पीएम आवास योजना,10 नियमाचे पालन केल्यास पात्र ठरणार
केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून बेघर, कच्चे घरी असणाऱ्या ग्रामीण भागातील कुटुंबांना हक्काचे पक्के घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना 2016 पासून सुरु करण्यात आलेली आहे.
पीएम आवास योजना 2024-25 वर्षातील प्रतीक्षा यादीतील लाभार्थी उद्दिष्ट प्रमाणे घरकुल मंजुरीसाठी पात्र आहेत अशा व्यक्तींना त्यांचे यादीतील नावे लवकरच तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावरही प्रसिद्ध होणार आहेत. पण निकषानुसार अपात्रता निदर्शनास असल्यास त्यांची नावे वगळण्यात येणार आहेत. त्यासाठी पीएम आवास योजना अंतर्गत यादीमध्ये नाव असणाऱ्यांसाठी या दहा नियमाचे पालन करावे लागेल. तर त्याच व्यक्तीला लाभ दिला जाईल. चला तर आपण आज या लेकामध्ये खालील प्रमाणे पाहूया ते 10 नियम कोणते
पीएम आवास योजना अर्ज रद्द होण्याची कारणे
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत गुरुकुल मंजुरीसाठी पात्र असणाऱ्या व्यक्तींची लवकरच यादी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावरील प्रसिद्ध होणार आहे पण निकषानुसार अपात्र निदर्शनास असल्यास त्यांची नावे वगळण्यात येणार आहेत. त्यांचा अर्ज तात्काळ नामंजूर केला जाईल. या मागचे कारण माहीत असणे खूप गरजेचे आहे. कारण माहित नसल्यामुळे त्यांचे फॉर्म नाकारले जातात. आणि 2.5 लाख रुपयापासून वंचित राहतात. अशा दहा मोठ्या अटी बद्दल माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे.
या 10 नियमाचे पालन न केल्यास ठरू शकतात अपात्रता
- ज्या कुटुंबाकडे मोटार, तीन चाकी, चार चाकी वाहने आहेत ते अपात्रता ठरवले जातील.
- 50000 रुपये पेक्षा जास्त मर्यादा असणारे किसान क्रेडिट कार्ड नसावी. असल्यास अपात्रता ठरू शकतात.
- कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरी करीत नसावा. सरकारी नोकरी करत असल्यास अपात्रता ठरतील.
- कुटुंबातील कोणीही सदस्य 15 हजार रुपये पेक्षा जास्त कमवत नसावा.
- अर्जदार हा इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
- अर्जदाराची वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांच्या आत असावी.
- अर्जदार व्यक्तीचे वय 18 ते 55 दरम्यान असावे
- अर्जदाराकडे पक्के घर नसावे.
- अर्जदार व्यक्तीकडे पाच एकर किंवा त्यापेक्षा जास्त बागायती जमीन असावी.
- वरील दिलेल्या सर्व नियमाचे पालन न केल्यास त्यांना या योजनेसाठी अपात्रता ठरवले जाईल.
प्रधानमंत्री आवास योजना साठी या पाच कुटुंबाला लाभ दिला जाईल
- घरी नसलेली कुटुंबे
- असाह्य, भिकारी कुटुंब
- सफाई करणारे कुटुंब
- आदिवासी कुटुंब
- रोज मजुरी करणारे कुटुंबे
- दारिद्र्यरेषेखाली जगत असणारे कुटुंब
वरील दिलेली हे सर्व कुटुंबे या योजनेसाठी पात्रता असतील
अर्जाची छाननी
पीएम आवास योजना या योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या व्यक्तींच्या अर्जाची छाननी ग्रामपंचायत स्तर, विकास गट आणि जिल्हास्तरावर प्राप्त घरांच्या मागणी संदर्भातील अर्ज मंजूर करण्याची कारवाई केली जाईल. त्याचा तपशील नोंदवही कारवाईस नमूद केला जाईल. ऑनलाइन अर्ज सोबत, ऑफलाइन अर्ज फॉर्म देखील भरले जातील. जेणेकरून नंतर त्याचे क्रॉर्स वेरिफिकेशन इतर टीमसह करता येईल. आणि अपात्र व्यक्तींची अर्ज नाकारली जातील.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.