PM Kisan Yojana : पीएम किसान ही योजना केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये आर्थिक लाभ दिला जातो. हा लाभ तीन समान हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19 हप्ते देण्यात आले आहे. आता या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 20 वा हप्ता कधी दिला जाणार तसेच पी एम किसान योजनेचे स्टेटस कसे पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहूया. PM Kisan Yojana

कधी मिळणार पीएम किसानचा 20 वा हप्ता
सध्या शेतकरी हे पीएम किसान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या हप्त्याचे केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अंदाजानुसार जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान चा हप्ता जमा केला जाऊ शकतो. केंद्र सरकारकडून कोणतीही या योजनेच्या हप्त्या बाबत माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे देशातील शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवरून त्याची नियमित स्थिती तपासणे आवश्यक आहे.PM Kisan Yojana
हे वाचा : जमीन खरेदी केल्यानंतर…25 दिवसात होणार सातबारा उताऱ्यावर नोंद..! ते कसे ?
पीएम किसान (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच 2000 रुपये दिले जातात. पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी 20 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीची स्थिती, इ के वाय सी पूर्ण झाली आहे की नाही, आणि शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही याची खातरजमा करणे आवश्यक आहे. जर वरील दिलेल्या बाबी व्यवस्थित पूर्ण झालेले असतील, तरच त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.PM Kisan Yojana
पी एम किसान योजनेचे स्टेटस असे तपासा…
- शेतकऱ्यांना त्यांच्या पीएम किसान स्थिती तपासण्यासाठी सर्वप्रथम या अधिकृत वेबसाईटवर https://pmkisan.gov.in/भेट द्यावी लागेल.
- या वेबसाईटवर गेल्यानंतर शेतकऱ्यांना कॉर्नर विभागात Know Your Status किंवा लाभार्थी स्थिती हा पर्याय निवडून घ्यावा लागतो.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार क्रमांक , बँक खाते क्रमांक मोबाईल क्रमांक या तिन्ही पैकी कोणतीही एक माहिती समाविष्ट करून डेटा मिळवा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी स्थिती दिसेल यामध्ये तुम्ही लाभार्थी यादी आहे की नाही, तसेच मागील आहात त्याची पेमेंट तुम्हाला मिळाले की नाही. झाले की नाही, तसेच मागील हप्त्याचे पेमेंट मिळाले की नाही याची सर्व माहिती तुमच्यासमोर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल..
ई केवायसी करणे अनिवार्य
- या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी एकेवायसी केली की नाही हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे, कारण की केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई केवायसी प्रक्रिया न करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत ई-केवायसी ही प्रक्रिया पण पोर्टलवरच करता येते काही राज्यांमध्ये ही प्रक्रिया फक्तCSC किंवा स्थानिक कृषी कार्यालयामार्फतच ई-केवायसी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर सर्व अवश्य गोष्टी पूर्ण केल्या पाहिजे. यामध्ये जर शेतकऱ्यांना कोणतेही अडचणी आल्या तर शेतकऱ्यांनी आपल्याजवळील जिल्हा कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्र शी संपर्क साधावा.
- पीएम किसान ही योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ सुरळीत चालू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी माहितीची नियमित पडताळणी करणे आवश्यक आहे. अधिकृत घोषणावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. PM Kisan Yojana