ladki bahin yojana : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर !या दिवशी खात्यात जमा होणार एप्रिल महिन्याची 1500 रुपये

ladki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची आतुरतेने वाट पाहत आहे . एप्रिल महिना संपत आला तरी पण अजून हप्ता देण्यात आलेला नाही .राज्यातील लाखो महिला या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत .

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना अंतर्गत दरमहा 1500 हजार रुपये दिले जातात . या योजनेची सुरुवात 2024 पासून झाली आहे सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना 9 हप्ते देण्यात आले आहेत .आणि आता राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होतो याची प्रतीक्षा आहे .तर अशातच लाडक्या बहिणींसाठी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे .ladki bahin yojana

ladki bahin yojana

कधी जमा होणार एप्रिलचा हप्ता

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे मॅडम यांनी एप्रिल महिना संपण्या अगोदर पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनांची पैसे जमा केली जाईल असे सांगितले .परंतु अदिती तटकरे मॅडम यांनी याबाबत कोणतीही तारीख सांगितली नाही . परंतु, 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया आहे त्यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा हप्ता दिला जाईल अशी शक्यता आहे .आता एप्रिल महिना संपण्यास फक्त 9 दिवस शिल्लक राहिले आहेत यामुळे राज्यातील पत्र असणाऱ्या महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची उत्सुकता वाढली आहे .ladki bahin yojana

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : नमो शेतकरी आणि पीएम किसान च्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक….!

2 कोटी 47 लाख महिलांना लाभ

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण (ladki bahin yojana) योजना राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास महिलांना सक्षम करण्यासाठी राबवण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना .1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते .ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ केला जातो .पण इतर सरकार योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही .सध्या राज्य मध्ये 2 कोटी 47 लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत .या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत नऊ हप्ते वितरित करण्यात आले आहेत .ladki bahin yojana

निकषांमध्ये बदल होणार का?अदिती तटकरे..

या योजनेबाबत पात्रता निकष आणि अर्ज छाननी बाबत विचारले असताना अदिती तटकरे मॅडम म्हणाल्या, ही योजना सुरू केल्यापासून ते आतापर्यंत चर्चेचा विषय ठरली आहे .या योजनेमध्ये गैरसमज पसरले गेले आहेत .पण आम्ही आजही शासन निर्णयानुसारच निकषाची पडताळणी करत आहोत यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही .यामध्ये उत्पन्नाची मर्यादा 2.5 यामध्ये काही बदल नाही. इतर शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी नियम स्पष्ट आहेत .

सध्याही लाडक्या बहिणीच्या अर्जाची तपासणी सुरूच आहे, या योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना लाभ दिला जाणार नाही म्हणजेच त्या महिला आता या योजनेतून वगळण्यात येणार आहेत.या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत नऊ लाख महिला वगळण्यात आलेल्या आहेत .मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी ही विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सुरू करण्यात आली असून, यामध्ये ज्या महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नाही किंवा सरकारी नोकरी करत आहेत अशा महिलांची पडताळणी करून त्या महिला या योजनेतून वगळण्यात आल्या आहेत .त्या महिलांना आता इथून पुढे लडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही .ladki bahin yojana

Leave a comment

Close VISIT MN CORNERS