकविमा वाटप केला जाणार नाही. मग शेतकऱ्यांना पिकविमा कोणत्या निकषावर वाटप केला जाणारा हा देखील शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.

यापुढे शेतकऱ्यांना फक्त पीक कापणी प्रयोग अंतर्गतच पिकविमा वाटप केले जाणार आहे. या आधी या चार ट्रिगर च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विम्याची वाटप केले जात होते. परंतु आता या नवीन नियमावलीनुसार शेतकऱ्यांना फक्त पीक कापणी प्रयोग अंतर्गतच पीक विमा वाटप केला जाणार आहे. इतर कोणत्याही ट्रिगर मध्ये किंवा इतर कोणत्याही स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना यापुढे पिक विमा वाटप केला जाणार नाही.

एक रुपयातील पिकविमा देखिल बंद

राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना पिकविमा योजनेमध्ये सर्वांचा समावेश होण्यासाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरू केली. या योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी फक्त एक रुपया भरणे आवश्यक होते. एक रुपया मध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा पिकविमा उतरवणे शक्य करण्यात आले होते.

हे पण वाचा:
Crop Insurance List Crop Insurance List: पीक विमा योजनेअंतर्गत 921 कोटी रुपयांची मदत; शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेमध्ये सहभाग नोंदवता यावा. या हेतूने राज्य शासनाने राज्यांमध्ये एक रुपयात पिकविमा योजना सुरू केली. परंतु या योजनेमध्ये अनेक गैरप्रकार घडल्यामुळे राज्य शासनाने यापुढे एक रुपयातील पिकविमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा:
Crop Insurance List Maharashtra : Crop Insurance List Maharashtra: पीक विमा परतावा यादी जाहीर; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १०१ कोटी जमा..!

Leave a comment