विणकर कुटुंबांना प्रतिमाह मोफत वीज योजना
आपण आज या योजनेमध्ये विणकर कुटुंबांना प्रतिमाह मोफत वीज योजना या विषयी माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील हातमाग उद्योग करणाऱ्या कुटुंबांना मोफत वीज देऊन खूप मोठी मदत केलेली आहे. हातमाग उद्योग हा विणकारांचा एक पारंपारिक उद्योग आहे. पण आज काल हातमाग वस्त्रांची मागणी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे हातमाग वस्त्रोद्योग बंद होत चाललेला त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने वस्त्रोद्योगाला आवश्यक त्या उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राज्यातील हातमाग विनाकारांच्या कुटुंबांना प्रतिमाह 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
Table of Contents
Toggleयोजनेचे नाव | विणकर कुटुंबांना प्रतिमाह मोफत वीज योजना |
योजनेची सुरुवात | 10, नोव्हेंबर 2023 |
विभाग | |
राज्य | महाराष्ट्र |
उद्देश | हातमाग विणकरांना उपजीविकेचे संरक्षण. |
लाभार्थ | राज्यातील हातमाग विणकर कुटुंबांना |
लाभ | प्रतिमा 200 युनिट मोफत वीज |
विणकर कुटुंबांना प्रतिमाह मोफत वीज योजना उद्दिष्टे
- राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वाढीस चालना देणे.
- हातमाग विणकारांना उपजीविकेचे संरक्षण करणे.
- हातमाग वस्त्रोद्योग विणकारांचा आर्थिक व सामाजिक करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे .
हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमाह वीज योजनेचे वैशिष्ट्ये
- सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग द्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
विणकर कुटुंबांना प्रतिमाह मोफत वीज योजना लाभार्थी
- या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील हातमाग विणकर कुटुंबे लाभार्थी आहेत.
हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमाह वीज योजनेचा लाभ
- या योजनेच्या माध्यमातून हातमाग वस्त्रोद्योग विणकरांच्या कुटुंबांना प्रतिमाहा 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे.
विणकर कुटुंबांना प्रतिमाह मोफत वीज योजना फायदे
- या योजनेअंतर्गत हातमाग वस्त्रोद्योग विणकर कुटुंबांना मोफत वीज मिळणार आहे.
- हातमाग विणकर कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करून त्यांचे जीवनमान सुधारेल.
- या योजनेअंतर्गत हातमाग वस्त्र विणकर कुटुंब त्यांचा पारंपारिक उद्योग सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित होतील
- वस्त्रोद्योग सुरू ठेवण्यासाठी हातमाग विणकर कुटुंबांना चालना मिळेल.
विणकर कुटुंबांना प्रतिमाह मोफत वीज योजना पात्रता व अटी
- लाभार्थी हातमाग विणकर हा केंद्र शासनाच्या सर्वात अलीकडचे हातमाग अंतर्गत नोंदणीकृत विणकर असावा व त्याच्याकडे तसेच ओळखपत्र असावे.
- या योजनेचा लाभ कुटुंबामध्ये कितीही व्यक्ती असेल तरी पण एक व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकेल .
- अर्जाच्या दिनांक पूर्वी सहा महिन्यापासून विणकर व्यवसायात कार्यरत असावा. तसेच विणकाम करत असल्याचा मागील 6 महिन्याचा पुरावा म्हणून कच्चामाल खरेदी बिल/ पक्का माल विक्रीचे बिल / महामंडळ, महासंघ अथवा संस्थेचा सभासद असल्यास सदर विनकरास विणकाम मजुरी दिल्या बाबत संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीकडे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
- हातमाग विणकर कुटुंबांना दरमहा 1 ते 200 युनिट पर्यंत (म्हणजे 200 युनिट) वेद शासनामार्फत देण्यात येईल त्यापेक्षा जास्त म्हणजे 200 युनिट पेक्षा जास्त वीज वापर झालेल्या बिलाची रक्कम लाभार्थी व्यक्तीला स्वतःच भरावी लागेल.
- हातमाग विणकर कुटुंबाचे वीज बिल देण्याची रक्कम नियमित भरणा करणे गरजेचे राहील विलंब बिल भरणा आकारनीची रक्कम शासनाकडून देय होणार नाही.
- सदर योजनेतील लाभार्थी हातमाग विणकारांचा शासन यंत्रणेद्वारे नियमित आढावा घेण्यात येईल सदर आढाव्यामध्ये हातमाग व्यवसाय सोडला असल्याचे आढळून आल्यास असा लाभार्थी वीज अनुदान सवलतीस पात्र राहणार नाही.
हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमाह वीज योजना आवश्यक लागणारी कागदपत्रे
- विणकर ओळखपत्राची स्व प्रमाणित पत
- आधार कार्डची स्व प्रमाणित पत
- रहिवाशी प्रमाणपत्र
- हातमाग महामंडळ/विणकर हातमाग सरकारी संस्थेचा सभासद असल्यास
(a) मागील सहा महिन्याची विणकाम मजुरी दिल्या बाबतचे प्रमाणपत्र
(b) खाजगी विणकर असल्यास तो उत्पादित करीत असलेल्या वाहनाचा प्रकाराबाबत स्वघोषणापत्र
(c) विणकाम करत असल्याचा पुरावा म्हणून कच्चा माल खरेदी बिल/पक्का मालविक्री से बिल.
- विजेचा पुरावा केवळ त्यांचे कुटुंबासाठी करण्यात येईल विजेचा गैरवापर (म्हणजे इतरांना वीज पुरवठा करणे/हातमाग व घरगुती वापराशिवाय इतर व्यवसायासाठी विजेचा वापर करणे) केल्याचे आढळल्यास वीज अनुदान बंद करणे किंवा पुढील कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील असे स्घोषणापत्र
- विणकराचा अलीकडचा फोटो
- मागील तीन महिन्याचे वीज बिल.
विणकर कुटुंबांना प्रतिमाह मोफत वीज योजना अर्ज करण्याची पद्धत
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार विनकाराला आम्ही या ब्लॉगमध्ये अर्ज दिलेला आहे तो डाऊनलोड करून घ्या
- अर्ज डाऊनलोड करून घेतल्यानंतर त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत अवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील.
- आणि सदर अर्ज प्रादेशिक उपयुक्त यांचे जवळ (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) जमा करावा लागेल.
- अशाप्रकारे तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकतात
योजनेचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी Hathmag Vinkar Mofat Vij Yojana
या योजनेचा जीआर PDF पाहण्यासाठी Hathmag Vinkar Mofat Vij Yojana GR PDF
हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमाह वीज योजना विचारले जाणारे प्रश्न
- विणकर कुटुंबांना प्रति महिना मोफत वीज योजना कधी सुरू करण्यात आली?
- या योजनेची सुरुवात 10 नोव्हेंबर 2023 पासून करण्यात आली.
- हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमाहा मोफत वीज योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
- राज्यातील हातमाग विणकर कुटुंब या योजनेसाठी लाभार्थी असतील
- विणकर कुटुंबांना किती लाभ दिला जाईल?
- या योजनेच्या माध्यमातून हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमाहा 200 युनिट मोफत वीज.
निष्कर्ष
आम्ही तुम्हाला या योजनेमध्ये विणकर कुटुंबांना प्रतिमाह मोफत वीज योजना याविषयी माहिती दिलेली आहे. या योजनेमध्ये विणकर कुटुंबांना मोफत वीज दिली जाणार आहे. या कुटुंबांना 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे पण लक्षात असू द्या की 200 युनिट पेक्षा जास्त वीज जर वापर करीत असाल तर वरील युनिट ची रक्कम लाभार्थी व्यक्तीस द्यावी लागेल. तुम्हाला आमची माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच नवीन नवीन योजनेची माहिती घेण्यासाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा आपल्या वेबसाईट व्हिजिट करत रहा.
धन्यवाद!
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.