Solar Pump Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महावितरण कंपनीकडून एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे . ही सूचना शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार बाबत आहे .सोलार बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडून खड्डे खोदून घेणे,वाहतुकीसाठी पैसे मागणे तसेच त्यांना सिमेंट वाळू अन्यास सांगणे अनेक प्रकारच्या तक्रारी महावितरण कडे काही भागातून येत आहेत या तक्रारीची महावितरण कडून दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कोटीशन व्यतिरिक्त कोणाला पैसे देऊ नये असे आव्हान महावितरणने केले आहे . Solar Pump Update

कोटीशन व्यतिरिक्त रक्कम कोणालाही देऊ नये असे महावितरणचे आव्हान
महावितरण कडून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू आहे . तर या अगोदर केंद्र सरकारच्या कुसुम -बी योजनेतून
सौर कृषी पंप बसवण्यात आले आहे .या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना 25% अनुदान देण्यात आले आहे तर इतर .वर्गवारीतील शेतकऱ्यांना 90% अनुदानावर सौर पंप मिळवता येतो. 3 एचपी या पंपासाठी अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी 11486 रुपये, तर इतर शेतकऱ्यांसाठी 3 एचपी पंपासाठी 22,971 रुपये ,अनुसूचित जाती जमाती तील शेतकऱ्यांना करिता 5 एचपी पंपासाठी 16,038 रुपये तर इतर शेतकऱ्यांसाठी 32,075 रुपये, तर 7.5 एचपी पंपासाठी 22,465 रुपये तर इतर शेतकऱ्यांसाठी 44,929 रुपये भरावे लागतात . सोलर पंप योजनेसाठी शेतकऱ्यांनी भरलेल्या या रकमेमधून संपूर्ण स्थापनेपासून ते देखभाल व दुरुस्ती सह सर्व सेवा समाविष्ट आहेत .Solar Pump Update
हे वाचा : घरकुल अनुदानात 50 हजार रुपयांची झाली वाढ…! सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा…
तक्रार कोठे कराल?
- जर तुमच्याकडे कोणताही प्रतिनिधी कोटेशन विकिरिक्त पैसे मागत असेल, तर त्या शेतकऱ्यांनी जवळच्या महावितरण कार्यालयामध्ये तक्रार करावी .
- जर तुम्ही केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्यास,सोलापूर मंडळ नोडल अधिकारी कय्युम मुलाणी यांनी 9029114680 यांच्याशी संपर्क साधावा .
- महावितरण स्पष्ट केले आहे की,अशा तक्रारीची चौकशी करून संबंधित सोलार कंपन्यांवर कडक कारवाई केली जाईल.Solar Pump Update