मुख्यमंत्री योजना दूत yojana doot bharti
आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवीन्यता आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री योजना दूत yojana doot bharti
हा निर्णय राज्य सरकारने दि. 9 जुलै, 2024 रोजी या शासनाच्या निर्णयास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्ध करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचविण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री योजना दूत
योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती व जनसंपर्क याची सर्व जबाबदारी महासंचालनालय यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सादर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूतांचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे. तसेच, योजनादूतांच्या निवडीचे निकष, अटी व शहर तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री योजनादूत माहिती
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्ध करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादुत निवडण्यासाठी सन 2024 25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयान्वयेमान्यता देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री योजनादूत उद्दिष्टे
- महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचविणे याकरिता मुख्यमंत्री योजनादुत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे.
- प्रत्येक गावात एक व्यक्ति नेमलेली असल्यामुळे नागरिकांना नवीन योजना माहिती होण्यास व त्या योजनांचा लाभ मिळणे अत्यंत सोपे होईल.
जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री योजना दूत लाभ
- महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन – कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेल मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील.
- ग्रामीण भागात प्रत्येकी ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5000 हजार लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात 49 हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल.
- मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल.(प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेशित)
- निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतांसोबत 6 महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही.
मुख्यमंत्री योजना दुत पात्रता व निकष
- वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांना योजनेचा लाभ घेता येईल.
- शैक्षणिक अर्हता – कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.
- उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आधिवासी असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे आधार कार्ड असावे.
- उमेदवाराच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावे.
मुख्यमंत्री योजना दूत आवश्यक लागणारी कागदपत्रे
- विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेल्या ऑनलाईन अर्ज.
- आधार कार्ड.
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे/प्रमाणपत्र इ.
- अधिवासाचा दाखल.(सक्षम यंत्रणेने दिलेला).
- वैयक्तिक बँक खात्याचा तपशील.
- हमीपत्र.(ऑनलाइन अर्जासोबत च्या नमुन्यामधील)
योजना दूत अर्ज प्रकिया
योजना दूत अंतर्गत आपणास अर्ज करायचं असल्यास आपणास मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मध्ये आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
या पोर्टल वर नोंदणी केल्यानंतर आपणास आपला अर्ज सादर करता येणार आहे.
आता सध्या आपण आपले नाव नोंदणी करून घेऊ शकता त्या नंतर आपणास पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. जर आपण आपले नाव नोंदणी केली असेल तर आपणास पोर्टल वर जागा दिसतील तेव्हा आपणास त्या ठिकाणी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
योजना दूत हे कंत्राटी पद आहे याचा कालावधी जास्तीत जास्त सहा महीने आहे. या मध्ये अर्ज करण्यासाठी आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत नोंदणी केल्या नंतरच आपला अर्ज या पदासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024
मुख्यमंत्री योजनादूताची नेमणूक प्रक्रिया
- प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्याकरिता जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त केलेले बाह्य संस्था याची छाननी पूर्ण करेल.
- ऑनलाइन अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल.
- जिल्हाधिकारी यांनी प्रादेशिक केलेल्या प्रतिनिधी यांच्याकडून संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी केली जाईल.
- निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेले प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येकी एक शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात योजनादूत पाठवतील
निवड झालेल्या योजनादूताने करावयाची कामे
- योजना दूध संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांचे संपर्कात राहून जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती घेतील
- प्रशिक्षित योजनादूत त्यांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी स्वतः जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांना बंधनकारक असणार आहे.
- योजना दूत प्रत्येक दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा आढावा नमुना अहवाल तयार करून ऑनलाईन अपलोड करतील.
- योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीच्या स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करणार नाहीत तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसे करत असल्यास त्याच्यासोबत केलेला करार संपुष्टात आणण्यात येईल व त्याला या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल.
- योजनादूत अनधिकृत रित्या गैरहजर राहिला किंवा त्याची जबाबदारी सोडून दिली तर त्याला मानधन दिले जाणार नाही.
योजनादूत यांची मानधन प्रक्रिया.
- योजना दूत यांना प्रती महिना 10000 रुपये मानधन दिले जाईल.
- रुजू दिनांकापासून 6 महीने हे मानधन वितरित केले जाईल.
- योजना दूत यांना आधार लिंक बँक खात्यावर रक्कम वितरित केली जाईल.
- एखाद्या योजनादूत विरुद्ध काही तक्रार सादर झाल्यास त्याचे पेमेंट बंद केले जाईल.
- योजना दूत यांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर केल्यास त्याला तत्काळ पदावरून कार्य मुक्त केले जाईल.
- पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर कोणतेही मानधन वितरित केले जाणार नाही. (थकीत असणारे मानधन देखील मिळणार नाही)
- कामाची जबाबदारी पूर्ण करणाऱ्या योजनदूतांना कालावधी संपल्या नंतर थकीत असणारे सर्व मानधन वितरित केले जाईल.
निष्कर्ष
योजनादूत पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आपल्या भागातील पंचायत समिति कार्यालय मार्फत अर्ज जमा करण्यास सुरू झाले आहे. आपण अर्ज करण्यासाठी आपल्या पंचायत समिति मध्ये संपर्क साधावा.
अर्ज सादर करताना आपण ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची प्रत तसेच आपले सर्व आवश्यक कागदपत्रे आपण स्वतः पंचायत समिति मध्ये सादर करा.
या लेखाच्या माध्यमातून आपण सरकारने नव्याने सुरू केलेल्या योजनादूत या पदाबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे. आपण किंवा आपल्या जवळील एखादी व्यति यात पात्र असेल तर त्याच्या पर्यंत ही माहिती नक्की पाठवा जेणे करून त्या व्यक्तीला या माहितीचा फायदा मिळेल.
https://youtu.be/dmEFhRi2uQ0
योजना दूत या पदाबद्दल आपन सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मध्ये पदवीधर नोंदणी करू शकतात, त्याचे वय 18 ते 35 असणे आवश्यक आहे. प्रती महिना 10000 रुपये मानधन देण्यात येणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या फक्त 6 महिनेच जॉब दिला जाणार आहे हे लक्षात ठेवणे अवश्यक आहे.
मुख्यमंत्री योजनादूत बद्दल आपल्याला काही शंका असल्यास आम्हाला कॅमेन्ट किंवा ईमेल तसेच व्हॉसअप च्या माध्यमातून विचारू शकता आम्ही आपणास नक्कीच सहकार्य करू.