डीजल वॉटर पंप अनुदान डिझेल पंप खरेदीसाठी मिळवा 10,000 रुपये अनुदान.
डीजल वॉटर पंप अनुदान शेतकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी सरकार नेहमीच विविध उपक्रम राबवत असते या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात वाढ करता येईल याकरिता या योजना राबवल्या जातात. अशातच शासनाकडून शेतकऱ्यांना डीजल वॉटर पंप अनुदान अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना डीजल पंपाची आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांना डीजल पंप खरेदीसाठी दहा हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. हे अनुदान कसे घ्यावे व यासाठी कागदपत्रे कोणती लागतात याबद्दलची सविस्तर माहिती यामध्ये पाहूया.
सरकारकडून शेतकऱ्यांना डिझेल वॉटर पंप अनुदान साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देण्यासाठी लाईटची सुविधा उपलब्ध नाही किंवा सौर ऊर्जा त्यापर्यंत लाभ मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची योजना आहे. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिझेल वाटर पंप खरेदीसाठी अनुदान वितरित केलं जात. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन पिकाची गुणवत्ता सुधारेल व शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ देखील होईल त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
हे वाचा : डिझेल पंप अनुदान योजना
डीजल वॉटर पंप अनुदान साठी लागणारे कागदपत्र
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- शेतकऱ्याचे पॅन कार्ड
- बँक खाते पासबुक राष्ट्रीयकृत बँकेचे
- सातबारा व आठ अ चा उतारा
- डिझेल पंप कोटेशन
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
डिझेल वाटर पंप अनुदान अर्ज करण्याची पद्धत
- सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/login/login या संकेतस्थळावर जावे लागेल.
- या संकेतस्थळावर गेल्यानंतर याआधी आपण नोंदणी केली नसल्यास नवीन नोंदणी हा पर्याय निवडून आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी लागेल.
- नोंदणी पूर्ण केल्यानंतर आपल्याला आपले युजरनेम आणि पासवर्ड मिळेल.
- आपले युजरनेम आणि पासवर्ड ने लॉग इन करा.
- लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर अर्ज करा हा टॅब दिसेल.
- त्या टॅब मध्ये आपल्याला सिंचन साधने व सुविधा हा पर्याय दिसेल.
- त्या ठिकाणी बाबी निवडा या पर्यावरण क्लिक करा.
- आपला तालुका आपली गाव मुख्य घटक बाब निवडून द्या.
- बाबमध्ये पंप सेट इंजिन मोटर हा पर्याय निवडावा लागेल.
- उपघटक मध्ये डिझेल इलेक्ट्रिक पंप निवडावा लागेल.
- त्यानंतर अटी व नियम या चौकटीच्या पर्यायावर राईट करून जतन करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- जतन केल्यानंतर आपल्याला अर्जाचे पेमेंट करावे लागेल
- पेमेंट केल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर आपला अर्ज सादर झाला आहे या पद्धतीचा एसएमएस पाठवण्यात येइल.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.