पॉलिहाऊस अनुदान पात्रता आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया

पॉलिहाऊस अनुदान योजना

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

     नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपण आज या लेखांमध्ये एक नवीन योजना पाहणार आहोत जी सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आहे सरकारच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात परंतु त्या अनेक शेतकऱ्यांना माहिती नसतात. त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कसा करायचा हे माहिती नाही, आज आम्ही तुम्हाला पॉलिहाऊस या योजनेबद्दल या लेखांमध्ये माहिती सांगणार आहोत याचा अर्ज कसा करायचा, या योजनेचा लाभ काय आहे ,या योजनेसाठी किती अनुदान दिले जाते या सर्वांची माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे हा लेख तुम्ही वाचावा.

     राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकल्पाच्या योजना राबवत आहे.पॉलिहाऊस अनुदान योजना सरकार राष्ट्रीय बागकाम चळवळ योजनेअंतर्गत चालवते. पॉलिहाऊस  योजनेसाठी सरकार तुम्हाला 50 टक्के अनुदान देणार आहे. या योजनेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून  शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे असा या योजनेचा उद्देश आहे.

    पॉलिहाऊस अनुदान योजना माहिती

पॉलिहाऊस योजना साठी सरकार शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देत आहे जेणेकरून या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कमी शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढावे असा या सरकारचा उद्देश आहे. पॉलिहाऊस योजना हळूहळू भारतामध्ये लोकप्रिय होत आहे त्यामुळे शेतकऱ्याची उत्पन्न आणि नफाही वाढत आहे. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत एकाधिक घरे बांधण्यासाठी 935 रुपये प्रति युनिट खर्च येतो, ज्यामध्ये सरकारी अनुदान 50 टक्के किंवा प्रति युनिट 467 रुपये आहे.

            पॉलिहाऊस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळे, भाज्या इ.(भाज्यांमध्ये कोबी, मुळा ,मिरची, कोथिंबीर ,कांदे, पालक, मेथी आणि बरेच काही समाविष्ट आहे. यामध्ये फुले म्हणजे जरबेरा गुलाबासारखी फुले आणि पपई स्ट्रॉबेरी सारखी फळे) या पॉलिहाऊस मध्ये घेऊ शकतात. जेणेकरून या पिकांचे कसल्या प्रकारचे नुकसान होणार नाही आणि उत्पन्नामध्ये वाढ होईल.

शेतकऱ्यांना युनिट खर्चाच्या 50% अनुदान. अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक शेतकऱ्यांना 20% अनुदान देण्यात येणार आहे.

पॉलिहाऊस अनुदान

योजनेचे नाव

पॉलिहाऊस अनुदान योजना

कोणामार्फत राबवली जाते

केंद्र सरकार द्वारे

विभाग

कृषि विभाग महाराष्ट्र  

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन

उद्देश

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.

लाभ

50 टक्के अनुदान दिले जाते

लाभार्थी

देशातील शेतकरी

अधिकृत संकेतस्थळ

https://mahadbt.maharashtra.gov.in/

पॉलिहाऊस अनुदान योजना शेतीचे फायदे

  • या योजनेचा असा फायदा आहे की तुमची सातत्यपूर्ण उगवली जात असल्याने, पिकाचे नुकसान  होण्याची शक्यता कमी असते.
  •  या पॉलिहाऊस मध्ये कीटकनाशके कमी असतात.
  •  आपण वर्षाच्या कोणतेही वेळी पिके घेऊ शकतो हे पिके घेण्याकरिता आपल्याला कोणत्या ऋतूंमध्ये कोणती पिके घेतली जाते त्याची वाट बघायची गरज पडणार नाही हा या योजनेचा फायदा आहे .
  •  या पॉलिहाऊस मध्ये बाहेरील बदलत्या हवामान वातावरणाचा (ऊन ,पाऊस, वारा गारपीट) पिकांच्या वाढीवर परिणाम होणार नाही. परिणामहवामान वातावरणाचा.
  • पॉली हाऊस मध्ये घेतलेल्या पिकांची उत्पादनाची गुणवत्ता चांगली असते.
  •  खुल्या वातावरणामध्ये केलेल्या शेतीपेक्षा या पॉलिहाऊस मध्ये शेतकऱ्यांनी कमी जमिनीमध्ये चांगले उत्पन्न होते.
  •  या पॉलिहाऊस मध्ये फुलाचे पीक पण घेता येते वेगवेगळ्या प्रकारचे महागडी फुले या पॉली होती मध्ये घेता येतात.
  •  पॉलिहाऊस मध्ये, कोणत्याही ऋतूमध्ये रोपासाठी योग्य वातावरण परिस्थिती प्रदान करते.

पॉलिहाऊस योजना अनुदान

यानंतर पॉलिहाऊस योजनेसाठी अनुदान चार स्केअर मीटरचे पॉलिहाऊस बांधण्यासाठी 34 लाख रुपये खर्च येतो, म्हणजे प्रत्येकी प्रती चौरस मीटर साठी 844 रुपये इतका खर्च येतो. त्यानुसार शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येते आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना 70 टक्के अनुदान देण्यात येते.

पॉलिहाऊस सुरक्षित शेती

     या पॉलिहाऊस शेतीमध्ये फलो उत्पादन क्षेत्रात सुरक्षितते पद्धत करता येते, भाज्या फुले व फळांची अधिक उत्पन्न घेता येते व त्याद्वारे चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना घेता येते, त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. फुले ,भाज्या यासाठी शेतकऱ्यांना हरितगृह ,प्लास्टिक टनेल, शेडनेट इ चा वापर करतात. हरितगृह शेडनेटच्या वापरामुळे शेतकऱ्यांना फुले , भाज्या योजना उत्पादन घेता येते आणि कमीत शेतीमध्ये शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न या पॉलीहाऊस मध्ये घेता येते यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडेल असा या सरकारचा उद्देश आहे

पॉलिहाऊस अनुदान

पॉलिहाऊस अनुदान उद्देश

  •  या योजनेअंतर्गत समावेश झालेल्या 15 जिल्ह्यातील निवड केलेल्या गावातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान वातावरण बदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये सक्षम बनवणे.
  •  ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार निर्माण करणे असा या योजनेचा उद्देश आहे.
  •  फलोत्पादन क्षेत्रात बिगर हंगामी पीक घेण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  •  शेतकऱ्यांना चांगलं दर्जाचे पीक घेण्यासाठी आणि पिकाच्या लागवडीसाठी मदत करणे.

पॉलिहाऊस अनुदान पात्रता

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन हेक्टर पर्यंत जमीन असणारा लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेत जमीन असणारा शेतकरी तो कोणीही असो अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण शेतकरी या सर्वांना योजनेचा लाभ दिला जाईल.

पॉलिहाऊस योजना अर्ज करण्याची पद्धत

  • पॉलिहाऊस योजना ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेत आहे त्यांनी प्रकल्पाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा.
  • किंवा DBT ॲप द्वारे नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करावा. व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.

निष्कर्ष

या योजनेमध्ये आम्ही तुम्हाला पॉलिहाऊस योजनेबद्दल माहिती सांगितलेली आहे. या योजनेसाठी किती अनुदान दिले जाते याचा लाभ कोणाला दिला जातो फायदे काय आहेत हे सर्व या योजनेमध्ये दिलेले आहे. या योजनेचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे जरी कोणाला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेबद्दल माहिती त्यांना सांगा किंवा हा लेख त्यांना शेअर करा.

विचारले जाणारे प्रश्न

  1. पॉलिहाऊस योजनेमध्ये किती टक्के अनुदान दिले जाते?
  •  पॉलिहाऊस योजनेमध्ये 50 टक्के अनुदान दिले जाते
  1. पॉलिहाऊस योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल?
  •  पॉलिहाऊस योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  1. या योजनेचा फायदा काय आहे?
  •  या योजनेचा फायदा शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होणार नाही, कीटनाशकापासून पिकाचे संरक्षण होईल, आपल्याला वर्षात कोणतीही पिके या पॉलिहाऊस मध्ये घेऊ शकतात, ऊन, पाऊस, वारा गारपीट, यापासून पिकाचे संरक्षण होईल. पॉलिहाऊस मध्ये कमी जमिनीत जास्त पीक निघते व चांगले प्रकारचे होईल त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होईल व भाव पन चांगला मिळेल.

Leave a comment