RTE Admission:आरटीई अर्ज प्रक्रियेला सुरुवात!आतापर्यंत किती अर्ज दाखल ? तुम्ही केला का अर्ज?

RTE Admission : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई – Right to Education) सन 2025 – 26 च्या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. ही सुरवात 14 जानेवारी पासून झाली आहे. पालक आपल्या पाल्याचे प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज करत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 जानेवारी आहे, त्यामुळे ज्या पालकांनी अद्याप अर्ज केले नाहीत, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावा, असे शिक्षण विभागाने आवाहन केले आहे. त्या मुळे पालकांनी आपल्या पाल्याचे RTE Admission लवकरात लवकर करून घ्यावे

RTE Admission

RTE Admission अर्जांची संख्या आणि शाळांची नोंदणी

आतापर्यंत राज्यात 8,863 शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. प्रवेशासाठी एकूण राज्यात 1 लाख 9 हजार 111 जागा उपलब्ध आहेत. आरटीई प्रक्रियेत आत्तापर्यंत  1 लाख 36 हजार 983 विद्यार्थ्यांनी आरटीई प्रवेशासाठी अर्ज केला आहे, जे दर्शवते की पालकांची सक्रियता आणि आरटीई प्रवेशासाठीची मागणी खूप मोठी आहे.

हे वाचा : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा…..

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
UPI Transaction Charges UPI Transaction Charges: UPI व्यवहार महागणार? खासगी बँकांनी सुरू केले शुल्क आकारणे, तुमच्या खिशावर परिणाम होणार का?

RTE Admission पालकांसाठी महत्त्वाची सूचना

शिक्षण विभागाने पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यात प्रमुख सूचना अशी आहे की, पालकांनी आरटीईसाठी खोटी कागदपत्रे किंवा माहिती सादर केली तर त्यांच्यावर कारवाई होईल. याशिवाय, पालकांना चेतावणी दिली आहे की, अर्जामध्ये काही चूक झाल्यास, अर्ज सबमिट करण्यापूर्वी ते डिलीट करून नव्याने अर्ज प्रक्रिया करावी लागेल. त्यामुळे, अर्ज भरताना योग्य माहिती आणि कागदपत्रांचा वापर सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

ज्या पालकांना आपल्या मुलाचा अर्ज भरायचा आहे त्यांनी अंतिम मुदत तिच्या अगोदर म्हणजेच 27 जानेवारी पर्यंत आपल्या पाल्याचा अर्ज करून घ्याव . हा अर्ज तुम्ही ऑनलाइन भरू शकतात. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरावा लागेल .https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

हे पण वाचा:
student st pass आता एसटी बस पास मिळणार थेट शाळेतच student st pass

अशा प्रकारे आरटीई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्कलंकता राखली जाईल, आणि योग्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी शिक्षण विभाग अधिक कार्यक्षमतेने काम करत आहे. RTE Admission

हे पण वाचा:
apatya pramanpatra in marathi apatya pramanpatra in marathi अपत्य स्वयं घोषणा पत्र

Leave a comment