women day 2025 महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना. मार्च महिना सुरू होऊन देखील अद्याप पर्यन्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप न केल्यामुळे. लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्यभरातील महिला या योजनेच्या लाभाची प्रतीक्षा करत आहेत आणि त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, हा प्रश्न सतावत आहे.
लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी आणि मार्च चा देखील हप्ता सोबत मिळणार अशी माहिती समोर येत आहे. महिलांना एक सोबत मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार का आणि कधी मिळणर याची सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उशिरा का?
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाची योजना असून, महिलांना दर महिन्याला ₹1500 थेट बँक खात्यात जमा केले जातात. जानेवारी महिन्याचा हप्ता वेळेवर जमा झाला असला, तरी फेब्रुवारी महिन्याचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत. यामुळे अनेक महिलांनी चिंता व्यक्त केली आहे.
राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे की काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लांबणीवर पडला आहे. यासोबतच काही प्रशासकीय प्रक्रिया आणि निधीच्या व्यवस्थापनातील विलंबामुळेही पैसे वेळेवर जमा होऊ शकले नाहीत.
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या मंजुरीवर सही केल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे लवकरच हा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. महिला दिनाच्या पूर्व संध्येला (women day 2025 ) म्हणजे 8 मार्च पूर्वी फेब्रुवारी चा हप्ता महिलांना वितरित केला जाणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.
फेब्रुवारी आणि मार्च चा हप्ता सोबतच मिळणार का?
सोशल मीडिया तसेच बऱ्याच माध्यमातून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता सोबत वितरित केला जाणार अशी माहिती सोमोर येत आहे. परंतु महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता सोबत वितरित केला जाणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास विभागच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा महिला दिनाच्या पूर्वी (women day 2025) दिला जाणार आहे. परंतु मार्च महिन्याचा हप्ता अर्थ संकल्प सादर झाल्या नंतर वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती देखील दिली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार असे स्पष्ट झाले आहे की महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता सोबत वितरित केला जाणार नाही.
निष्कर्ष women day 2025
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी महत्त्वाची योजना आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता काही तांत्रिक कारणांमुळे रखडला असला, तरी तो 8 मार्च पूर्वी जमा केला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी थोडा संयम बाळगावा. महिलांना एक सोबत 3000 मिळणार नसल्याची माहिती देखील अदिती तटकरे यांनी दिली आहे. मंत्री महोदय यांनी दिलेल्या माहिती नुसार महिलांना दोन्ही हप्ते वेगळे वेगळे मिळणार आहेत.
1 thought on “women day 2025 महिला दिनाच्या आधी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारी चा हप्ता. दोन हप्ते सोबत मिळनार?”